ऐकलं का ! आता विना व्यायाम कमी करता येईल वजन; फक्त 'या' गोष्टींची लावा सवय

सध्या दिवसात लोकांना वाढत्या वजनाचे मोठी समस्या जाणवत असते. वाढते वजन अनेक आजारांना आमंत्रण देत असते. यामुळे वजन वाढले तर सर्वांच्या चेहऱ्यावर वजन कमी करण्याची चिंता असते.

weight loss without exercise
ऐकलं का ! आता विना व्यायाम कमी करता येईल वजन  |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • व्यायाम न करता वजन करा कमी
  • जेवणाचा फोटो ठरू शकतं फायद्याचं
  • केळी आणि सफरचंदाच्या वासाने भूक होते कमी

नवी दिल्ली: सध्या दिवसात लोकांना वाढत्या वजनाचे मोठी समस्या जाणवत असते. वाढते वजन अनेक आजारांना आमंत्रण देत असते. यामुळे वजन वाढले तर सर्वांच्या चेहऱ्यावर वजन कमी करण्याची चिंता असते. वजन कमी करायचं म्हटलं म्हणजे आपल्याला जीममधील मेंबरशीप आलीच. शिवाय वजन कमी करायचं म्हटलं तर नियमित व्यायाम करावा लागतो. पण अनेकजण व्यायाम म्हटलं तर अनेकांच्या कपाळावर आढ्या येत असतात. जी लोक व्यायाम करणं एक संकट समजतात आणि त्यांना वजन कमी करायच आहे. अशा लोकांसाठी हा लेख खूप महत्त्वाचा आहे. 

अंडींचा करा नाष्टा 

अंडींचा समावेश तुमच्या नाष्टामध्ये करा, अंडे खाल्यानं तुमचं वजन नियंत्रणात राहू शकतं. वास्तविक, अंडीमध्ये पुष्कळ पौष्टिक घटक आढळतात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. तसेच, नाष्ट्याला अंडी खाल्ल्याने आपले शरीर हलके राहते आणि आपल्याला जास्त दिवसभर भूक लागत नाही.हेच कारण आहे की न्याहारीमध्ये अंडी खाणे खूप फायदेशीर आहे.

पाणी पिण्याचं वेळापत्रक बनवा

पाणी पिण्यामुळे आपल्या शरीरात कॅलरी नष्ट होतात. परंतु आपण वेळोवेळी पाणी पिणे महत्वाचे आहे, ज्यामुळे आपली उष्मांक (हायड्रेट) ही नष्ट होईल तसेच शरीर देखील हायड्रेटेड राहील. दिवसा पाणी पिण्याचे वेळापत्रक तयार करा आणि त्यानुसार वेळोवेळी पाणी प्या.

अन्न खाण्यापूर्वी सफरचंद आणि केळीचा वास घ्या

हे ऐकण्यास अजब वाटेल पण खाण्यापूर्वी जर तुम्ही सफरचंद किंवा केळीचा वास घेतला तर ते तुमची भूक नियंत्रित करेल. वासामुळे तुम्ही जास्त जेवण करणार नाहीत आणि तुमचे वजन नियंत्रित होईल. ही बाब एका संशोधनात देखील सिद्ध झाली आहे.

रात्रीच्या जेवणापूर्वी व्हॅनिला मेणबत्ती लावा

आजकाल मेणबत्त्या वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये येतात. त्यातील एक फ्लेवरम्हणजे व्हॅनिला मेणबत्ती.  आपण रात्रीच्या जेवणापूर्वी व्हॅनिला मेणबत्ती पेटविली तर मेणबत्तीच्या वासाने तुमची भूक कमी होईल. ही गोष्ट संशोधनात सिद्ध झाली आहे.

जेवणाचा फोटो काढा 

आजकाल सोशल मीडियाच्या युगात लोक जेवणाची छायाचित्रे काढून ते सोशल मीडियावर टाकण्याचा ट्रेंड आहे. परंतु ही सवय आपले वजन नियंत्रित करू शकते. वास्तविक, अन्नाचे छायाचित्र काढून लोकांना ते कसे खातात याची जाणीव होते आणि बर्‍याच वेळा त्यांची अन्नाची सवय सुधारते आणि निरोगी खाणे सुरू होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी