किस केल्याने तुम्ही आजारी पडू शकता का? जाणून घ्या काय आहे Kissing Disease आणि त्याची लक्षणे

Kissing Disease meaning, causes and symptoms: Kissing Disease संसर्ग पसरवणारे विषाणू अनेक प्रकारे आपल्याला अडचणीत आणतात. पण किस केल्याने माणूस आजारी सुद्धा होऊ शकतो हे तुम्हाला माहिती आहे का?

Representative Image
प्रातिनिधिक फोटो (Photo: pexels) 

Kissing Disease: सध्याच्या काळात धावपळीच्या आयुष्यात माणसं आपल्या आरोग्याकडे फारसं लक्ष देत नाही. त्याचा परिणाम म्हणजे विविध प्रकारचे आजार हे माणसांना आपल्या कवेत घेत आहेत. व्हायरस, बॅक्टेरियामुळे पसरणारे आजार कोणालाही घेरू शकतात. पण किस केल्याने माणूस आजारी सुद्धा होऊ शकतो हे तुम्हाला माहिती आहे का? ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या संदर्भात आम्ही तुम्हाला काही माहिती देणार आहोत.

किसिंगमुळे होणाऱ्या या आजाराला Kissing Disease असे म्हणतात. वैद्यकीय भाषेत याला इंफेक्शियस मोनोन्यूक्लियोसिस (infectious monocleosis) असेही म्हणतात. हा आजार एपस्टाईल बॅर व्हायरसमुळे होतो. जो लाळेद्वारे पसरतो. कारण हा आजार सहसा चुंबनाने पसरतो आणि त्याला किसिंग डीसीज असेही म्हणतात.

हे पण वाचा : गरोदरपणात चिंच खाल्ली तर काय होते?

Kissing Disease आहे तरी काय?

हा आजार सामान्यत: लाळेद्वारे पसरतो. जेव्हा चुंबन घेताना लोक एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा हा विषाणू एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो आणि नंतर संपूर्ण शरीरात पसरतो. तसेच हा विषाणू शरीरातील कोणत्याही द्रवातून पसरू शकतो. हा विषाणू खोकला, शिंकणे, ब्लड ट्रान्समिशन, लैंगिक संबंध यामुळे सुद्धा पसरू शकतो.

हे पण वाचा : हे 7 पदार्थ खाल तर बनाल शक्तिमान

काय आहेत लक्षणे?

सहसा हा आजार गंभीर नाहीये पण जोपर्यंत तुम्ही बरे होत नाही तोपर्यंत त्याची लक्षणे गंभीर असू शकतात. वेळेवर आणि योग्य उपचार न मिळाल्यास या संसर्गामुळे धोकादायक समस्या निर्माण होऊ शकते. या संसर्गाची लक्षणेत सौम्य ते गंभीर असू शकतात. जाणून घ्या काय आहेत लक्षणे....

हे पण वाचा : 

  1. ताप
  2. थकवा 
  3. डोकेदुखी
  4. यकृत वाढणे
  5. सुज आलेले टॉन्सिल्स
  6. घसा खवखवणे
  7. त्वचेवर पिंपल्स किंवा पुरळ

हे पण वाचा : या सवयींमुळे ऐन तारुण्यात येतो हार्ट अटॅक, तुम्हाला आहेत का या सवयी?

कसा करावा बचाव?

हा आजार टाळण्यासाठी कोणतीही लस उपलब्ध नाही. हा एक संसर्गजन्य आजार आहे. याचे रुग्ण भारतात फारच क्वचित आढळतात. खाली दिलेल्या पद्धतीने तुम्ही या आजारापासून स्वत:चा बचाव करू शकतात.

हे पण वाचा : सिझेरियन डिलिव्हरीनंतर या गोष्टी अजिबात करू नका

  1. स्वच्छता राखा
  2. तोंडाच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या
  3. दुसऱ्याची भांडी वापरू नका.
  4. इतरांसोबत अन्न किंवा पेय (ड्रिंक्स) शेअरिंग करणे टाळा
  5. जर तुम्हाला हा आजार झाला असेल तर किसिंग करू नका
  6. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आपले हात नियमित धुवा.

(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. टाइम्स नाऊ मराठी या वृत्ताला दुजोरा देत नाही. ही माहिती वैद्यकीय सल्ला म्हणून गेऊ नका. अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी