Hypothyroidism: निराशा आणि विस्मरणाच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नका, असू शकतात गंभीर आजारांची लक्षणे

हायपोथायरॉयडिझम होण्यामागे अनेक कारणं असण्याची शक्यता सांगितली जाते. मासिक पाळीदरम्यान हार्मोन्सची कमी-जास्त होणारी पातळी, औषधांचा साईड-इफेक्ट ही प्रमुख कारणे या आजारामागे असल्याचं दिसतं.

Hypothyroidism
निराशा आणि विस्मरणाच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नका  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
 • हायपोथायरॉयडिझम हा गंभीर आजार
 • सतत निराशा, थकवा आणि चिडचिड
 • स्मरणशक्तीही होते कमी आणि येते निराशा

Hypothyroidism: जर तुम्हाला सातत्याने थकवा, उदासी, निराशा, अचानक वजन वाढणे, केस गळणे यासारख्या समस्या जाणवू लागल्या असतील, तर सावध होण्याची गरज आहे. ही हायपोथायरॉयडिझम (Hypothyroidism) या आजाराची लक्षणे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या आजारात आपल्या खांद्याच्या वरच्या भागातील म्हणजे कॉलरबोनच्या वरच्या भागात असणारी एंडोक्राईन ही ग्रंथी निष्क्रीय होते. त्यामुळे आवश्यक प्रमाणात थायरॉइड तयार होण्याची प्रक्रिया बंद होते. गेल्या काही वर्षात बदललेली लाईफस्टाईल, खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी, अपुरी झोप, ताणतणाव आणि व्यसनाधीनता यामुळे या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत चालली आहे.या लक्षणांचा सामना करणारे तुमच्या ओळखीचेही अनेक लोक तुम्हाला माहित असतील. ही समस्या पुरुषांच्या तुलतेन महिलांना अधिक सतावत असल्याचंही दिसून आलं आहे. 

ही आहे कारणं 

हायपोथायरॉयडिझम होण्यामागे अनेक कारणं असण्याची शक्यता सांगितली जाते. मासिक पाळीदरम्यान हार्मोन्सची कमी-जास्त होणारी पातळी, औषधांचा साईड-इफेक्ट ही प्रमुख कारणे या आजारामागे असल्याचं दिसतं. सुरुवातीच्या टप्प्यात हा आजार झाल्याचं लक्षात येणं अवघड असतं आणि स्थिती बिघडल्यानंतर त्यावर उपचार करणंही आव्हानात्मक असतं. लठ्ठपणा वाढणे, सांधेदुखी सुरू होणे, डिप्रेशन, वांझपणा आणि हृदयाशी संबंधिक काही विकार सुरू होणे, यासारखी लक्षणे या आजारात दिसू शकतात. 

असा ओळखा हायपोथायरॉयडिझम

कुठल्याही आजाराची पूर्ण माहिती घेतल्यावर त्याच्या लक्षणांची खातरजमा करता येत नाही. हायपोथायरॉयडिझम या आजारात कुठलीही विशिष्ट लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे हा आजार डायग्नोज करणं सहसा शक्य होत नाही. अनेकदा या आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात रुग्णांना काहीच ॲबनॉर्मल वाटत नाही. त्यामुळे नियमितपणे आपल्या आरोग्यावर लक्ष ठेवणे आणि तपासणी करून घेणे आवश्यक असते. 

अधिक वाचा - Home remedies for pimples: फंक्शनला जाण्यापूर्वी घरच्या घरी करा पिंपल्सचा इलाज, करा हे उपाय

ही आहेत लक्षणं

हायपोथायरॉयडिझम या आजाराची काही विशिष्ट लक्षणे असतात. 

 • सतत थकवा जाणवणे
 • अशक्तपणा असणे
 • प्रचंड थंडी वाजणे
 • अचानक वजन वाढणे
 • पोट साफ होण्यास त्रास होणे
 • स्नायू दुखणे आणि सांधेही दुखणे
 • सतत चिडचिड होणे
 • झोप कमी होणे
 • सेक्सची इच्छा कमी होणे
 • अनियमित आणि हेवी पिरियड्स

थेट मेंदूवर परिणाम

हायपोथायरॉयडिझम हा आजार थेट मेंदूवर परिणाम करत असल्याचं दिसून आलं आहे. मेंदूचं नियमित कार्य त्यामुळे प्रभावित होतं आणि अनेक मानसिक समस्या सुरू होऊ लागतात. थायरॉईड हार्मोन्सची पातळी खालावणं, मेमरी लॉस, अँग्झायटी, डिप्रेशन, फोकस होण्यात अडथळे येणे, भाषा विचार व भावनांमध्ये असंतुलन निर्माण होणं आणि बुद्धीमत्ता घटणं यासारखी लक्षणे या आजारात दिसू लागतात. 

अधिक वाचा - Reasons of Pimples : चेहऱ्यावर मुरुम येण्यामागची ही कारणे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

असा करा बचाव

या आजारापासून बचाव करण्याची कुठलीही विशिष्ट पद्धत नाही. मात्र जर तुमच्या मानेवर किंवा डोक्यावर काही रेडिएशन थेरपी करण्यात आली असेल, तुम्हाला किंवा कुटुंबातील सदस्यांना थायरॉईडचा त्रास असेल किंवा तुम्हाला ऑटोइम्यून आजार होऊन गेला असेल, तर सतर्क राहणे आवश्यक आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी