N-95 Mask: N-95 मास्क नाही तर मग कोणता मास्क आपलं कोरोनापासून संरक्षण करेल?

N-95 Mask Issue: कोरोना संक्रमणावर अद्यापही लस तयार झालेली नाही त्यामुळे आता मास्क हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. त्यामुळे नेमका कोणता मास्क हा आपल्यासाठी योग्य आहे हे आम्ही आपल्याला सांगणार आहोत. 

corona_mask
N-95 मास्क नाही तर मग कोणता मास्क कोरोनापासून संरक्षण करेल? (Source: Pixabay)  

थोडं पण कामाचं

  • W-95 मास्क हा एक चांगला पर्याय असू शकतो 
  • एफएफपी 1 मास्क हा देखील कोरोना विषाणूपासून करु शकतो संरक्षण
  • N-95 मास्कच्या गुणवत्तेवर सरकारने उपस्थित केले आहेत प्रश्न

मुंबई: कोरोनापासून बचाव करण्यासाठी काही दिवसांपूर्वी N-95 मास्क (N-95 Mask) अधिक चांगला मानला जात होता. परंतु आत सरकारनेच त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे आता लोक त्याच्या वापराबद्दल संशय व्यक्त करु लागले आहेत. तसेच आता सर्वात प्रभावी मास्क नेमका कोणता? असाच प्रश्न आता सगळ्यांना पडला आहे. जो मास्क आपलं कोरोनापासून रक्षण करेल?

FFP1 मास्क हा चांगला पर्याय

घरगुती किंवा खरेदी केलेला सर्जिकल किंवा कपड्याचा मास्कचा वापर हा आपल्याला कोरोना व्हायरसपासून वाचवू शकतो. FFP1 मास्क हा श्वासोच्छवासाच्या मास्कचा पुढील सर्वोत्तम पर्याय मानला जात आहे. या मास्कमुळे नाक आणि तोंड हे अधिक घट्टपणे झाकलं जातं. हा मास्क ९५ टक्के संरक्षण प्रदान करतं.

W-95 हा उत्तम पर्याय असू शकतो का?

N-95 मास्कवर सरकारने प्रश्न उपस्थित केल्यानंतर आता लोकांचं अनेक प्रकारचे मास्क लक्ष वेधून घेत आहेत. त्यापैकी W-95 मास्क आहे. सध्या बाजारात  W-95 मास्कबाबत बरीच चर्चा सुरु आहे. चांगली बाब म्हणजे हा मास्क साथीच्या काळात सर्वात संरक्षण देतं आणि ते आरामदायी सुद्धा आहे. W-95 मास्कमध्ये संरक्षित कपड्यांचे अनेक स्तर आहेत ज्यात संरक्षणासाठी नाकाजवळ एक क्लिप देखील आहे. असा अंदाज आहे की हा मास्क ९५ टक्के विषाणूंना आपल्यापासून लांब ठेऊ शकतं आणि संक्रमणापासून चांगली सुरक्षा देऊ शकतं.

सुरक्षेसाठी अशाप्रकारे लावा मास्क
 
जर मास्क योग्यरित्या लावला नाही तर तर त्याचा प्रभाव नगण्य असणार आहे. बाजारात विविध प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत. एक चांगला मास्क म्हणजे जो आपलं  व्हायरसपासून रक्षण करतो. यासाठी आवश्यक आहे की मास्क व्यवस्थित आपल्या चेहऱ्यावर बसू शकेल. पूर्णपणे नाक आणि तोंड झाकून ठेवा. त्यास छिद्र नसावेत. सर्व प्रथम, हे सुनिश्चित करा की आपल्याकडे जे काही मास्क आहेतते सैल नसावे. तसंच मास्कला स्पर्श करणे टाळा. कोरोना टाळण्यासाठी मास्क लावण्यासह लोकांपासून योग्य अंतर ठेवा. हे आपल्या सुरक्षेसाठी खूप महत्वाचे आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी