मुंबई: ब्लॅक टी(black tea) म्हणजेच काळा चहा पिण्याचे फायदे साऱ्यांनाच माहीत आहे मात्र हा चहा पिण्याची योग्य वेळ फार कमी लोकांनाच माहिती असेल. ब्लॅक टी योग्य वेळेत प्यायल्याने अनेक रोग दूर होतात. खरंतर लोक ब्लॅक टी कधीही पितात. काहींना मनाला येईल तेव्हा चहा पिण्याची सवय असते. मात्र जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी चहा पित असाल तर योग्य वेळेतच ब्लॅक टी पिणे गरजेचे असते.
जर तुम्हाला काळा चहा आवडत असेल तर तुम्ही दिवसा हा चहा घेऊ शकता. रात्रीच्या वेळेस झोपण्याआधी ब्लॅक टी प्यायल्यास तुमची झोप उडू शकते. दिवसा तुम्ही याचे सेवन करू शकता. यामुळे तुम्हाला अनेक फायदे होतील.
ब्लॅक टी जेवणानंतर घेतल्यास जेवण पचण्यास मदत होते. नाश्ता आणि दुपारच्या जेवणानंतर ३० मिनिटांनी एक कप ब्लॅक टी पिण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे निश्चितच तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल.
ब्लॅक टी पिण्यासाठी शरद ऋतू आणि थंडीचा महिना खास आहे. या मोसमात ब्लॅक टी प्यायल्यास आपल्या शरीरास याचा फायदा होतो. दिवसभरात जेव्हाही चहा प्याल तो काळा चहा प्या.
कमी वयाच्या लोकांपेक्षा वाढत्या वयाच्या लोकांना थंडीत चहा अधिक हवा असतो. शरीर गरम ठेवण्यासाठी तसेच रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी तुम्ही ब्लॅक टीचे सेवन करू शकता.
चांगल्या आरोग्यासाठी थंडीमध्ये ब्लॅक टी पिण्याची सवयय लावून घ्या. ही सवय तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करेल.