Pregnancy tips in Marathi: गरोदरपणात खाण्या-पिण्याच्या गोष्टींवर विशेष भर दिला जातो. कारण, काही असे पदार्थ असतात जे गर्भवती महिलेला आणि गर्भातील बाळाच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे बाळाच्या आरोग्यासाठी गर्भवती महिलेने तिच्या आरोग्याकडे, खाण्या-पिण्याकडे विशेषत: लक्ष दिले पाहिजे. जाणून घ्या गरोदरपणात कोणते पदार्थ खाऊ नयेत आणि त्याचा आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो?...
कच्च्या पपईत लेटेक्स असते ज्यामुळे गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात गर्भपात होण्याचा धोका वाढतो. पपईत पपेन सुद्धा असते जे गर्भाच्या विकासात अडथळा निर्माण करु शकते. त्यामुळे गरोदरपणात पपई खाणे टाळावे.
(Photo Credit: Pixabay)
हे पण वाचा : भुवयांचे केस का गळतात?
गरोदरपणात महिलेने द्राक्षे खाऊ नयेत कारण द्राक्षांचा प्रभाव उष्ण असतो आणि त्यामुळे गर्भासाठी ते धोकादायक ठरू शकते. द्राक्षांच्या अतिसेवनामुळे अवेळी प्रसूती होण्याचा धोका वाढतो.
(Photo Credit: iStock Images)
हे पण वाचा : गर्भवती महिलांनी डाळिंब खाण्याचे असंख्य फायदे
तुळशीच्या पानांमुळे गर्भवती महिलेच्या गर्भाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. कारण या पानांमध्ये एस्ट्रोगोल असते आणि ते गर्भपात होण्यास कारणीभूत ठरू शकते. इतकेच नाही तर तुळशीच्या पानांचा महिलांच्या मासिक पाळीवरही परिणाम होतो.
(Photo Credit: iStock)
हे पण वाचा : रिफाईंड तेलामुळे होतात हे आजार, तुम्ही सुद्धा वापरता?
गरोदरपणात अननस खाणे धोक्याचे ठरू शकते. अननसामध्ये ब्रोमेलिन असते ज्यामुळे लवकर प्रसूती होण्याची शक्यता अधिक वाढते.
(Photo Credit: iStock Images)
गरोदरपणात धूम्रपान किंवा अल्कोहोलचे सेवन करू नये. कारण, याच्या सेवनाने गर्भातील बाळाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
हे पण वाचा : ही औषधी वनस्पती घशाच्या समस्यांवर रामबाण उपाय
गरोदरपणात जास्त प्रमाणात कॉफी किंवा चहा पिऊ नका. यामध्ये कॅफिनचे प्रमाण अधिक असते जे गर्भातील बाळाच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
(Photo: BCCL)
चायनीज फूडमध्ये मोनो सोडियम ग्लुटामेट (एमएसजी) असते ज्यामुळे बाळाच्या जन्मानंतर काही प्रकारची शारीरिक कमतरता दिसून येते. तर सोया सॉसमध्ये मिठ अधिक प्रमाणात असते आणि त्यामुळे गरोदर महिलेला उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो.
(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ला म्हणून घेऊ नका. या संदर्भात आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)