Blood Pressure: गेले काही वर्षात बदलत चाललेल्या लाईफस्टाईलमुळे (Lifestyle) अनेकांना रक्तदाबासंदर्भातील (Blood Pressure) समस्या निर्माण होतात. चुकीची लाईफस्टाईल, खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी आणि अपुरी झोप याचा आपल्या रक्तदाबावर परिणाम होत असतो. त्याचप्रमाणे वाढते ताणतणाव (Tensions) आणि त्यातून निर्माण होणारी व्यसनाधीनता (Addictions) या बाबीही रक्तदाबाशी संबंधित तक्रारी सुरू होण्यास कारणीभूत ठरतात. त्यातून काही जणांना उच्च रक्तदाबाचे तर काहींना कमी रक्तदाबाचे त्रास सुरू होतात. 120/80 हा सर्वोत्तम रक्तदाब असल्याचे मानले जातं. मात्र वयानुसार स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी किती रक्तदाब योग्य आहे, ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
अनेक लोकांना 120/80 हेच सर्वोत्तम ब्लड प्रेशर असल्याचं वाटत असतं. मात्र तज्ञांच्या मतानुसार वेगवेगळ ब्लड प्रेशर असू शकतं. वयोमानानुसार 90/60 पासून ते 145/90 या दरम्यान ब्लड प्रेशर ची रेंज असण्याची शक्यता असते. त्या त्या व्यक्तीची शारीरिक अवस्था आणि फिटनेसची लेवल या गोष्टींवर रक्तदाब अवलंबून असतो.
अधिक वाचा - Remedies for mosquitoes: ‘या’ सोप्या उपायांनी पळवून लावा डास, कधीच होणार नाही त्रास
आरोग्यतज्ञांच्या मध्ये पुरुषांसाठी रक्तदाबाची वरची पातळी ही 90/60 ते 145/90 या दरम्यान असू शकते. नवजात बालकांचे ब्लडप्रेशर हे 90/60, सहा महिन्यांपासून दोन वर्षांपर्यंतच्या मुलांचे ब्लड प्रेशर 100/70, अठरा वर्षांच्या मुलांचे ब्लड प्रेशर 120/80, चाळीस वर्षांच्या व्यक्तीचं ब्लड प्रेशर 135/80 तर याहून अधिक वयाच्या व्यक्तींचे ब्लडप्रेशर हे 145/90 पर्यंत असू शकतं.
वास्तविक, लहान वयात मुले आणि मुली यांचा रक्तदाब सारखाच असतो. टीनेजनंतर मुलींचा रक्तदाब हा मुलांच्या तुलनेत थोडा कमी होऊ लागतो. मात्र मेनोपॉज नंतर महिलांचा रक्तदाब हा पुरुषांपेक्षाही वाढण्याची शक्यता असते. पुरुष आणि महिला यांचे वय जसजसं वाढत जाईल, तसतशी त्यांच्या रक्तदाबाची रेंजदेखील वाढत जाते. मात्र प्रत्येकाच्या वैयक्तिक फिटनेस वर त्याचा रक्तदाब अवलंबून राहतो. त्यामुळे आपले ब्लडप्रेशर योग्य आहे की नाही, याची वारंवार तपासणी करत राहण्याची गरज असते.
अधिक वाचा - Saffron reality check: केशर अस्सल आहे की बनावट? असा ओळखा फरक
आपल्या रक्तात जेव्हा कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू लागते, तेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये रक्त व्हायला कमी जागा उरते. रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल साठल्याने रक्त अधिक वेगाने पंप केले जाते. त्यामुळे शरीरातील रक्ताचा दाब वाढत असतो. प्राणीजन्य पदार्थ आणि बेकरी प्रॉडक्ट्स यामुळे शरीरातील अनावश्यक कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढत असते. त्यामुळे योग्य व संतुलित आहार, आवश्यक व्यायाम आणि पुरेशी झोप या गोष्टींचे पालन केले, तर अति किंवा कमी रक्तदाबाच्या समस्येपासून दूर राहता येणे शक्य आहे.
Disclaimer: रक्तदाबाशी संबंधित आणि सामान्यज्ञानावर आधारित अशा या टिप्स आहेत. तुम्हाला याबाबत काही गंभीर समस्या किंवा प्रश्न असतील, तर तज्ञांच्या सल्ल्याने उपचार घेण्याची गरज आहे.