Weight Loss Tips: दोन दिवसात कमी होईल अडीच किलो वजन, फॉलो करा वीकेंड डाएट प्लॅन 

Weekend Weight Loss Diet Plan: आपल्याला वजन कमी करायचं असल्यास आता पूर्ण आठवडा डाएट फॉलो करण्याची गरज नाही. आपण फक्त वीकेंड डाएट प्लॅन देखील फॉलो करु शकता.

weight loss will be two and a half kg in two days follow the weekend diet plan
२ दिवसात कमी होईल अडीच किलो वजन, फॉलो करा वीकेंड डाएट प्लॅन 

थोडं पण कामाचं

  • वीकेंडला वजन कमी करण्याचा करा प्रयत्न 
  • संपूर्ण आठवडा नाही, फक्त वीकेंडला करा डाएट 
  • वेट लॉससाठी वापरा एक अनोखा फंडा 

मुंबई: अनेकदा असं होतं की, वजन कमी करण्यासाठी लोकं अनेक आठवडे आपल्या आवडीचे पदार्थ न खाता फक्त डाएट प्लॅन फॉलो करतात. पण तरीही अनेकदा वजन कमी करणं त्यांना जमत नाही. असं जर आपल्यासोबतही होत असेल तर आपल्यासाठी ही बातमी खूपच महत्त्वाची आहे. 

आपण जे आपल्या संपूर्ण आठवड्यातील डाएट प्लॅनने जे मिळवू शकत नाही ते फक्त वीकेंड डाएट प्लॅनने मिळवू शकतात. त्यामुळे संपूर्ण आठवडा आपल्याला जे काही खायचं आहे ते आपण खाऊ शकता. पण वीकेंडचे दोन दिवस आपल्याला फक्त पुढील डाएट फॉलो करायचा आहे. असं करुन आपण दोन दिवसात जवळजवळ अडीच किलोपर्यंत वजन कमी करु शकतात.  

वजन कमी करायचं म्हणजे आपल्याला उपवास करायचा नाही. तर आपल्याला असे पदार्थ खायचे आहेत की, जे आपल्याला शरीराला पोषक आहेत. आपण असा प्रयत्न करा की, वीकेंडला आपण लिक्विड डाएट जास्तीत जास्त फॉलो करा. या दोन दिवसात आपल्याला आपल्या खाण्यावर संयम बाळगावा लागेल. तसंच आपल्याला खाण्यासाठी योग्य गोष्ट निवडाव्या लागतील. जे पाचनशक्ती सुधारतील आणि तुमच्या कॅलरी अधिक सहजपणे कमी करतील. 

शनिवार आणि रविवारसाठी वेट लॉस डाएट प्लॅन 

  1. नाश्ता: २०० ग्रॅम पनीर आणि होलवीट ब्रेड सँडवीच आपण आपल्या नियमित कॉफी किंवा चहासोबत घेऊ शकता. फक्त यावेळी आपण साखर अजिबात खाऊ नये. हा डाएट प्लॅन आपल्याला दोन दिवस फॉलो करायचा आहे. शक्य असल्यास आपण दोन दिवसांचा हा डाएट प्लॅन दर वीकेंडला फॉलो करु शकता. जोवर आपण आपल्याल हवं तेवढं वजन कमी करु शकत नाहीत तोवर. 
  2. दुपारचं जेवण: दुपारच्या जेवणात आपल्याला सॅलेड खावं लागेल. यावेळी आपल्याला १ एवोकॅडो, १ काकडी, अर्धा उकडलेला बटाटा काही ग्रिल केलेले ब्रेडचे तुकडे, लिंबूचा रस आणि या सगळ्या सॅलेडवर मिर पूड टाकावी. 
  3. रात्रीचं जेवण: १०० ग्रॅम मासा आपण आपल्या आवडत्या मसाल्यासोबत ग्रिल करुन खाऊ शकता. यासोबत आपण २०० ग्रॅम कमी फॅटचं योगर्ट देखील खाऊ शकता.   

टीप: प्रस्तुत लेखात सुचविण्यात आलेल्या टिप्स आणि सल्ला हे केवळ साधारण माहितीसाठी आहे. त्यामुळे तो तज्ज्ञांचा सल्ला आहे असं मानू नये. त्यासाठी आपण तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी