Reasons of lung cancer: काय आहे फुफ्फुसांचा कर्करोग, कशाप्रकारे करतो शरीरावर परिणाम?

तब्येत पाणी
Updated Aug 12, 2020 | 16:54 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sanjau Dutt lung cancer: बॉलिवुड अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसांचा कर्करोग झाल्याची बातमी येत आहे. काय असतो हा कर्करोग, सविस्तर जाणून घ्या.

Lung cancer
फुफ्फुसांचा कर्करोग का आणि कसा होतो? 

बॉलिवुड अभिनेता संजय दत्तला (Bollywood actor Sanjay Dutt) फुफ्फुसांचा कर्करोग (lung cancer) झाल्याची बातमी आल्याने त्याच्या चाहत्यांना (fans are shocked) मोठाच धक्का बसला आहे. सिगरेट (cigarette), विडी इत्यादी उत्पादनांवर मोठ्या अक्षरात लिहिलेले असते की ही उत्पादने आरोग्यासाठी हानीकारक आहेत (injurious to health) आणि यामुळे कर्करोग होतो (causes cancer). पण तरीही लोक आपले आयुष्य धोक्यात (take risk) घालतात. फुफ्फुसांचा कर्करोग व्यक्तीचे जीवन उध्वस्त करतो. जाणून घेऊया काय असतो हा फुफ्फुसांचा कर्करोग आणि कशाप्रकारे करतो शरीरावर परिणाम.

काय असतो फुफ्फुसांचा कर्करोग?

फुफ्फुसांच्या कर्करोगाला इंग्रजीत लंग कॅन्सर म्हणतात. सामान्यतः धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना या कर्करोगाचा धोका अधिक असतो. नावाप्रमाणे हा कर्करोग फुफ्फुसांमध्ये होतो. हा कर्करोग शरीराच्या इतर भागांमध्येही पसरू शकतो. फुफ्फुसे ही आपण घेतलेल्या श्वासातील प्राणवायू शरीरात पोहोचवतात आणि कार्बनडाय ऑक्साईड बाहेर टाकतात.

फुफ्फुसांच्या कर्करोगाचे शरीरावर होणारे परिणाम

  1. फुफ्फुसांचा कर्करोग आपल्या शरीराला पूर्णपणे पिळवटून टाकतो. तो फक्त आपल्या फुफ्फुसांवरच परिणाम करत नाही, तर आपल्या फुफ्फुसात ट्यूमर झाल्यानंतर कर्करोगाच्या पेशी तुटून जवळच नवे ट्यूमर निर्माण करू शकतात. सुरुवातीला फुफ्फुसांचा कर्करोग फक्त फुफ्फुसे आणि श्वसनसंस्थेवर परिणाम करतात, पण हळूहळू तो शरीराच्या इतर भागांमध्ये पसरू लागतो आणि शरीराला प्रचंड त्रास देतो. जाणून घेऊया हा कर्करोग कशाप्रकारे शरीरावर परिणाम करतो.
  2. श्वसनसंस्था: फुफ्फुसात कर्करोगाच्या पेशी विभागल्या जाऊन गुणाकारात वाढतात. त्यांचा एक ट्यूमर तयार होतो. कालांतराने नवे ट्यूमर्स फुफ्फुसांच्या आत किंवा आजूबाजूच्या त्वचेवरही वाढू शकतात. तसेच श्वसनमार्ग आणि छातीच्या भिंतीवरही पसरू शकतात. फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये याचे कोणतेही लक्षण न दिसणे असामान्य नाही. सुरुवातीच्या काळात फुफ्फुसांचा कर्करोग छातीच्या एक्सरेमध्येही सहजपणे दिसून येत नाही.
  3. रक्ताभिसरण संस्था आणि हृदयाचे कार्य: फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या पेशी रक्तप्रवाहातही शिरकाव करू शकतात. रक्ताभिसरण संस्थेद्वारे हा कर्करोग फुफ्फुसांमधून इतर अवयवांमध्ये पसरू शकतो. जर आपल्याला रक्ताच्या उलट्या होत असतील तर आपल्या वायूमार्गातील ट्यूमरमधून रक्तस्राव होत असल्याची शक्यता असते. हा रक्तस्राव गंभीर असल्यास तो नियंत्रित करण्यासाठी उपचार उपलब्ध आहेत.
  4. रोगप्रतिकारक शक्ती आणि उत्सर्जन संस्था: कर्करोग हा आजूबाजूच्या लिम्फ नोड्समध्ये प्रवेश करून फुफ्फुसांवर हल्ला करू शकतो. लसिका प्रणालीतून या कर्करोगाच्या पेशी इतर अवयवांपर्यंत पोहोचून नवे ट्यूमर्स तयार करू शकतात. लिम्फ नोड्समध्ये कर्करोग पसरल्याने आपल्या गळ्याचे हाड, गळा किंवा काखेत गाठी होऊ शकतात. फुफ्फुसांच्या कर्करोगात आपली मान किंवा चेहऱ्यावर सूजही येऊ शकते.
  5. केंद्रीय चेतनसंस्था: फुफ्फुसांचा कर्करोग मस्तकापर्यंत पोहोचल्यानंतर आपल्याला डोकेदुखी आणि इतर अनेक समस्या जाणवू शकतात. दृष्टीत दोष येणे, स्मृतीभ्रंशाचा त्रास, सुस्ती येणे अशी इतर न्यूरॉलॉजिकल लक्षणे दिसू शकतात.

जसजसा फुफ्फुसांचा कर्करोग आपल्या शरीराच्या इतर भागांमध्ये पोहोचतो, तशा इतरही समस्या उद्भवू शकतात. यामुळे शरीरात कमजोरीही जाणवू शकते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी