Weight Loss Tips: नो डाएटिंग, नो एक्सरसाईज, तरी होईल वजन कमी

तब्येत पाणी
Updated Nov 25, 2021 | 17:37 IST | टाइम्स नाऊ मराठी

Weight Loss: लाईफस्टाईलमध्ये थोडेसे बदल करून तुम्ही विना डाएटिंग आणि एक्सरसाईजशिवाय वजन कमी करू शकता. 

weight loss
Weight Loss Tips:नो डाएटिंग, नो एक्सरसाईज, तरी होईल वजन कमी 
थोडं पण कामाचं
  • भरपूर प्रोटीन घ्या
  • वजन कमी करण्यापासून शरीर निरोगी राखण्यात पाण्याची भूमिका महत्त्वाची असते.
  • झोपण्याच्या आधी काही खाल्ल्याने वजन वाढण्याची दाट शक्यता असते.

मुंबई: भारतात लठ्ठपणा(obesity) ही सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकजण आपल्या वाढलेल्या वजनामुळे चिंतित आहे. अशातच जेव्हा वजन कमी(weight loss) करण्याची गोष्ट येते तेव्हा प्रत्येकजण डाएटिंग(dieting), जिम(gym), योगाभ्यासाचा(yoga) सल्ला देतो. अशातच बरेच लोक असे असतात ज्यांना वजन तर घटवायचे असते मात्र सकाळी सकाळी धावण्याचा आळस येतो. सकाळी नाश्त्यामध्ये पराठे बनवणं सोपं वाटतं मात्र काही हेल्दी जसे दलिया, ओट्स बनवणे कठीण काम वाटते. weight loss tips without dieting and exercise

दरम्यान, अनेकजण इंटरनेटवर विना डाएटिंग आणि एक्सरसाईजशिवाय वजन कमी कसे करायचे याच्या टिप्स शोधत असतात. ही गरज पाहता आम्ही आज तुम्हाला अशा काही सोप्या पद्धती सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही विना डाएटिंग आणि एक्सरसाईज वजन कमी करू शकता. 

भरपूर प्रोटीन घ्या

प्रोटीनयुक्त डाएट घेतल्याने वजन नियंत्रणात येते. विना एक्सरसाईज आणि डाएटिंगशिवाय तुम्ही वजन कमी करू शकता. खासकरून नाश्त्यामध्ये प्रोटीनयुक्त डाएटचा अधिक वापर करा. जसे मासे, अंडी, बीन्स आणि दह्याचा आपल्या जेवणात समावेश करा. 

अधिकाधिक पाणी प्या

वजन कमी करण्यापासून शरीर निरोगी राखण्यात पाण्याची भूमिका महत्त्वाची असते. दिवसभरात ७-८ ग्लास पाणी प्या. पाणी पिण्याचे तसे अनेक फायदे आहेत. मात्र वेट लॉस रूटीनममध्ये पाण्याला विशेष स्थान आहे. पाणी शरीराला हायड्रेट करण्यासोबतच भूक कमी करण्यातही मदत करते. निरोगी व्यक्तीने सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस पिळून प्यायल्याने शरीराच्या वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवता येते. 

झोपण्याआधी काही खाऊ नका

झोपण्याच्या आधी काही खाल्ल्याने वजन वाढण्याची दाट शक्यता असते. खरंतर जेव्हा मेलाटोनिनचा स्तार वाढतो त्या दरम्यान खाल्ल्याने वजन वाढण्याचा धोका अधिक असतो. यासाठी झोपण्याआधी काही खाल्ल्याने शरीरावर फॅट वाढू लागते आणि यामुळे वजन वाढण्याची जोखीम अधिक असते. अशातच असा पर्याय आहे की झोपण्याच्या काही तास आधी जेवून घ्या आणि लक्षात ठेवा रात्रीच्या वेळेस हलके जेवण घ्या. यामुळे वजन वाढण्याचा धोका कमी असतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी