Weight Loss Tips:कधी घ्यावे रात्रीचे जेवण?

तब्येत पाणी
Updated Jan 11, 2021 | 19:21 IST | टाइम्स नाऊ मराठी

असं म्हणतात की रात्री उशिरा जेवण जेवल्याने वजन वाढते. मात्र खरंच रात्री उशिरा जेवल्याने वजन वाढते का?

food
Weight Loss Tips:कधी घ्यावे रात्रीचे जेवण? 

थोडं पण कामाचं

  • वजन घटवण्यासाठी तुम्ही किती कॅलरीजचे सेवन करा आणि व्यायाम गरजेचा असतो 
  • आपले रात्रीचे जेवण आणि झोप यांच्यात कमीत कमी दोन तासांचे अंतर असावे. 
  • आपले मेटाबॉलिज्म ही एक जटिल प्रक्रिया आहे.

मुंबई: तुम्ही अनेकांकडून ऐकले असेल की वजन वाढण्यापासून(weight gain) वाचण्यासाठी संध्याकाळी ७ नंतर भोजन करू नये. रात्री उशिरा जेवल्याने वजन वाढते. आपल्या शरीराला सातत्याने एनर्जीची(energy) गरज असते. केवळ जागे असतानाच नव्हे तर आराम करत असतानाही आपल्याला एनर्जीची गरज असते. रात्री उशिरा जेवल्यानंतर जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्या शरीरात रक्ताचा प्रसार होण्यासाठी, फुफ्फुसांचे काम करण्यासाठी आणि आपल्या मेंदूला एनर्जी देण्यासाठी कॅलरी बर्न होत राहतात. यासाठी जेव्हा वजन वाढवण्याबाबत तसेच घटवण्याबाबत सांगितले जाते तेव्हा दिवसांच्या कोणत्या वेळी भोजन करत आहात हे महत्त्वाचे नसते तर तुम्ही काय खात आहात हेही गरजेचे असते. 

रात्री उशिरा जेवण करणे हेल्दी आहे का?

आपले मेटाबॉलिज्म ही एक जटिल प्रक्रिया आहे. लोकांना वाटते दिवसांच्या अखेरीस चयापचय क्रिया अत्यंत धीमी होऊन जाते. यासाठी शरीरात रात्री जेवल्यानंतर आपल्या कॅलरीज बर्न होत नाहीत. जरी आपण रात्री आराम करत असलो तरी मेटाबॉलिज्मची प्रक्रिया धीमी होऊन जाते. मात्र हे काम करणे बंद करत नाही. इतकंच की झोपतानाही. 

रात्रीच्या जेवणाने वजन वाढत नसल्याचे संशोधनावरून समजले आहे. तुम्ही किती कॅलरीज घेता यावर तुमचे वजन अवलंबून असते. तुम्ही दिवसा अथवा रात्री योग्य  प्रमाणात कॅलरीज घेतल्याने यावर वजन घटवणे अवलंबून असते. त्यामुळे तुम्ही दिवसा जास्त भोजन घेतल्यास रात्रीचे कमी जेवा. अथवा रात्रीचे जास्त जेवत असल्यास दिवसा कमी खा. वजन घटवणे हे पूर्णपणे तुमच्या कॅलरीज घेण्यावर तसेच व्यायामावर अवलंबून असते. जे लोक रात्रीचे जेवण करतात ते जास्त कॅलरीज घेतात. तुम्ही जर अशा लोकांपैकीएक आहात तर दिवसा कमी कॅलरीज जातील याकडे लक्ष द्या.

झोपण्याच्या कमीत कमी दोन ते तीन तास आधी भोजन करणे चांगले मानले जाते. अथवा कमी कॅलरीज असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. ज्यामुळे ते पचण्यास हलके होईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी