Weight Loss Yoga Tips: योगा एक्सपर्टकडून जाणून घ्या वजन कमी करण्याच्या ट्रिक्स

तब्येत पाणी
Updated Mar 16, 2023 | 17:39 IST | टाइम्स नाऊ मराठी

Benefits of kapalbhati: हल्ली वाढत्या वजनाची अनेक महिला असो वा पुरुष तक्रार करत आहेत. कारण वाढलेले वजन अनेकांसाठी त्रासाचे कारण बनते. यामुळे केवळ आरोग्याशी संबंधित समस्याच सुरू होत नाहीत, तर व्यक्ती टेन्शनमध्ये रहायला लागते त्याला ताण यायला लागतो

Weight Loss Yoga Tips
Weight Loss : वजन कमी करण्याच्या ट्रिक्स  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफवर परिणाम
 • वजन कमी करण्यासाठी योगा
 • कपालभाती करण्याचे इतर फायदे

Yoga For Weight Loss: हल्ली वाढत्या वजनाची अनेक महिला असो वा पुरुष तक्रार करत आहेत. कारण वाढलेले वजन अनेकांसाठी त्रासाचे कारण बनते. यामुळे केवळ आरोग्याशी संबंधित समस्याच सुरू होत नाहीत, तर व्यक्ती टेन्शनमध्ये रहायला लागते त्याला ताण यायला लागतो आणि यामध्ये तो आपला आत्मविश्वासही गमावू शकतो, ज्यामुळे ही समस्या आणखी वाढते. याचा परिणाम आपल्या नात्यावर, पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफवरही दिसून येतो.

अक्षर योग नावाचे एक फेसबुक पेज आहे ज्याला दहा लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या पेजवर योगा शिकवणाऱ्या योग तज्ञाच्या मते, योगासने करण्यासाठी प्राणायाम हा सर्वोत्तम योग आहे. यामुळे शरीराचे वजन संतुलित राहण्यास मदत होते. हा योग घरी सहज करता येतो. वजन कमी करण्यासोबतच सकारात्म विचार करण्यासाठी देखील आपण काही योगासने घरी केली पाहिजे. जेणेकरून आपल्या शरीरावर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल.

अधिक वाचा: Jaggery Water : सकाळी गुळ मिसळलेले कोमट पाणी प्या, झटपट बारीक व्हा

वजन कमी करण्यासाठी योगा (Weight Loss Yoga)

 1. योग तज्ज्ञांच्या मते, प्राणायामाचे अनेक मार्ग आहेत ज्यामध्ये कपालभाती वजन नियंत्रित करण्यात मदत करते.
 2. कपालभाती प्राणायाम करण्यासाठी सरळ बसा.
 3. तुमचे पूर्ण लक्ष तुमच्या पोटावर असले पाहिजे.
 4. श्वासोच्छवासाचा वेग कमी जास्त करता यायल पाहिजे, पण तुम्ही जर वजन कमी करण्यासाठी हा योगा करत असाल तर मध्यम गतीने श्वास घेत कपालभाती योगा करावा.
 5. या प्राणायामादरम्यान तुमचे पोट रिकामे असावे.
 6. 1 ते 2 आठवडे दररोज 15 ते 20 मिनिटे कपालभाती केल्याने वजन कमी करता येते.

कपालभाती करण्याचे इतर फायदे (Benefits of Kapalbhati)

 1. कपालभाती केल्याने शरीरातील चयापचय क्रिया सुधारते आणि वजन कमी होण्यास मदत होते.
 2. त्यामुळे फुफ्फुसाची क्षमता आणि आरोग्य वाढते.
 3. पोटाभोवतीच्या अवयवांना या योगाचा चांगला फायदा होतो.
 4. कपालभाती केल्यावर रक्तप्रवाह सुधारतो. 
 5. जेव्हा पचन चांगले होते, तेव्हा शरीर पोषक तत्त्वे चांगल्या प्रकारे शोषण्यास सक्षम असते.
 6. कंबर आणि पोटावरची चरबी कमी होते.
 7. या योगासनामुळे मेंदूच्या पेशी आणि मज्जासंस्थेला ऊर्जा मिळते.
 8. मन शांत करण्यात हे योगासन प्रभावी माध्यम आहे.

अधिक वाचा: Home remedy tips : पिवळे दात पांढरे करायचे असतील तर करा हे घरगुती उपाय

कपालभाती व्यतिरिक्त, जर तुम्ही इतर अनेक योगासने करत असाल, तर सामान्यतः प्रथम कपालभाती करण्याचा सल्ला दिला जातो. कपालभाती नंतर इतर प्राणायाम आणि योगासने करता येतात जी तुम्ही या क्रमाने करू शकता, प्रथम कपालभाती आणि नंतर हस्त उत्तासन, हस्त पदासन, धनुरासन आणि सेतू बंधनासन.

अधिक वाचा: Janhvi Kapoor: नैसर्गिक ग्लोसाठी जान्हवी कपूर फॉलो करते 'या' ब्युटी टिप्स

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी