Broken Heart Syndrome : ब्रोकन हार्ट सिंड्रोम म्हणजे काय रे भाऊ? फक्त प्रेमातच नाही, आजारपणातही बंद पडू शकते ‘धडकन’

ब्रोकन हार्ट सिंड्रोम हा आजार अचानक काहीतरी धक्कादायक गोष्ट समजल्यामुळे निर्माण होतो. ती गोष्ट चांगली असो किंवा वाईट, त्याचा धक्का काहीजणांचं हृदय सहन करू शकत नाही.

Broken Heart Syndrome
ब्रोकन हार्ट सिंड्रोम म्हणजे काय रे भाऊ?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • आजारामुळे होतो हृदयावर परिणाम
  • ब्रोकन हार्ट सिंड्रोममुळे येऊ शकतो हार्ट अटॅक
  • भावनिक व्यक्तींना होतो अधिक त्रास

Broken Heart Syndrome: प्रेमभंग झाल्यामुळे एखाद्याचं मन दुखावल्याची अनेक उदाहरण आपण आजूबाजूला पाहतो. अनेकांनी स्वतःदेखील याचा अनुभव घेतलेला असतो. मात्र हृदयावर घाला घालण्याचा प्रकार हा केवळ प्रेमातच होतो असं नाही,तर त्याचाशी संबंधित एक गंभीर आजारही होण्याची शक्यता असते. हृदय (Heart) हा एक अवयव असला तरी कल्पनेच्या जगात त्याच्याशी अनेक भावना (Emotions) निगडित झालेल्या असतात. प्रत्यक्षात हृदयाचा आणि भावनांचा काहीही संबंध नसून मेंदूतील काही घटक त्याला कारणीभूत असल्याचं विज्ञान सांगतं. मात्र आयुष्यात एखादी अनपेक्षित आणि धक्कादायक घटना घडल्यानंतर त्याचा संबंध आपलं हृदय दुखावण्याशी लावला जातो. 

अनेक कारणांमुळे होतो हृदयरोगाचा त्रास

ब्रोकन हार्ट सिंड्रोम (Broken Heart Syndrome) हा त्याच्या नावाप्रमाणेच हृदयाशी संबंधित आजार आहे. रोजच्या जगण्यात अनेक कारणांमुळे आपल्या हृदयावर आघात होण्याची किंवा त्याला इजा होण्याची शक्यता असते. त्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स, प्रोसेस केलेलं अन्न, आरोग्यासाठी हानीकारक असलेले अन्नपदार्थ सतत खाणे आणि आवश्यक व्यायाम न करणे यासारख्या कारणांचा समावेश असतो. त्याशिवाय आपलं नियंत्रण नसणारेही अनेक घटक त्यासाठी कारणीभूत ठरतात. 

ब्रोकन हार्ट सिंड्रोम म्हणजे काय?

ब्रोकन हार्ट सिंड्रोमचा सर्वप्रथम शोध लागला तो 1990 साली जपानमध्ये.  जेव्हा एखाद्या व्यक्तीला अचानक कुठलाही मानसिक धक्का बसतो, वाईट बातमी समजते आणि अनेपक्षित काहीतरी घडतं तेव्हा त्याचा परिणाम त्याच्या हृदयावर होतो. अचानक भिती वाटणे किंवा कमालीची दुःखद घटना घडणे यामुळे हृृदयाचे स्नायू कमकुवत व्हायला सुुरुवात होते. हृदयावर जास्त दबाव आल्यामुळे नसा कमकुवत होतात आणि हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते. उदाहरणार्थ एखाद्या जवळच्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला तर त्यावेळी व्यक्तीला ज्या वेदना होतात, त्या भावनात्मकरित्या धोकादायक असतातच, शिवाय त्यांचा शरीरावरही विपरित परिणाम होत असतो. जर कुणी सतत उदास असेल, तरीही ब्रोकन हार्ट सिंड्रोमची शिकार होण्याची शक्यता असते. 

अधिक वाचा - Turmeric Milk Benefits : हळदीचं दूध पिण्याचे पाच फायदे, अनेक आजार राहतील दूर

ब्रोकन हार्ट सिंड्रोमचं कारण काय?

ब्रोकन हार्ट सिंड्रोम होण्यामागचं मुख्य कारण हे स्ट्रेस हार्मोन्समध्ये अचानक वाढ होणं, हे असतं. ॲड्रेनालाईन नावाचा हार्मोन सक्रीय झाला की तो शरीरातील रक्तवाहिन्यांना इतकं संकुचित करतो की आपल्या स्नायूंपर्यंत रक्त पोहोचणंही अवघड होतं. त्यामुळे एक मानसिक दबाव तयार होतो आणि शरीरातील स्नायू कमकुवत होऊ लागतात. 

ही असतात लक्षणं

ब्रोकन हार्ट सिंड्रोमची लक्षणं ही हार्ट अटॅकसारखीच असतात. त्यामध्ये छातीत दुखायला लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे, घाम येणे, चक्कर येणे यासारख्या कारणांचा समावेश असतो. 

अधिक वाचा - Healthy Lifestyle for Students: कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी असं ठेवावं स्वतःला फिट, फॉलो करा या Tips

ही घ्या काळजी

ज्या व्यक्ती भावनिक आहेत, त्यांना कुठलीही टोकाची बातमी किंवा घटना कळवण्यापूर्वी त्यांच्या मनाची तयारी करून घेणं आवश्यक आहे. कुठलीही चांगली किंवा वाईट बातमी कळवताना त्यांना हळूहळू त्या गोष्टीची कल्पना द्या. त्याचप्रमाणे नियमित व्यायाम आणि योग्य आहार याद्वारे आपल्या हृदयाचं आरोग्य अधिक सुदृढ करा. 

डिस्क्लेमर - ब्रोकन हार्ट सिंड्रोमबाबतची ही काही निरीक्षणं आहेत. तुम्हाला याबाबत काही गंभीर समस्या असतील, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेण्याची गरज आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी