Weight Loss Tips: गुळ आणि मधामुळे वजन होतं कमी, वाचा खास टिप्स

वजन कमी करण्यासाठी तुम्ही काय खाता हे अतिशय महत्त्वाचे आहे. वजन कमी करण्यासाठी आपण गोड पदार्थ टाळले पाहिजे. त्यात साखर ही आवर्जून टाळली पाहिजे. साखर ऐवजी गुळ आणि मधाचा वापर केल्यास नक्कीच वजन कमी होतं.

honey and jaggery
गुळ आणि मध  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • वजन कमी करण्यासाठी तुम्ही काय खाता हे अतिशय महत्त्वाचे आहे.
 • वजन कमी करण्यासाठी आपण गोड पदार्थ टाळले पाहिजे.
 • त्यात साखर ही आवर्जून टाळली पाहिजे.

सध्या अनेकांना वजन वाढण्याची समस्या भेडसावत आहे. चुकीचा डाएट आणि लाईफस्टाईलमुळे वजन वाढत आहे. यासाठी योग्य आहाराची गरज आहे. वजन वाढल्यानंतर अनेल आजारांना निमंत्रण मिळतं. त्यात ब्लड प्रेशर, मधुमेह आणि हृदयविकारांचा समावेश आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला आहारात बदल करावे लागतील. तसेच नियमित व्यायामही करावा लागेल. (weight loss use honey and jaggery better result tips in marathi)

वजन कमी करण्यासाठी तुम्ही काय खाता हे अतिशय महत्त्वाचे आहे. वजन कमी करण्यासाठी आपण गोड पदार्थ टाळले पाहिजे. त्यात साखर ही आवर्जून टाळली पाहिजे. साखर ऐवजी गुळ आणि मधाचा वापर केल्यास नक्कीच वजन कमी होतं. मध आणि गुळ हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया मध आणि गुळाचे फायदे


मधाचे फायदे

 1. मध हा नैसर्गिक पदार्थ असून त्यात कुठलेही केमिकल नसते.
 2. मधात अनेक गुण असतात त्यामुळे शरीराला फायदा होतो. 
 3. मधात इलेक्ट्रोलाईट्स आणि अँटीऑक्सिडेंट असतात. त्यामुळे शरीर डीटॉक्सिफाय होण्यास मदत होते.
 4. मधात अँटी इन्फ्लेमेटरी गुण असतात त्यामुळे शरीराला सूज येत नाही.
 5. मधामुळे त्वचा आणि हृदय हेल्दी राहते.


गुळाचे फायदे

 1. मधाप्रमाणेही गुळ एक नैसर्गिक पदार्थ असून त्यावर कुठलीही केमिकल प्रक्रिया होत नाही.
 2. गुळात ग्लायसेमिक इंडेक्सचे प्रमाण कमी असतम. मधुमेहाच्या रुग्णांसाठी गुळ फायदेशीर ठरतं.
 3. गुळात आयर्न, पोटॅशियम, मॅग्निशियम, मिनरल्स आणि अँटी ऑक्सिडेंट असतात.
 4. गुळाचे नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढतं.
 5. गुळामुळे पोटाचे विकार दूर होतात तसेच शरीरात सूज होत नाही.
 6. वजन कमी करण्यासाठी गुळ फायदेशीर आहे. 


वजन कमी करण्यासाठी मध आणि गुळाचा चांगला पर्याय आहे. गुळ आणि मधात कमी कॅलरी असतात. वजन कमी करण्यासाठी तुम्ही जे काही खाता त्याचे प्रमाण आणि मात्रा ठरवून घ्या. मध आणि गुळाचे सेवन करण्यापूर्वी त्याचा दर्जा तपासून घ्या.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी