Wheatgrass Juice : व्हीट ग्रास ज्यूसने करा दिवसाची हेल्थी सुरुवात, होतील अनेक फायदे

तब्येत पाणी
Updated Apr 03, 2023 | 11:01 IST | टाइम्स नाऊ मराठी

Health Tips : व्हीटग्रास ज्यूसमध्ये आरोग्यवर्धक असे बहुगुण आहेत, ज्याचे सेवन केल्याने अनेक आश्चर्यकारक फायदे तुम्हाला होऊ शकतात. उन्हाळयात हा ज्यूस शरीर हायड्रेटेड ठेवतो तसेच शरीरातील पोषक द्रव्यांची कमतरता देखील यातून भरून निघते. जाणून घेऊयात याचे फायदे.   

व्हीटग्रास ज्यूस ने करा दिवसाची हेल्थी सुरुवात, होतील अनेक फायदे
व्हीटग्रास ज्यूसचे फायदे   |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • व्हिटग्रास ज्यूसमध्ये पोषक तत्वांचा मोठा संग्रह आहे,
  • शरीरातील आवश्यक पोषक द्रव्यांची कमतरता भरून काढण्यासाठी व्हिटग्रास ज्यूसचा वापर नक्की करून पहा.
  • जाणून घेऊयात याचे फायदे.   

Wheatgrass Juice : व्हीटग्रास ज्यूसमध्ये पोषक तत्वांचा मोठा संग्रह आहे, उन्हाळ्यात या रसाचे सेवन अत्यंत फायदेशीर आहे. तुम्हाला तुमचे शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी आणि शरीरातील आवश्यक पोषक द्रव्यांची कमतरता भरून काढण्यासाठी व्हीटग्रास ज्यूसचा वापर नक्की करून पहा. यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे, अत्यावश्यक अमीनो आम्ल तसेच लोह, जस्त आणि मॅग्नेशियम यांसारखे खनिजे आहेत, जे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत (Start your day healthy with Wheatgrass Juice, you will get more benefits)

व्हीटग्रासचे सेवन केल्याने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती सुधारतेच पण त्याबरोबरच तुमच्या प्रजनन क्षमतेचा विकास होऊन, वजन नियंत्रित ठेवणे, कोलेस्टेरॉलची पातळी कमी करणे यासारखे अनेक फायदे यामधून मिळतात

अधिक वाचा: .बीडमधील शिवपार्वती साखर कारखान्यावर ईडी आणि सीबीआयचे छापे

व्हीटग्रास ज्यूसचे फायदे 

रोगप्रतिकारशक्ती वाढवते

व्हीटग्रास ज्यूस च्या सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून अनेक रोगांपासून बचाव होऊ शकतो. एन्झाईम्स आणि अमीनो अॅसिड्स सारख्या अत्यंत महत्वपूर्ण घटकानी हे ज्यूस परिपूर्ण आहे, जे तुमच्या शरीरातील प्रदूषित आणि कार्सिनोजेन्सच्या हानिकारक प्रभावांपासून बचाव करतात. 

वजन कमी करते

व्हीटग्रास ज्यूसमध्ये सेलेनियम नावाचे एक महत्वपूर्ण खनिज असते, जे थायरॉईड ग्रंथीचे कार्य सुधारण्यास मदत करते. व्हीटग्रास वजन नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते. तसेच, यामध्ये असलेले पोषकतत्व अधिक काळ पोट भरलेले ठेवत असल्याकारणामुळे,  सारखी भूक लागणे किंवा अतिरिक्त खाण्यापासून दूर ठेवते. वजन कमी करण्यासाठी तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास व्हिटग्रास ज्यूसचे सेवन करून पहा, फरक जाणवेल. 

पचायला मदत करते

व्हीटग्रास ज्यूसमध्ये एंजाइम आणि फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे आपली पचन शक्ती सुधारण्यास मदत करते. पोट सुजणे, गॅस आणि बद्धकोष्ठता यासारख्या पाचनसंबंधित समस्या टाळण्यासाठी व्हिटग्रास ज्यूस उपयुक्त माध्यम आहे. 

अधिक वाचा : ​पुण्यातील वाहनांच्या आणि अपघातांच्या संख्येत मोठी वाढ

शरीर डिटॉक्स करते

बहुतांश लोक अयोग्य जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयीचे पालन करत असतात. अशावेळी शरीर निरोगी ठेवण्यासाठी ते डिटॉक्स करणे खूप महत्वाचे आहे. व्हीटग्रासमध्ये क्लोरोफिल असते, जे तुमचे रक्त आणि यकृत डिटॉक्स करण्यास मदत करते आणि पेशीदेखील मजबूत करते. व्हीटग्रास प्यायल्याने लाल रक्तपेशींची संख्या वाढते आणि हिमोग्लोबिनची पातळीही वाढते.

केस गळती तसेच केसांच्या संबंधित ज्या काही समस्या आहेत, त्या टाळण्यासाठी व्हीटग्रास ज्यूस हे एक अद्भुत पेय आहे. हे अँटिऑक्सिडंट्सचे समृद्ध स्त्रोत आहे आणि त्यात महत्वाचे एन्झाइम कॅटालेस आहेत, जे वृद्धत्व प्रक्रियेस विलंब करते आणि केस पांढरे होण्यास प्रतिबंध करते.  

प्रजनन क्षमता सुधारते

व्हिटग्रास ज्यूस पिण्याचा आणखी एक फायदा म्हणजे प्रजनन क्षमता सुधारते. हे ज्यूस प्यायल्याने जननेंद्रियाच्या अवयवांमध्ये रक्त प्रवाह वाढतो आणि तुमचा स्टॅमिना देखील वाढतो, ज्यामुळे प्रजनन क्षमता सुधारते.

जळजळ कमी करते

व्हिटग्रास ज्यूस शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करू शकतो. कारण त्यात फायबर, क्लोरोफिल, अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. व्हीटग्रास त्याच्या दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे रक्तस्त्राव थांबवण्यासाठी, वेदना कमी करण्यासाठी आणि जखमेच्या उपचारांना गती देण्यासाठी खूप प्रभावशाली आहे. हिरड्यांचे आजार, दात किडणे यासारख्या अनेक दंत समस्यांमध्ये जळजळ हे एक सामान्य कारण आहे. व्हिटग्रास ज्यूस प्यायल्याने तोंडाची जळजळ कमी होते. 

अधिक वाचा : ​हे 5 हेल्दी फूड्स आटोक्यात आणतील तूमचे वाढलेले वजन

 

कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते

व्हीटग्रास ज्यूसमध्ये क्लोरोफिल सारखे तत्व असल्यामुळे, तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास देखील मदत होते.

श्वसनासंबंधी आजार दूर होतात

व्हीटग्रास ज्यूसचे सेवन केल्याने तुमचे श्वसन आरोग्य सुधारते आणि सर्दी, दमा तसेच ब्राँकायटिस यांसारख्या आजारांची लक्षणे कमी होतात.

*टीप- सदर लेखात नमूद केलेले सल्ले केवळ तुमच्या सामान्य माहितीच्या उद्देशाने देण्यात आलेले आहेत. याचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून वापर करून घेऊ नयेत. तुम्हाला काही प्रश्न किंवा समस्या असल्यास सर्वप्रथम तुमच्या डॉक्टरांचा सल्ला विचारात घ्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी