Weight Loss: मुगाच्या डाळीने घटवा आपले वजन, या पद्धतीने डाएटमध्ये करा समावेश. 

तब्येत पाणी
Updated Oct 13, 2021 | 13:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

Weight Loss Foods: सध्या सगळेच लठ्ठपणाने त्रस्त आहेत. अशातच मुगाच्या डाळीने तुम्ही वजन कमी करू शकता. 

weight loss
Weight Loss: मुगाच्या डाळीने घटवा आपले वजन, असे करा सेवन 
थोडं पण कामाचं
  • दिवसाची सुरूवात कोमट पाण्याने करा.
  • यानंतर मूगडाळीचे सूप बनवा. हे दिवसातून सहा वेळा प्या.
  • यासाठी मूग डाळीत लसूण, आले, हिंग, जिरे, बडिशेप, धणे, हिरवी मिरचीसोबत उकळा. यानंतर सूपला कोणत्याही प्रकारची फोडणी देऊ नका.

Weight Loss Tips: सध्या सगळ्यांनाच लठ्ठपणाचा आजार दडला आहे. लोक आपले वजन कमी करण्यासाठी काय काय नाही करत. जिमपासून ते डाएटिंगपर्यंत सगळे प्रयत्न करतात. मात्र त्यानंतरही अनेकांना अपयश येते. मात्र असे काही पदार्थ आहेत ज्याच्या नियमित सेवनाने तुम्ही तुमचे वजन कमी करू शकता. मुगाची डाळ हा एक चांगला पर्याय आहे. मुगाच्या डाळीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते. यासोबतच याच फॅटही नसते. त्यामुळे वजन घटवण्यासाठी हा चांगला पर्याय ठरू शकतो. जाणून घ्या मूग डाळ खाण्याचे फायदे. 

असा करा डाएटमध्ये समावेश

दिवसाची सुरूवात कोमट पाण्याने करा. यासाठी कमीत कमी दोन ग्लास पाणी हळूहळू घोट घोट प्या असे केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात. तसेच शरीर हायड्रेट राहते. यानंतर वॉक अथवा प्राणायाम करा. यानंतर मूगडाळीचे सूप बनवा. हे दिवसातून सहा वेळा प्या. यासाठी मूग डाळीत लसूण, आले, हिंग, जिरे, बडिशेप, धणे, हिरवी मिरचीसोबत उकळा. यानंतर सूपला कोणत्याही प्रकारची फोडणी देऊ नका. हा डाएटचा कार्यक्रम पुढील तीन दिवसांसाठी फॉलो करा. 

मूग डाळीचे डाएट फॉलो करताना आंबट पदार्थ जसे टोमॅटो, लिंबू, दही याचा प्रयोग करू नका. सोबतच तेल अथवा तुपाचा वापर करून नका. असे केल्याने तुम्हाला या डाएटचा फायदा होणार नाही. 

मुगाच्या सूपसोबत तुम्ही भाज्यांचे सेवन करा. यासाठी तुम्ही सलाडमध्ये गाजर, काकडी, बीट, मुळा, दुधी भोपळा, काकडी, कोबी, कांदा यांचे सेवन करू शकता. असे केल्याने तुम्ही ५ किलोपर्यंत वजन कमी करू शकता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी