उच्च रक्तदाब असल्यास काय खावे आणि काय खाऊ नये ?

What to eat and what not to eat if you have high blood pressure? : १४०/९०पेक्षा जास्तीचा रक्तदाब हा उच्च रक्तदाब म्हणून ओळखला जातो. उच्च रक्तदाब हा शरीरासाठी घातक आहे. यामुळेच उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तीने वैद्यकीय सल्ल्यानुसार वेळेवर औषधे घ्यावी आणि खाण्यापिण्याच्या पथ्याचे पालन करावे. 

What to eat and what not to eat if you have high blood pressure?
उच्च रक्तदाब असल्यास काय खावे आणि काय खाऊ नये ? 
थोडं पण कामाचं
  • उच्च रक्तदाब असल्यास काय खावे आणि काय खाऊ नये ?
  • उच्च रक्तदाब असल्यास काय खावे ?
  • उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यास न खाण्याचे पदार्थ

What to eat and what not to eat if you have high blood pressure? : शरीरात अनावश्यक कोलेस्टेरॉल वाढले की रक्तवाहिन्यांमधून पुढे सरकणे रक्तासाठी कठीण होते. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताचा दाब वाढतो. हा दाब नियंत्रणात ठेवण्याचा ताण हृदयावर येतो. उच्च रक्तदाब असलेल्या माणसाच्या धमन्यांमध्ये (रक्तवाहिन्या) रक्ताचा दाब वाढतो. सामान्य रक्तदाब हा १२०/८० असतो, त्यापेक्षा जास्त म्हणजे १३९/८९ पर्यंतचा रक्तदाब हा पूर्व उच्च रक्तदाब आणि १४०/९०पेक्षा जास्तीचा रक्तदाब हा उच्च रक्तदाब म्हणून ओळखला जातो. 

Corona Cases in Maharashtra : महाराष्ट्रात १९०३ कोरोना Active, आज ३२६ रुग्ण

उच्च रक्तदाब हा शरीरासाठी घातक आहे. यामुळेच उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तीने वैद्यकीय सल्ल्यानुसार वेळेवर औषधे घ्यावी आणि खाण्यापिण्याच्या पथ्याचे पालन करावे. 

तब्येत पाणी । वेबस्टोरी : आरोग्य

उच्च रक्तदाब असल्यास काय खावे ?

उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीने नियमितपणे मर्यादीत प्रमाणात बीट, ओवा, टोमॅटो, पालक आणि गाजर या पदार्थांचे सेवन करावे. दररोज ताजी फळे आणि ताज्या भाज्या खाव्या. आदर्श स्थितीत वैद्यकीय सल्ला घेऊन कोणता पदार्थ किती प्रमाणात खावा याचा निर्णय घ्यावा.

उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी विष आहेत ६ पदार्थ

उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यास न खाण्याचे पदार्थ

उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीने मीठ, साखर, मैदा आणि मैद्याचे पदार्थ, चहा, कॉफी, मादक पदार्थ, अल्कोहोल, मद्य (दारू), पीनट बटर हे पदार्थ खाणे टाळावे. मांसाहार टाळावा. धूम्रपान बंद करावे.  आदर्श स्थितीत वैद्यकीय सल्ला घेऊन कोणता पदार्थ मर्यादीत प्रमाणात खावा आणि कोणता पूर्ण बंद करावा याचा निर्णय घ्यावा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी