When to apply nail polish: मुलांना ‘या’ वयापर्यंत अजिबात लावू नका नेल पॉलिश, होऊ शकतात गंभीर आजार

लहान मुलांनादेखील नेल पॉलिशचे रंग आकर्षित करत असतात. त्यामुळे नुकतीच रांगू लागलेली मुलंदेखील त्या रंगाकडे आकर्षित होऊन आपल्याला नेलपॉलिश लावण्यासाठी आईकडे हट्ट करत असल्याचं दिसतं. आपल्या बोटांच्या नखांना नेलपॉलिश लावल्यानंतर लहान मुलं प्रचंड खूश होतात आणि आनंदाने हसू लागतात.

When to apply nail polish
मुलांना ‘या’ वयापर्यंत अजिबात लावू नका नेल पॉलिश  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • लहान मुलांना नेल पॉलिश लावणे धोक्याचे
  • नेल पॉलिशमध्ये असतात अनेक विषारी घटक
  • मुले तोंडात बोट घालत असेपर्यंत टाळा नेल पॉलिश

When to apply nail polish: महिला आणि मुली नखांचं सौंदर्य (Beauty of nails) वाढविण्यासाठी नेल पॉलिशचा (Nail Polish) उपयोग करत असल्याचं दिसतं. गेल्या काही वर्षात जवळपास प्रत्येक महिला ही नेलपॉलिशचा वापर करत असल्याचं दिसतं. मोठ्या वयाच्या महिलांपासून ते अगदी शाळकरी मुलींपर्यंत अनेकजणी नेलपॉलिशचा उपयोग करून आपल्या हातांचं सौंदर्य वाढवत असतात. अगदी लहान मुलांनादेखील नेल पॉलिशचे रंग आकर्षित करत असतात. त्यामुळे नुकतीच रांगू लागलेली मुलंदेखील त्या रंगाकडे आकर्षित होऊन आपल्याला नेलपॉलिश लावण्यासाठी आईकडे हट्ट करत असल्याचं दिसतं. आपल्या बोटांच्या नखांना नेलपॉलिश लावल्यानंतर लहान मुलं प्रचंड खूश होतात आणि आनंदाने हसू लागतात. त्यांच्या चेहऱ्यावरचा हा निखळ, निरागस आनंद पाहण्यासाठी अनेक पालक त्यांना नेलपॉलिश लावतात. मात्र लहान मुलांना नेलपॉलिश लावणं त्यांच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरण्याची शक्यता असते. लहान मुलांना नॉन-टॉक्सिक आणि सुरक्षित नेलपॉलिश वापरण्याचा सल्ला दिला जातो. अन्यथा, त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. 

हानीकारक ठरतं नेल पॉलिश

नेल पॉलिशमध्ये समाविष्ट असणाऱ्या घटकांवर ते मुलांच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरणार की नाही, हे ठरतं. बाजारात मिळणाऱ्या सर्वसाधारण नेलपॉलिशमध्ये टोलून नावाचा घटक असतो. हा घटक विषारी असतो आणि तो पोटात गेला तर त्रास होऊ शकतो. त्याचा आपल्या मेंदूवरही परिणाम होतो. त्याशिवाय त्यात प्लास्टिससईजर, हार्डनिंग एजंट आणि सॉल्व्हेटदेखील असतात, ज्यामुळे आपलं नुकसान होण्याची शक्यता असते. 

अधिक वाचा - Hypothyroidism: निराशा आणि विस्मरणाच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नका, असू शकतात गंभीर आजारांची लक्षणे

कुठल्या वयात नेलपॉलिश योग्य?

जेव्हा तुमची मुलं आपला हात किंवा बोटं तोंडात घालून चोखणं बंद करतील, त्यानंतरच त्यांना नेलपॉलिश लावणं योग्य ठरेल. तोपर्यंत त्यांच्या नखांना अजिबात रंग लावू नका. बोटं तोंडात घातल्यामुळे नेल पॉलिशमध्ये असणारे विषारी घटक पोटात जाऊ शकतात आणि मुलांना त्याचा त्रास होऊ शकतो. 

कपड्यांवरही पॉलिश लावू नका

काहीजणांना नखांऐवजी मुलांच्या कपड्यांना नेलपॉलिश लावलं, तर त्यांना धोका पोहोचणार नाही, असं वाटत असतं. त्यामुळे नखांऐवजी ते मुलांच्या कपड्यांना नेलपॉलिश लावतात. मात्र असे प्रकारही टाळणं गरजेचं आहे. शिवाय मुलांपासून काही अंतर ठेवून महिलांनी नेल पॉलिश लावणं आवश्यक आहे. त्यामुळे त्याचा उग्र वास मुलांच्या नाकात जाऊन त्यांना त्रास होणार नाही. 

अधिक वाचा - Home remedies for pimples: फंक्शनला जाण्यापूर्वी घरच्या घरी करा पिंपल्सचा इलाज, करा हे उपाय

घ्या काळजी 

मुलांपासून नेल पॉलिश नेहमी दूर ठेवा. मुलं थोडी मोठी झाल्यानंतर त्यांना जरी नेल पॉलिश लावलं, तरी ते पूर्ण सुकेपर्यंत त्यांना तुमच्याजवळ बसवून ठेवा आणि त्यांच्यावर लक्ष ठेवा. मुलं तोंडात बोट घालणार नाहीत किंवा नाकात बोट घालणार नाहीत, याची काळजी घ्या. नॉन-टॉक्सिक नेलपॉलिश मिळालं, तरी वारंवार ते मुलांना लावू नका. त्यामुळे त्यांची नखं खराब होण्याची शक्यता असते. 

डिस्क्लेमर - नेल पॉलिशबाबत देण्यात आलेल्या या टिप्स सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी