Home remedies for Dengue : डेंग्यू असो की व्हायरल, हे आहेत जबरदस्त घरगुती उपाय...हे खाऊन वाढवा प्लेटलेट्स

Health Tips : देशातील अनेक भागात डासांचा प्रचंड प्रादुर्भाव असून डेंग्यूचे (Dengue)अनेक रुग्ण दररोज समोर येत आहेत. ताप आल्यावर किंवा तत्सम लक्षणे दिसल्यावर ताप नेमका कसला आहे, डेंग्यू की कोरोना हे समजणे कठीण आहे. जर एखाद्या व्यक्तीला लागोपाठ 3 दिवस जास्त ताप येत असेल तर डॉक्टरांच्या सल्ला घेणे किंवा तपासणी करणे योग्य ठरते. वेळवर निदान आणि वेळवर योग्य उपचार केल्यास गंभीर आजारदेखील आटोक्यात येतात. रुग्ण त्यातून बरे होऊ शकतात.

Health Tips
हेल्थ टिप्स 
थोडं पण कामाचं
  • हिवाळ्यात अनेक संसर्ग वाढतात
  • डेंग्यूचा सर्वत्र प्रादूर्भाव
  • डेंग्यूमध्ये काय काळजी घ्यावी

Precautions for Dengue : नवी दिल्ली : ऋतुमानात बदल झाले की अनेक आजार किंवा संसर्ग (Infections)पसरताना दिसतात. खास करून हिवाळा सुरू झाल्यावर अनेक आजार डोकं वर काढताना दिसतात. हिवाळा सुरू झाल्यावर अनेकांना सर्दी, ताप, खोकला या आजारांचा त्रास होताना दिसतो. सध्या देशातील अनेक भागात डासांचा प्रचंड प्रादुर्भाव असून डेंग्यूचे (Dengue)अनेक रुग्ण दररोज समोर येत आहेत. ताप आल्यावर किंवा तत्सम लक्षणे दिसल्यावर ताप नेमका कसला आहे, डेंग्यू की कोरोना हे समजणे कठीण आहे. अर्थात डेंग्यूमुळे डोकेदुखी, खूप ताप, सांधेदुखी, पोटदुखी असे आजार होतात. मात्र अशीच लक्षणे कोरोनामध्येही (Corona) दिसतात. ही लक्षणे काही जिवाणू आणि विषाणूजन्य तापांमध्येही आढळतात. सुदैवाने आता कोरोनाचे संकट आटोक्यात आले असून कोरोनाचे रुग्णदेखील कमी होत आहेत. मात्र अजूनही खबरदारीही आवश्यक आहे. जर एखाद्या व्यक्तीला लागोपाठ 3 दिवस जास्त ताप येत असेल तर डॉक्टरांच्या सल्ला घेणे किंवा तपासणी करणे योग्य ठरते. वेळवर निदान आणि वेळवर योग्य उपचार केल्यास गंभीर आजारदेखील आटोक्यात येतात. रुग्ण त्यातून बरे होऊ शकतात. डेंग्यूसारख्या आजाराबाबत काय काळजी घ्यावी ते पाहूया.(What precautions to be taken in Dengue & food for platelets)

अधिक वाचा : Bank Strike Update: पुढील आठवड्यात देशभरात बँक संप, एटीएमसह इतर सेवांवर परिणाम होण्याची शक्यता

3 दिवस खूप ताप आल्यास 

सलग ताप येत असल्यास त्याला गांभीर्याने घेतले पाहिजे. अर्थात व्हायरल किंवा कोरोना यावर थेट कोणतेही औषध नाही. मात्र काही घरगुती उपाय करून तुम्ही आरोग्याची काळजी घेऊ शकता. शिवाय यात खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. डेंग्यू असल्यास तातडीने उपचार सुरू करावेत. डेंग्यूसारख्या आजारात सर्वाधिक धोका असतो तो म्हणजे प्लेटलेट्स कमी होण्याचा. मात्र फक्त डेंग्यूमध्ये हा धोका असतो असे अजिबात नाही. इतरही अनेक व्हायरल इन्फेक्शन्स असे आहेत ज्यामध्ये प्लेटलेट्स कमी होतात. त्यामुळेच तुमच्या रिपोर्टमध्ये प्लेटलेट्स कमी झालेल्या दिसल्यास तो डेंग्यूच असेल असे समजू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याने डेंग्यूची चाचणी करून घ्या.

अधिक वाचा : Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रा रात्री राज्यात, असा असेल राहुल गांधी यांचा आजच्या यात्रेचा कार्यक्रम

सर्व प्रकारच्या संसर्गामध्ये वापरा या टिप्स 

डेंग्यूवर कोणताही विशिष्ट उपचार नाही असे अनेक तज्ज्ञ सांगतात. त्यामुळेच कोणत्याही प्रकारच्या संसर्गामध्ये काही सामान्य गोष्टींचे पालन केले पाहिजे. यात अधिकाधिक द्रव स्वरुपात आहार घेणे, पुरेशी विश्रांती घ्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेणे गोष्टी केल्या पाहिजेत.

अधिक वाचा : Viral Video : आयफेल टॉवरसमोर तरुणींनी काढले कपडे...व्हिडिओ झाला जबरदस्त व्हायरल, पाहा व्हिडिओ

प्लेटलेट्ससाठीचे घरगुती उपाय

कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन असेल तर रुग्णाने खाण्यापिण्यावर विशेष लक्ष दिले पाहिजे. डेंग्यू झाला आहे  अशी शंका असल्यास तुम्ही हिरव्या पालेभाज्या, तुळस, कोबी, पपईच्या पानांचा रस, डाळिंब, भोपळ्याची करी, दूध इत्यादी गोष्टींचा आहारात समावेश करा. या पदार्थांमुळे प्लेटलेट्स वाढवण्यास फायदा होईल. हा एक नैसर्गिक आणि सोपा पर्याय आहे. अर्थात हे करताना डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार करणे योग्य ठरते. 

(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी