Uric Acid | नवी दिल्ली : युरिक अॅसिड (Uric Acid)या घटकाबद्दल सहजा चर्चा केली जात नाही. कधीतरी शेजारीपाजारी किंवा नातेवाईकात एखाद्याला डॉक्टर जेव्हा याची चाचणी करण्यास सांगतात तेव्हा हा शब्द आपल्या कानी पडतो. मात्र अलीकडच्या काळात युरिक अॅसिडचे प्रमाण वाढण्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषत: ३० व्या वर्षानंतर शरीरातील याच्या प्रमाणाबद्दल सावध राहण्याची आवश्यकता आहे. युरिक अॅसिड वाढल्यामुळे अंगदुखी, शरीरावर सूज येणे, सांधेदुखी इत्यादी तक्रारी होऊ शकतात. (What is Uric Acid, why it increase in body, how to control)
याशिवाय युरिक अॅसिड थेट किडनीच्या कार्यक्षमतेवर परिणाम करते. युरिक अॅसिडचे प्रमाण वाढल्यामुळे रक्तातील साखर आणि ह्रदयविकाराच्या रुग्णांसाठी अडचणींमध्ये वाढ होते. याचे शरीरात प्रमाण जास्त वाढल्यास रक्ता अॅसिडिकदेखील बनवते. सर्वसाधारणपणे युरिक अॅसिडची तपासणी रक्ताद्वारेच होते. मात्र याआधी युरिक अॅसिड नेमके काय असते ते जाणून घेतले पाहिजे. शिवाय ते शरीरात कसे वाढते आणि त्याचे प्रमाण कसे कमी करायचे हे देखील समजून घेऊया.
सोप्या शब्दात सांगायचे तर ते रक्तात आढळणारे एक रसायन किंवा घटक आहे. याची निर्मिती अन्नपदार्थांच्या पचन क्रियेदरम्यान होते. प्युरीनयुक्त पदार्थांमध्ये याचे प्रमाण जास्त असते. पालक, मशरुम, पोर्क, चिकन, मासे, मटण, फ्लॉवर, राजमा आणि बियर यासारख्या पदार्थांमध्ये युरिक अॅसिडचे प्रमाण जास्त असते. शरीरात तयार होणारे बहुतांश युरिक अॅसिड रक्तात मिसळते आणि उर्वरित किडनीद्वारे बाहेर टाकले जाते. मात्र जेव्हा शरीरात युरिक अॅसिडचे प्रमाण खूपच वाढते तेव्हा किडनीदेखील त्याला फिल्टर करू शकत नाही आणि मग शरीरातील युरिक अॅसिडचे प्रमाण वाढते. इथूनच विविध आजारांची सुरूवात होते.
युरिक अॅसिड वाढण्यामागे काही कारणे असतात. यात अनुवांशिकता देखील असते. याशिवाय चुकीचे खानपान हेदेखील कारण असते. फास्ट फूड, बियर, पोर्क, मासे, मटण, चिकन इत्यादी आवश्यकतेपेक्षा जास्त खाल्ल्यानेदेखील युरिक अॅसिडचे प्रमाण वाढते. अधिक वेळ रिकाम्या पोटी राहिल्याने, मधुमेह, थायरॉइड, कॅन्सर, किमोथेरेपी, स्थूलपणा, तणाव यामुळे शरीरात याचे प्रमाण वाढू शकते.
सध्या हिवाळा सुरू आहे, त्यामुळे खजूर खाणे हे योग्य ठरते. खजूर हा एक सुकामेवा आहे. खजुराला इंग्रजीत डेट्स Dates या नावाने ओळखले जाते. थंडीच्या दिवसांमध्ये खजूर खाणे शरीरासाठी अतिशय लाभदायी आहे. काही जण खजूर चावून खातात तर काही जण खजुराची पूड दुधात मिसळून ते दूध पिणे पसंत करतात. या दोन्ही पद्धतीने खजुराचे सेवन करणे शरीरासाठी लाभाचे आहे. निरोगी राहण्यासाठी दररोज मर्यादीत खजूर खाणे लाभाचे आहे.