How to loose belly fat : वाढलेलं वजन (weight) कमी करणं म्हणजे अनेकांची मोठी समस्या बनली आहे. डाएट कोणतं फॉलो करावं, वर्कआउट ( Workout) काय करावं असे असंख्य प्रश्न अनेकांच्या मनात असतात. मग अशावेळी तुम्ही वजन कमी करण्यासाठी विविध मार्ग निवडता. पोटाची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी प्रचंड घाम गाळावा लागतो. ( Want to Lose Belly Fat Without Exercise?; Then take these drinks in your diet)
अधिक वाचा : Weight Loss: पोटाची चरबी कमी करण्यासाठी घ्या या drinks
नियमित व्यायाम आणि सकस आहार तुम्हाला पोटाची चरबी कमी करण्यास मदत करू शकतो. परंतु जिममध्ये न जाता तुम्हाला चरबी कमी करायची आहे. मग तुम्हाला तुमच्या लाईफस्टाइलमध्ये बदल करावा लागेल. पोटाची चरबी कमी करणं म्हणजे तारेवरची कसरत. पण योग्य डाएटने तुम्ही पोटाची चरबी कमी करू शकता. आज आम्ही तुम्हाला अशा काही ड्रिंक्स सांगणार आहोत जे घेऊन तुम्ही पोटावरील चरबी कमी करू शकतात.
वजन कमी करण्यासाठी अननसचे ज्यूस खूप फायदेशीर आहे. यात मोठ्या प्रमाणात फायबर, व्हिटॅमिन सी आणि बी 6 आणि पॉटेशिअम असते. हे प्यायल्याने पोटाची चरबी कमी होईल. तसेच तुमची त्वचा आणि केसं सुदर होतील. यासह अननसमध्ये ब्रोमेलेन नावाचे एक एंजाइम असते जे लठ्ठपणा कमी करत असते आणि मेटाबोलिझमची म्हणजेच चयापचयची प्रक्रिया जलद करत असते.
अधिक वाचा : चंद्राची पाहून अदा अनेक सर्जेराव फिदा
पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात पालक ज्यूसचा समावेश करावा. यात लोहासह फायटोन्यूट्रिएंट्स आणि फायबर असतं. यामुळे तुम्हाला बराच वेळ भूक लागत नाही.
अधिक वाचा : प्रेमासाठी कुमार विश्वासनं घराच्यांसोबत केलं होतं भांडण
ही एक जुनी रेसिपी आहे. कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने शरीरात साठलेली अतिरिक्त चरबी निघून जाते. यामुळे रोगप्रतिकारशक्तीही वाढते. जर तुमचे केस जास्त गळत असतील तर ते कमी होतील. पण जर तुम्हाला हाडांशी संबंधित समस्या असतील तर तुम्ही याचे सेवन करू नये.
पोटाची चरबी वाढण्याचे एक कारण म्हणजे जेवल्यानंतर बराच वेळ बसणे. कधीकधी जेव्हा तुम्हाला भूक लागते तेव्हा तुम्ही खाण्यापेक्षा जास्त द्रव सेवन करावे. अशा परिस्थितीत, तुम्ही एक वेळचे जेवण स्मूदीने बदलू शकता. स्मूदी बनवण्यासाठी एवोकॅडो, खोबरेल तेल आणि काही बदाम घेऊन मिक्सरमध्ये बारीक करून प्या. तुम्ही त्यात चिया बियादेखील टाकू शकता.