मुंबई: सध्याच्या या धावपळीच्या दुनियेत सर्वांना स्मार्ट(smart) आणि फिट(fit) राहायचे आहे. मात्र व्यस्त जीवनशैलीमध्ये(fast lifestyle) व्यायामासाठी वेळ काढणे(exercise) आणि डाएटिंग(dieting) करणे कठीण झाले आहे. तज्ञांच्या मते वजन कमी करण्यासाठी(weight loss) व्यायाम चांगली आणि निरोगी पद्धत आहे. मात्र त्यासाठी दररोज वेळ काढण्याची गरज असते दरम्यान सध्याच्या व्यस्त लाईफमुळे हल्ली व्यायामालाही वेळ काढणे मुश्किल होते. वजन घटवण्याची दुसरी पद्धत आहे डाएटिंग करणे आहे ज्यासाठी तज्ञांकडून तितकीशी पसंती दिली जात आहे. साधारणपणे डाएटिंगचा अर्थ उपासी राहणे आणि आपल्या आवडीच्या पदार्थांपासून दूर राहणे.
आपल्या आवडीचे खाद्य सोडून जेव्हा महिनोमहिने डाएटिंग केली जाते तेव्हा लज्जतदार पदार्थ खाण्यासाठी आपला मेंदू सक्रिय होतो. अनेक महिन्यांच्या कडक डाएटिंगनंतर पुन्हा सामान्य रूटीनमध्ये आल्यास पहिल्यापेक्षा अधिक वजन वाढते. याचे एक कारण म्हणजे आपल्या आवडीच्या पदार्थांपासून दूर राहणे. तज्ञांच्या माहितीनुसार मनुष्याला प्रत्येक प्रकारच्या आहाराची गर असते. आठवड्यातून एकदा आपल्या आवडीचे पदार्थ खाल्ल्याने वजन वाढत नाही तर शरीरास निरोगी नसलेल्या पदार्थांचे विचार मनातून निघून जातात. यामुळे डाएटिंगचा कालावधी वाढतो आणि सोप्या पद्धतीने वजन कमी होते. सांगितलेले उपाय केल्यास वजन कमी करणे नक्कीच शक्य होते.