एग्ज फ्रिजिंग चा विचार केव्हा करावा?

वैद्यकीय किंवा आधुनिक तंत्रज्ञानामुळे भारतात एग्ज फ्रिजिंगकडे कल वाढतो आहे, असे स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. हृषिकेष पै म्हणाले.

WHEN SHOULD YOU CONSIDER EGG FREEZING?
एग्ज फ्रिजिंग चा विचार केव्हा करावा?  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • एग्ज फ्रिजिंग चा विचार केव्हा करावा?
  • बीज फ्रिजसाठी विशी ते तिशीपर्यंचचा  कालावधी प्रभावी
  • बीज फ्रीजिंगचे धोके कोणते?

वैद्यकीय किंवा आधुनिक तंत्रज्ञानामुळे भारतात एग्ज फ्रिजिंगकडे कल वाढतो आहे, असे स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. हृषिकेष पै म्हणाले. बीज फ्रिजिंग (Eggs Freezing) ही प्रक्रिया वाढत्या वयातील आणि जैविक बाबी टिकून ठेऊ इच्छिणाऱ्या महिलांसाठी एक वरदान तसंच सर्वोत्तम पर्याय ठरत आहे. यामार्फत, महिलांना आपले स्त्रीबीज हवे तितके वर्ष सुरक्षित ठेवता येते. शैक्षणिक, सामाजिक, आणि आर्थिक यांसारख्या कारणांमुळे बहुतांश मुली करिअरसाठी लग्न, व प्रेग्नेंसी पुढे ढकलू इच्छितात. WHEN SHOULD YOU CONSIDER EGG FREEZING?

भारतीय जीवनपद्धतीनुसार स्त्री ची प्रजननक्षमता विशीत प्रभावी असल्याकारणाने त्यादरम्यानच महिलांवर लग्न आणि कुटूंब पुर्ण करण्याची बंधने होती. मात्र आधुनिक जीवनपद्धती प्रजननतेच्या जैविक घड्याळाशी विसंगत आहे. बीज फ्रीजिंगने हे जैविक घड्याळ हवे तेव्हा सुरळीत करणे शक्य होते. 

फ्रीजिंगद्वारे स्त्री बीजातील प्रजनन क्षमतेचं सुरक्षित जतन: बीज फ्रीजिंगने अंड्यातील प्रजनन गुणवत्ता दीर्घकाळ सुरक्षित ठेवता येते. या प्रक्रियेसाठी स्त्रियांच्या गर्भ पिशवीची सोनोग्राफीद्वारे प्राथमिक तपासणी केली जाते. अंडाशयातून स्त्रीबीज परिपक्व होण्याच्या कालावधीमध्ये अंड्याच्या गुणवत्तेचा अंदाज येतो.  त्यानंतर औषधी इंजेक्शन देऊन अंडाशयात बीजांना तयार करतात, ती सोनोग्राफीच्या मदतीने काढून लॅबमध्ये त्यावर प्रक्रिया करून, अतिशीत वातावरणात ठेवतात. या प्रकाराला विट्रीफिकेशन असे म्हंटले जाते, यात द्रवरूपातील नायट्रोजनचा वापर करून अंडी द्रुतगतीने थंड करतात. त्यानंतर, अनेक वर्षे बीज फ्रीजिंग प्रक्रियेत जतन राहण्यासाठी तयार होते. 
 
बीज फ्रीजिंगची योजना: बीज फ्रिजसाठी विशी ते तिशीपर्यंचचा  कालावधी प्रभावी असतो. बीज फ्रिजिंगची प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित असून महिलेला तिचे बीज हवे तितके वर्षे गोठवून ठेवता येते. जेव्हा एखादी स्त्री गर्भधारणेचा निर्णय घेते तेव्हा ही गोठवलेली अंडी ऊबदार करून, शुक्राणूंच्या सहाय्याने लॅबमध्ये गर्भ तयार केला जातो. त्यावर प्रक्रिया करून ती गर्भाशयात सोडली जातात. कोणत्या वयात बीज फ्रिजिंग केले आहे आणि किती बीज फ्रिजिंग केले आहेत यावर निरोगी बाळ होण्याचं यश निश्चित केलं जातं. वय जर अधिक असेल, तर गर्भधारणेदरम्यान प्रीक्लेम्पसिया आणि गर्भाशयाच्या मधुमेहासारखे गुंतागुंतीचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. असे असले तरी बहुतेक प्रौढ महिलांची सुरक्षित आणि निरोगी गर्भधारणा झाली आहे. 

बीज फ्रीजिंगचा विचार कधी करावा? : बीज फ्रीजिंगचा विचार करण्याची अनेक कारणे असू शकतात. ही प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी संबंधित तज्ज्ञ, डॉक्टर्स, भ्रूणविज्ञान तज्ज्ञ हे कौशल्यपूर्ण आणि अनुभवी असणं गरजेचं आहे. कारण, बीज फ्रीजिंगची योग्यवेळ ते अचूक सांगू शकतात. 

फ्रीजींगसाठी योग्य वेळ : वैयक्तिक कारणास्तव गर्भधारणेला विलंब: बहुतांश महिला गर्भधारणेपेक्षा करिअर तसेच इतर गोष्टींना अधिक महत्त्व देण्यास इच्छुक असतात. अशा महिला  आपले स्त्री बीज गोठवून, हवे त्यावेळी गर्भधारणेसाठी वापरू शकतात. 

प्रीमेच्युअर ओव्हरियन फेलर: आरोग्याच्या अकाली समस्येमुळे, जसे की कर्करोग किंवा त्यासाठी होणारे औषधोपचार, केमोथेरपी अथवा रेडिओथेरपीमुळे बीजकोशावर परिणाम होऊन  बीज बनण्याची क्षमता गमावण्याची भीती उत्पन्न होते. तसेच, चयापचय संबंधातील विकार, वा अनुवंशिक समस्यांमुळे बीज न बनण्याचा धोका असतो, मग त्यासाठी उपाय म्हणून ही अंडी विशिष्ट पद्धतीने काढून ती अतिशीत अवस्थेत ठेवली जातात. तिचा साठा करून ठेवला जातो.  पुढील आयुष्यात त्याच महिलेला गर्भवती होण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो.

गर्भाशयाला संभाव्य धोका निर्माण करणाऱ्या व्याधी झाल्यास: गर्भाशयातील इतर अवयवांना विकार झाल्यास, त्याचा संभाव्य धोका अंडाशयाला देखील असतो. अशावेळेस, आवश्यक असलेली शस्त्रक्रिया करते दरम्यान स्त्रीबीजावर परिणाम होणार असेल, तर, त्या प्रक्रियेपूर्वी अंडी गोठविण्याचा पर्याय निवडू शकता. एखाद्या वैद्यकीय स्थितीमुळे स्त्री बीजातील सुपीकता कमी होण्याचा धोका जाणवत असेल तर तुम्ही बीज फ्रीजिंगचा मार्ग अवलंब करा.

बीज फ्रीजिंगचे धोके कोणते? : वैद्यकीय क्षेत्रामध्ये नाण्याचे लाभ आणि धोका अशा दोन्ही बाजू येतात. 

बीज फ्रीजिंग प्रक्रियेतील धोके : 

देण्यात येणाऱ्या इंजेक्शनमुळे अंडाशयात दुष्परिणाम होण्याचा धोका संभावतो: गर्भाशयाला प्रजनतेसाठी प्रवृत्त करण्यासाठी इंजेक्टेबल फर्टिलिटी ड्रग्सचा वापर केल्यामुळे, काही केसमध्ये अंडाशयात पाण्याच्या गाठी येणे, ओटीपोटात वेदना, मळमळ, उलट्या आणि अतिसार यांसारख्या समस्या उद्भवतात. 

एग रिट्राईव्हलची गुंतागुंत प्रक्रिया: बीजांडाच्या पुनर्प्राप्तीसाठी वापरल्या जाणाऱ्या तीक्ष्ण सुईमुळे मूत्राशय आणि आतड्यांना जखमा होण्याचा धोका असते. रक्तस्राव आणि युरीन इन्फेक्शन सारख्या समस्या काही महिलांना होतात. 

भावनिक जोखीम: एग फ्रीजिंग प्रक्रिया भविष्यात गर्भधारणा होण्याची आशा निर्माण करते. परंतु हमी देत नाही. जर आपण बीज फ्रीजिंगचा वापर गर्भधारणेसाठी करत असाल तर तुमचा गर्भपात होण्याचा धोका तुम्ही बीज फ्रीजिंग केलेल्या वयावर अवलंबून असतो. वयस्क महिलांमध्ये जास्त अंडी असल्याने गर्भपात होण्याचे प्रमाण जास्त असते. 

स्त्रीबीज गोठवल्यामुळे बाळामध्ये जन्मजात अपंगत्वाची जोखीम वाढते, असे आजवरच्या कोणत्याही संशोधनातून सिद्ध झालेले नाही. खर तर बीज फ्रीजिंगमुळे अंडी अनेक वर्षे ताजी आणि सुरक्षित राहू शकतात, या विषयावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे.
 
कुटुंब वाढविण्याची भावना महिलेला आनंद देते.  त्यासाठी तुम्हाला हवे तसे आणि तुमच्या इच्छेनुसार, तुम्हास हवे त्या कालावधीत डॉक्टर सहकार्य करतात. बीज फ्रीजिंग हा भविष्यातील प्रजनन सुरक्षित ठेवण्यासाठी आणि निरोगी गर्भधारणा करण्याचा एक सुरक्षित आणि प्रभावी मार्ग आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी