Weight Loss: वजन कमी करायचे आहे पण Craving ने झालात हैराण?, मग आजपासून खा 'या' पाच गोष्टी

तब्येत पाणी
Pooja Vichare
Updated Aug 28, 2022 | 08:39 IST

Dieting Tips: आजकाल लोक वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेत असतात. मात्र अनेक वेळा ते त्यांची भूक आणि क्रेव्हिंगवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. त्यामुळे त्यांचं वजन कमी होत नाही. तुम्हालाही खूप भूक आणि वारंवार क्रेव्हिंग होत असेल तर या 5 गोष्टींचे सेवन करा.

Dieting Tips
वजन कमी करण्याच्या टीप्स 
थोडं पण कामाचं
  • वजन कमी (lose weight) करणं खूप अवघड असते. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते.
  • वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी तुमचा डाएट सर्वात महत्वाचा आहे.
  • तुमचा डाएट आणि खाण्याच्या सवयींचा तुमच्या आरोग्यावर सर्वात जास्त परिणाम होत असतो.

नवी दिल्ली:  Healthy Snacks For Hunger: सध्या वजन वाढणं आणि (Weight Gain and obesity) लठ्ठपणा ही समस्या सामान्य झाली आहे. मात्र हेच वजन कमी (lose weight) करणं खूप अवघड असते. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. वजन कमी करण्यासाठी खाण्या-पिण्यावर नियंत्रण येतं. वजन कमी करत असताना डाएट, एक्सरसाइज आणि लाईफस्टाईल (Lifestyle)  या तिन्ही गोष्टींवर नियंत्रण ठेवलं तर कुठेतरी वजन नियंत्रणात येते. वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी तुमचा डाएट सर्वात महत्वाचा आहे, जर तुम्ही एका दिवसात खूप जास्त कॅलरीज घेत असाल आणि खूप कमी कॅलरीज बर्न करत असाल तर एक्सरसाइज करूनही तुमचे वजन कमी होणार नाही.

यासाठी तुम्हाला तुमच्या डाएटवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. तुमचा डाएट आणि खाण्याच्या सवयींचा तुमच्या आरोग्यावर सर्वात जास्त परिणाम होत असतो. असे काही लोक आहेत ज्यांना खूप वेळा भूक लागते. तुमच्याही बाबतीत असे होत असेल, तर तुम्ही त्यावर नियंत्रण ठेवावे. यासाठी आवश्यक आहे की जेव्हाही तुम्हाला भूक लागते तेव्हा तुम्ही अशा काही गोष्टी खाव्यात, ज्यामुळे भूकही दूर होते आणि तुम्हाला दीर्घकाळ पोट भरलं आहे असं जाणवते.

अधिक वाचा-  यंदा गणेश चतुर्थीला करा 'या' स्तोत्राचे पठण, दुःख जातील पळून

असं म्हटलं आहे की, वारंवार भूक लागणे याचा अर्थ असा होतो की तुम्ही प्रोटीन आणि फायबर समृध्द पदार्थांचे सेवन कमी करत आहात. तुम्ही पौष्टिक आहार घेत नाही. ज्यामुळे तुम्हाला वारंवार भूक लागते. प्रोटीन आणि फायबरयुक्त अन्न खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. याशिवाय जेव्हा जेव्हा तुम्हाला भूक लागते तेव्हा काही आरोग्यदायी अन्नच खावे. आम्ही तुम्हाला अशाच 5 आरोग्यदायी पदार्थांची लिस्ट सांगत आहोत जे तुमची भूक कमी करण्यास मदत करेल. 

बदाम

भूक लागल्यावर बदाम खा. यामुळे शरीराला व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, अँटीऑक्सिडंट्स, हेल्दी फॅट, प्रोटीन आणि फायबर मिळतात. प्रथिने आणि फायबर युक्त गोष्टी खाल्ल्याने तुम्हाला जास्त वेळ भूक लागत नाही. बदाम खाल्ल्याने तुमची भूक भागते.

चना स्प्राउट्स

भूक शांत करण्यासाठी आरोग्यदायी अन्नामध्ये चणा देखील समाविष्ट केला जातो. चण्याला आलेले मोड खाल्ल्याने शरीराला प्रोटीन आणि फायबर मिळतात. यामुळे तुम्हाला जास्त वेळ भूक लागत नाही. प्रोटीन पचण्यास वेळ लागतो, ज्यामुळे भूक हार्मोन्सची पातळी कमी होते. चणा स्प्राउट्समध्ये बी-व्हिटॅमिन्स देखील भरपूर असतात. हा तुमच्यासाठी योग्य ब्रेकफास्ट आहे.

ताक

जेवणादरम्यान भूक लागल्यास ताक पिऊ शकता. मिड स्नॅक्ससाठीही हा एक चांगला पर्याय आहे. दह्यापासून बनवलेले ताक प्रोबायोटिक्सने समृद्ध असते. यामध्ये व्हे प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. ताक प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि भूकही शांत होते. काही लोक अन्न पचवण्यासाठी ताकही पितात. ताकातील कॅल्शियम आणि प्रोटीनमुळे जास्त वेळ भूक लागत नाही.

अधिक वाचा-  भारतात आज होणार सर्वात मोठा धमाका, 9 सेकंदात पत्त्यासारखी कोसळणार गगनचुंबी इमारत

नारळ

भूक कमी करण्यासाठी तुम्ही नारळही खाऊ शकता. नारळात असे अनेक घटक आढळतात जे शरीरात जमा झालेली चरबी कमी करण्यास मदत करतात. नारळात जास्त प्रमाणात फायबर असते, जे खाल्ल्यानंतर बराच वेळ भूक लागत नाही. नारळ खाल्ल्याने वजनही झपाट्याने कमी होते.

भाज्यांचा ज्यूस

भूक लागल्यावर भाजीचा ज्यूस पिऊ शकता. ते अधिक निरोगी बनवण्यासाठी तुम्ही त्यात फ्लेक्ससीड्स देखील घालू शकता. भाज्यांच्या ज्यूसमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. ते प्यायल्यानंतर जास्त वेळ भूक लागत नाही. यामुळे पोट, पचन आणि शरीर निरोगी राहते.

(Disclaimer: Times Now Marathi या लेखात नमूद केलेल्या पद्धती, आणि दाव्यांची पुष्टी करत नाही. या फक्त सूचना म्हणून घ्या. असे कोणतेही उपचार/औषध/आहार करण्यापूर्वी, कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी