लहान बाळाचे दुधाचे दात पडल्यावर काय करावं? फेकून द्यावं की ठेवावं?

Child teeth fall then what to do: लहान मुलाचे दुधाचे दात पडल्यावर काही दिवसांनी नवीन दात येतात. मात्र, लहान मुलाचे दुधाचे दात पडल्यावर काय करायला हवे? 

when child tooth teeth broken or fall then what should do read in marathi
लहान बाळाचे दुधाचे दात पडल्यावर काय करावं? फेकून द्यावं की ठेवावं?   |  फोटो सौजन्य: Times of India

Child health care in marathi: लहान मुले घरात असल्यावर एक वेगळेच वातावरण असते. मजा-मस्ती सुरू असते. लहान मुलांच्या आठवणी लक्षात ठेवण्यासाठी पालक प्रयत्न करत असतात. लहान मुलगा चालण्यास सुरुवात करतो, बोलण्यास सुरुवात करतो त्या सर्व गोष्टी आई-वडील व्हिडिओच्या माध्यमातून सेव करुन ठेवतात. मुलं मोठी झाल्यावर हे व्हिडिओ किंवा फोटोज पाहिल्यावर त्या आठवणींना पुन्हा एक उजाळा मिळतो. लहान मुलाचे दुधाचे दात पडल्यावर त्या ठिकाणी नवे दात येतात. काही पालक हे लहान मुलांचे दुधाचे दात जपून ठेवतात. तर काहींच्या मनात प्रश्न येतो की, या पडलेल्या दाताचं काय करावं? (when child tooth teeth are broken or fall then what should do read in marathi)

लहान मुलांचे दात कसे करावे प्रिजर्व

जर तुम्ही स्टेम सेल बँकिंगमध्ये आपल्या मुलाचे दुधाचे दात प्रिजर्व करु इच्छितात तर दात पडल्यावर डेंटिस्टकडून याबाबत सल्ला घेऊ शकतात. जोपर्यंत डेंटिंस्ट काही उपाय सांगत नाही तोपर्यंत गाय किंवा म्हैस यांच्या दुधात दात ठेवू शकता.

हे पण वाचा : 10वी आणि 12वीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक​

दात स्वच्छ करा

मुलाचे दुधाचे दात पडल्यावर तो साबणाने आणि पाण्याने स्वच्छ करा. यामुळे दाताला लागलेली धूळ, रक्त निघून जाईल. त्यानंतर अल्कोहोल ब्रशला लावून दात स्वच्छ करु शकता. यामुळे किटाणू निघून जातील. दात स्वच्छ केल्यावर तो पूर्णपणे सुकू द्या. त्यावरील सर्व बॅक्टेरिया निघून जातील.

दाताचं नेमकं काय करावं? 

काही लोक बाळाचे दात तुटल्यावर ते फेकून देतात तर काही लोक ते सांभाळून ठेवतात. जर तुम्ही तुमच्या मुलाचे दात प्रिजर्व करुन ठेवू इच्छित असाल तर कीपसेक बॉक्समध्ये ठेवू शकता.

हे पण वाचा : प्रभासला अ‍ॅक्टिंग नाही तर करायचं होतं 'हे' काम​

कधीपर्यंत ठेवू शकता

तुम्ही दात कशाप्रकारे प्रिजर्व करत आहात यावर सर्व अवलंबून असते की, दात कधीपर्यंत ठिक राहू शकतो.

पीडियाट्रिशियनचा सल्ला

नवभारत टाइम्सच्या रिपोर्टनुसार, नोएडाच्या पीडियाट्रिशियन स्वाती सेठ यांनी सांगितले की, दात मातीत गाढून टाकायला हवा. मात्र, जर तुम्हाला दात ठेवायचा असेल तर एखाद्या बॉक्समध्ये ठेवावा. हा दात तुम्ही मुलांना दाखवून तुम्ही त्यांना सांगू शकता की, पुढील वेळेला दात तुटला किंवा रक्त आले तर घाबरून जाऊ नका.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी