Hair Care Tips : केसांना तेल कधी लावायचे हे माहित आहे का? चुकीच्या वेळी लावल्याने गळतात केस

Hair Care : सुंदर, मुलायम, दाट, काळेभोर केस (Beautiful Hair)असल्यास कोणाचेही व्यक्तिमत्त्व खुलून येते. मात्र अलीकडच्या काळात केसांच्या समस्यांनी (Hair Problems) उग्र रुप धारण केले आहे. अर्थात ही समस्या पुरुष आणि महिला दोघांमध्येही आढळून येते. केसांना तेल लावल्याने (Hair Oiling) केस मजबूत होतात कारण जेव्हा आपण केसांना तेलाने मसाज करतो तेव्हा ते आपल्या मुळांना पोषण देते. पण अशा काही परिस्थिती आहेत ज्यात केसांना तेलाने मसाज करू नये. त्यामुळेच तुम्ही या बाबींबाबत जागरुक असणे महत्वाचे आहे.

Hair Care Tips
केसांचे आरोग्य 
थोडं पण कामाचं
  • सुंदर, मुलायम, दाट, काळेभोर केस प्रत्येकालाच हवे असतात
  • अलीकडच्या काळात केसांच्या समस्यांनी (Hair Problems) उग्र रुप धारण केले आहे.
  • अशा काही परिस्थिती आहेत ज्यात केसांना तेलाने मसाज करू नये.

When to apply oil on hair : नवी दिल्ली : सुंदर, मुलायम, दाट, काळेभोर केस (Beautiful Hair)असल्यास कोणाचेही व्यक्तिमत्त्व खुलून येते. मात्र अलीकडच्या काळात केसांच्या समस्यांनी (Hair Problems) उग्र रुप धारण केले आहे. अर्थात ही समस्या पुरुष आणि महिला दोघांमध्येही आढळून येते.  केसांना तेल लावल्याने (Hair Oiling) केस मजबूत होतात कारण जेव्हा आपण केसांना तेलाने मसाज करतो तेव्हा ते आपल्या मुळांना पोषण देते. पण अशा काही परिस्थिती आहेत ज्यात केसांना तेलाने मसाज करू नये. त्यामुळेच तुम्ही या बाबींबाबत जागरुक असणे महत्वाचे आहे. तेल लावण्यासंदर्भातील महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेऊन तुम्ही तुमची केसांची काळजी घेण्याची चुकीची सवय वेळीच बदलू शकता. नाहीतर तुम्हाला केसगळतीला सामोरे जावे लागते. आज आम्ही तुम्हाला कोणत्या स्थितीत केसांना तेल लावू नये याबद्दल सांगणार आहोत. त्याबद्दल जाणून घेऊया. (When to apply oil on hairs for better results)

अधिक वाचा : Ganesh Chaturthi 2022: मस्तकहीन गणेशाची केली जाते पूजा, केदारनाथजवळ आहे हे रहस्यमय बाप्पाचे मंदिर

केस हे आपल्या व्यक्तिमत्त्वातील अत्यंत महत्त्वाची बाब असते.  आपल्या सगळ्यांनाच वाटते की गळणाऱ्या केसांमुळे फक्त महिलांनाच त्रास होतो. पण तसे नाही आजकाल पुरुषांनाही चुकीचा आहार, तणावामुळे केस गळण्याची (Hair Loss) समस्या भेडसावत आहे. 

केसांना तेल लावण्यासंदर्भातील टिप्स- 

तेलकट त्वचा
जर तुमच्या डोक्यावरील त्वचा तेलकट राहिली तर केसांना जास्त तेल लावू नये. तेलकट त्वचेला तेल लावल्यास त्वचेवर केसांखाली जास्त घाण जमा होऊ लागते. त्यामुळे केस पूर्वीपेक्षा जास्त तुटायला लागतात आणि ही सवय वेळीच बदलली नाही तर केस गळण्याची शक्यता असते.

अधिक वाचा : मंचावर झालेल्या नाराजीनाट्यावर इम्तियाज जालील यांनी प्रतिक्रिया, शिरसाटांना दिला सबुरीचा सल्ला

डोक्यातील कोंडा

जर तुमच्या केसांमध्ये कोंड्याची समस्या असेल तर अशा परिस्थितीत तेल लावू नये. अशा स्थितीत तेल लावल्याने केसांमधील कोंड्याची समस्या आणखी वाढू शकते.

फोड असल्यावर

कधीकधी डोक्यावर केसांखाली फोड येतात. या अवस्थेत केसांना तेल लावल्यास फोड आणखी पसरतात आणि ते लवकर बरे होण्यातही अडचण येते.

अधिक वाचा : Income Tax : आयकर विभागाच्या धाडीनंतर अभिजीत पाटलांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

केस धुतल्यानंतर
केस धुण्यापूर्वी नेहमी केसांना तेल लावा. केस धुण्याच्या किमान 1 तास आधी केसांना तेलाने मसाज केल्याने केसांना फायदा होतो. उत्तम म्हणजे केस धुण्याच्या एक रात्री आधी केसांना मालिश करावी.

पावसाळा हा आपल्या केसांच्या आरोग्यासाठी सर्वात वाईट मानला जातो. हवामानातील आर्द्रतेमुळे केस तुटण्यास सुरुवात होते, त्यामुळे या ऋतूत केसांची चांगली काळजी घेणे (Hair care) खूप गरजेचे आहे. पावसाळ्यात केस वारंवार धुणे टाळा कारण टाळूवरील ओलावामुळे ते कोरडे आणि निर्जीव होतात आणि गळू लागतात. 

(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी