Weight Loss Yoga Tips: मॅगीसारखे फक्त २ मिनिटं लागतील ही योगासनं शिकायला, फायदे आहेत प्रचंड

Yoga Benefits For Weight Loss: लठ्ठपणा (Fat) ही आज लोकांची सर्वात मोठी समस्या आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी, एखादी व्यक्ती अनेक प्रयत्न करते, परंतु अयशस्वी ठरते. अशा स्थितीत काही योगासने (Yoga) अशी आहेत, जी दररोज 10 मिनिटांचा वेळ काढून केल्यास कंबरेवर जमा झालेली चरबी झपाट्याने कमी होते.

weight loss yoga tips reduce waist fat do these yogasanas it will take only 2 minutes to learn
मॅगीसारखे फक्त २ मिनिटं लागतील ही योगासनं शिकायला  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • लठ्ठपणामुळे त्रस्त व्यक्ती अनेक आजारांनी ग्रस्त असते.
  • लठ्ठपणाचा सर्वात मोठा परिणाम पोट आणि कंबरेच्या चरबीवर दिसून येतो.
  • कंबरेवर साठलेली चरबी कमी करण्यासाठी ही योगासने आहेत फायदेशीर

Yoga Tips For Reduce Belly Fat: आजकाल बहुतेक लोकांची सर्वात मोठी समस्या म्हणजे लठ्ठपणा. शरीरातील चरबी केवळ तुमचे व्यक्तिमत्वच खराब करत नाही तर शरीराला अनेक प्रकारे हानी पोहोचवते. लठ्ठपणामुळे त्रस्त व्यक्ती अनेक आजारांनी ग्रस्त असते. लठ्ठपणाचा सर्वात मोठा परिणाम पोट आणि कंबरेच्या चरबीवर दिसून येतो. (weight loss yoga tips reduce waist fat do these yogasanas it will take only 2 minutes to learn)

अशा परिस्थितीत लोक पोटाची चरबी कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करतात. कंबरेवर साठलेली चरबी काढणे लोकांसाठी खूप कठीण आहे. खराब जीवनशैली आणि दिवसभर काम करणे, वर्कआउटचा अभाव आणि आरोग्याला अपायकारक असणारे अन्न खाणे यामुळे चरबी वाढत जाते, ज्यामुळे नंतर गंभीर आजार होतात. पोटात जमा झालेली चरबी काढून टाकायची असेल तर रोज थोडा वेळ काढून योगा करावा.

अधिक वाचा: Weight Loss Tips: एका आठवड्यात वजन झटपट घटविणारा प्रभावी डाएट प्लॅन

भुजंगासन

पोटाची चरबी कमी करण्यासाठी भुजंगासन हे सर्वोत्तम आसन आहे. त्यामुळे पोटाची चरबी लवकर कमी होण्यास मदत होते. याला सर्पासन असेही म्हणतात, कारण हे आसन करताना त्याचा आकार सापासारखा बनतो. हे करणे खूप सोपे आहे. या आसनामुळे पोटाचे स्नायू मजबूत होतात आणि कंबरेवर साठलेली चरबी झपाट्याने कमी होते.

अधिक वाचा: Healthy Diet: सकाळी पोट साफ होत नसेल तर हे पदार्थ करतील मदत

नौकासन

नौकासनामुळे पोटाची चरबीही कमी होण्यास मदत होते. या आसनात बोटीचा आकार तयार केला जातो. रोज सकाळी रिकाम्या पोटी नौकासन केल्याने पोट आणि कंबरेची चरबी झपाट्याने कमी होते आणि स्नायू ताणले जातात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

धनुरासन

धनुरासनामुळे शरीराचे स्नायू ताणले जातात. त्यामुळे शरीरातील चरबी झपाट्याने कमी होते आणि हात-पाय दुखण्याची तक्रारही दूर होते. हे आसन नैराश्याची लक्षणे कमी करण्यास देखील मदत करते. हे शरीर संतुलित ठेवते आणि लठ्ठपणाविरूद्ध जलद कार्य करते.

(टीप: या लेखातील टिप्स आणि सल्ले केवळ सामान्य माहितीसाठी आहेत. व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून त्याचा अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी, कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी