वजन कमी करण्याच्या टिप्स: या तेलांमध्ये लपलाय तुमच्या वेट लॉसचा फंडा

तब्येत पाणी
Updated Aug 14, 2019 | 14:14 IST | टाइम्स नाऊ मराठी

Weight Loss Tips: एसेंशियल तेलाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. पण तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का? की, हे तेल तुमचं वजन कमी करण्यास देखील मदत करतात. जाणून घ्या अरोमाथेरेपीचे अचूक फायदे.

Essential-Oil
वजन कमी करण्याच्या टिप्स: या तेलांमध्ये लपलाय तुमच्या वेट लॉसचा फंडा 

थोडं पण कामाचं

  • वजन कमी करण्यासाठी अरोमाथेरेपी फारच उपयुक्त 
  • फक्त तेल नाही तर, गुणाकारी औषध!
  • सुंगधी तेलाचे आहेत अनेक आरोग्यदायी फायदे

मुंबई: चागंलं डाएट आणि व्यायाम हे शरीरामधील चरबी कमी करण्याचा एकमेव पर्याय आहे. पण काही अशा छोट्या-छोट्या ट्रिक्स देखील आहेत ज्यामुळे आपलं वजन कमी करण्याची प्रक्रिया जलद होऊ शकते. अरोमाथेरेपी यापैकीच एक आहे. वैज्ञानिकदृष्टया जर एसेंशियल तेलाचा वापर हा फक्त मूड बस्टरचं काम करत नाही तर शरीरातील उर्जेचा स्तर देखील वाढवतो. याशिवाय वजन कमी करण्यास देखील मदत करतं. आपल्याला जर एसेंशियल तेल वापरण्यास काही अडचण नसेल तर आपण ते बिनधास्त वापरू शकता. वजन कमी करण्यासाठी आपण अनेकदा बऱ्याच गोष्टी वापरुन पाहिल्या असतील. पण हा प्रयोग सगळ्यात वेगळा आणि परिणामकार ठरु शकतो. 

हे आहेत एसेंशियल तेलाचे खास गुण 

एसेंशियल तेल हे नेहमी फुलं, मसाले यासारख्या नैसर्गिक गोष्टींपासून बनवले जातात. त्यामुळे यामध्ये ताकद असते. डोकेदुखी पासून तणाव आणि नैराश्य यासह मूड बस्टरशिवाय एसेंशियल तेल वजन कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. खास गोष्ट ही की, याचे काही थेंबच पुरेसे असतात. कारण याच्या एका थेंबात देखील बरीच ताकद असते. चला तर मग आज आपण अशाच काही महत्त्वपूर्ण एसेंशियल तेलाबाबत जाणून घेऊयात जे आपल्याला वेट लॉससाठी बरंच कामी येतील. 

लेमन एसेंशियल तेल: 
लेमन एसेंशियल तेल हे वजन कमी करण्यासाठी खूपच फायदेशीर आहे. हे तेल शरीरातील टॉक्सिन बिल्डअप हटवण्यासाठी मदत करेल. ज्यामध्ये शरीरातील उर्जेचा स्तर वाढत जातो. सोबत आपली पाचन क्षमता देखील वाढवतं. 

यावर करण्यात आलेल्या संशोधननुसार, लेमन एसेंशियल तेलाचा सुगंध घेतल्यास आपला मूड देखील बदलतो. तसंच अधिक फायदा व्हावा यासाठी एसेंशियल ऑईलला ह्यूमिडिफायरमध्ये २ ते ३ थेंब टाकावे आणि मग त्याचा सुगंध घ्यावा. 

लॅवेंडर एसेंशियल तेल: 
लॅवेंडर एसेंशियल तेल हे खूपच चांगलं स्ट्रेस रिलिव्हर आहे. हे तणाव देखील कमी करतं. यासोबतच याचा एक थेंब देखील आपल्याला चांगली झोप मिळवून देतं. याचे फक्त एवढेच गुण नाहीत तर हे तेल वजन कमी करण्यासाठी अत्यंत चांगलं आहे. 

आपण आपल्या हातावर लॅवेंडर एसेंशियल तेलाचे ४-५ थेंब लावा आणि त्याचा सुगंध घ्या. याशिवाय आपल्या घरी किंवा मंदिरात याचा दिवा देखील लावू शकता. याचा जेवढा आपण सुगंध घ्याल तेवढ्या आपल्या कॅलरी बर्न होतील. 

पेपरमिंट एसेंशियल आणि जिंजर तेल: 
पेपरमिंट तेल हे फक्त आपल्या शरीरातील उर्जाच वाढवत नाही तर आपल्या गळ्यातील स्नायू देखील चांगले ठेवते. हे एसेंशियल तेल आपल्याला जंक फूड खाण्याच्या लालसेपासून प्रवृत्त करतं. यामुळे आपल्या एक आनंदी असल्याची भावनाही येते. आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यात देखील याचे काही थेंब टाकू शकता. 

जिंजर तेल हे शरीरातील सूज, तणाव, साखरेचे पदार्थ खाण्याची लालसा कमी करतं. यासोबतच हे पाचन क्रियेसाठी देखील चांगलं आहे. हे तेल एका थर्मोजेनिकच्या स्वरुपात देखील काम करतं. ज्याचा अर्थ असा आहे की, हे फॅट बर्न करण्याचं आणि मेटाबॉलिक रेट वाढविण्याचं देखील काम करतं. आघोळीच्या पाण्यात आपण हे टाकून वापरु शकता किंवा हातावर काही थेंब टाकून त्याचा सुगंध घेत राहा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
वजन कमी करण्याच्या टिप्स: या तेलांमध्ये लपलाय तुमच्या वेट लॉसचा फंडा Description: Weight Loss Tips: एसेंशियल तेलाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. पण तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का? की, हे तेल तुमचं वजन कमी करण्यास देखील मदत करतात. जाणून घ्या अरोमाथेरेपीचे अचूक फायदे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...