Beauty Tips in Marathi : तजेलदार त्वचेसाठी मेकअपची महागडी उत्पादने नाही तर ३ ज्युस महत्त्वाचे

which juice is good for skin glow Beauty Tips in Marathi Skin Care Tips in Marathi : मेकअपची उत्पादने वापरण्यापेक्षा नैसर्गिक पद्धतीनेच आपण त्वचेची व्यवस्थित काळजी घेऊ शकतो. आपली त्वचा तजेलदार राहील अशी व्यवस्था करू शकतो.

which juice is good for skin glow Beauty Tips in Marathi Skin Care Tips in Marathi
Beauty Tips in Marathi : तजेलदार त्वचेसाठी मेकअपची महागडी उत्पादने नाही तर ३ ज्युस महत्त्वाचे  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Beauty Tips in Marathi : तजेलदार त्वचेसाठी मेकअपची महागडी उत्पादने नाही तर ३ ज्युस महत्त्वाचे
  • तजेलदार त्वचेसाठी प्यायचे तीन ज्युस
  • चेहऱ्यावरच्या तारुण्यपीटिका आणि मुरुमांचा त्रास कमी करण्यासाठी....

which juice is good for skin glow Beauty Tips in Marathi Skin Care Tips in Marathi : मॉडेलिंग करायचे असो वा नसो, अभिनयाच्या क्षेत्रात काम करायचे असो वा नसो प्रत्येकाला आपण सुंदर दिसावे, आपली त्वचा तजेलदार दिसावी असे वाटते. त्वचेला जपण्यासाठी अनेकजण महागड्या मेकअपच्या उत्पादनांचा वापर करतात. पण मेकअपची उत्पादने वापरण्यापेक्षा नैसर्गिक पद्धतीनेच आपण त्वचेची व्यवस्थित काळजी घेऊ शकतो. आपली त्वचा तजेलदार राहील अशी व्यवस्था करू शकतो. यासाठी आवश्यक आहे सहा ते आठ तासांची झोप आणि हेल्दी डाएट. 

पचायला जड असलेले पदार्थ, बेकरी उत्पादने, मैद्याचे पदार्थ, तेलकट आणि तुपकट पदार्थ खाणे टाळणे हे त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. तंबाखू, मावा, गुटखा, अंमली पदार्थ यांचे सेवन टाळणे तसेच चहा-कॉफीचा अतिरेक टाळणे त्वचेच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. धूम्रपान आणि मद्यपान ही व्यसने टाळली तर त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते. ही काळजी घेण्याव्यतिरिक्त तीन ज्युस पिऊन पण आपण त्वचा तजेलदार राहील अशी व्यवस्था करू शकता.

नारळ पाणी उन्हाळ्याच्या दिवसात सर्वात फलदायी पेय

नारळपाणी पिण्याचे फायदे

आरोग्य - वेबस्टोरी

तजेलदार त्वचेसाठी प्यायचे तीन ज्युस

  1. संत्र्याचा ज्युस : व्हिटॅमिन सी मिळते. त्वचा तजेलदार होण्यास मदत मिळते. शरीरासाठी लाभदायी असलेले कॅरोटेनॉइड (carotenoid) मिळते. चेहऱ्यावरच्या तारुण्यपीटिका आणि मुरुमांचा त्रास कमी होतो.
  2. डाळिंबाचा ज्युस : व्यक्ती आणखी तरुण भासते. त्वचा तजेलदार होण्यास मदत मिळते. त्वचेशी संबंधित अनेक विकार बरे होण्यास मदत मिळते. सुरकुत्या कमी होतात. वयपरत्वे त्वचा सैल होण्याचा नैसर्गिक वेग मंदावण्यास मदत मिळते.
  3. अॅलोव्हेरा ज्युस : व्यक्ती आणखी तरुण भासते. त्वचा तजेलदार होण्यास मदत मिळते. सुरकुत्या कमी होतात. वयपरत्वे त्वचा सैल होण्याचा नैसर्गिक वेग मंदावण्यास मदत मिळते. त्वचेला घातक असलेली विषद्रव्ये शरीराबाहेर टाकण्याच्या प्रक्रियेचा वेग वाढतो. त्वचेशी संबंधित अनेक विकार बरे होतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी