दिवसाची सुरुवात व्हिटॅमिनने परिपूर्ण ABCG ज्युसने करा, डॉक्टरांचा सल्ला

what is abcg juice, dr shriram nene suggest for daily nutrients : दिवसाची सुरुवात व्हिटॅमिनने परिपूर्ण ABCG ज्युसने करा असा सल्ला डॉक्टर देत आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचे पती डॉक्टर श्रीराम नेने यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करून हा हेल्दी सल्ला दिला आहे. 

what is abcg juice, dr shriram nene suggest for daily nutrients
दिवसाची सुरुवात व्हिटॅमिनने परिपूर्ण ABCG ज्युसने करा, डॉक्टरांचा सल्ला  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • दिवसाची सुरुवात व्हिटॅमिनने परिपूर्ण ABCG ज्युसने करा, डॉक्टरांचा सल्ला
  • डॉक्टर देत आहेत सल्ला
  • डॉक्टर श्रीराम नेने यांनी दिला हेल्दी सल्ला

what is abcg juice, dr shriram nene suggest for daily nutrients : दिवसाची सुरुवात व्हिटॅमिनने परिपूर्ण ABCG ज्युसने करा असा सल्ला डॉक्टर देत आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचे पती डॉक्टर श्रीराम नेने यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करून हा हेल्दी सल्ला दिला आहे. 

ए म्हणजे अॅपल अर्थात सफरचंद. बी म्हणजे बीटरूट अर्थात बीट, सी म्हणजे कॅरट अर्थात गाजर आणि जी म्हणजे जिंजर अर्थात आले किंवा आलं यांच्यापासून तयार होतो ABCG ज्युस. सफरचंद, बीट, गाजर आणि आले यांचा रुचकर ज्युस म्हणजे व्हिटॅमिनने परिपूर्ण ABCG ज्युस. या ज्युसमुळे शरीराला जस्त, पोटॅशिअम, मँगनीझ, व्हिटॅमिन ए (जीवनसत्व अ), व्हिटॅमिन बी 6 (जीवनसत्व ब 6), व्हिटॅमिन सी (जीवनसत्व क) हे पोषक घटक मिळतात. 

व्हिटॅमिनने परिपूर्ण ABCG ज्युस रिकाम्या पोटी पिणे आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे. दिवसाची सुरुवात व्हिटॅमिनने परिपूर्ण ABCG ज्युसने केली तर शरीराचे व्यवस्थित पोषण होते. दिवसभर काम करण्यासाठी उत्साह मिळतो. शरीराला ताकदीचा लाभ होतो. यामुळे कामाची सुरुवात करणे सोपे होते. 

हा ABCG ज्युस हृदय, त्वचा, डोळे, रक्तवाहिन्या यांच्यासाठी हितकारक आहे. मधुमेह, हृदयविकार, दमा, कर्करोग (कॅन्सर) या आजारांच्या रुग्णांसाठीही ABCG ज्युस अतिशय लाभदायी आहे. रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठीही हा ज्युस उपयुक्त आहे. पण या ज्युसमधील एखाद्या पदार्थाची आधीपासून अॅलर्जी असेल तर वैद्यकीय सल्ला घेतल्यानंतरच हा ज्युस प्यावा. तसेच या ज्युसमुळे एखाद्याला त्रास झाला तर संबंधित व्यक्तीने तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा.

Weight Loss Tips: जेवणानंतर 15 मिनिटं करा हे आसन, लोण्यासारखी वितळेल पोटाची चरबी

Excessive Thirst: वारंवार पाणी पिऊनही तुमची तहान भागत नसेल तर असू शकतात हे आजार...

कसा करावा ABCG ज्युस?

साहित्य : 100 ग्रॅम सफरचंद, प्रत्येकी 300 ग्रॅम बीट आणि गाजर, अर्धा इंच आले, चवीपुरते मीठ.

कृती : सफरचंद, बीट, गाजर, आले यांचा रस काढून घ्या. आता हे रस मिक्सरच्या मदतीने मिक्स करून घ्या. चवीनुसार मीठ घालून प्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी