Updated Mar 23, 2023 | 19:52 IST
| टाइम्स नाऊ मराठी
Weight Loss Tips : जर तुम्ही वाढत्या वजनाच्या समस्येमुळे नाश्त्यात पराठा खाणे बंद केले आहे, तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे.
काय आहे योग्य? पराठा की कॉर्नफ्लेक्स्  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
पराठा घरी बनवण्यात येत असल्यामुळे तो फ्रेश आणि ताजा असतो.
अन्नधान्याच्या स्टार्चपासून हे सिरियल पदार्थ प्रोसेस केले जातात,
आजच्या काळात वजन वाढीच्या भीतीमुळे बहुतांश लोकांनी पराठा खाणे बंद केले आहे.
Weight Loss Diet Foods पराठा खाऊन सुद्धा वजन कमी करता येऊ शकते, असे जर आम्ही तुम्हाला सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरंच शक्य आहे. पूर्वी नाश्त्यासाठी प्रत्येक घराघरात पराठा खाल्ला जायचा, पण आजच्या काळात वजन वाढीच्या भीतीमुळे बहुतांश लोकांनी पराठा खाणे बंद केले आहे. (Which one is better for breakfast cornflakes or paratha?)
पराठा हा आरोग्यासाठी चांगला नाही असे गृहीत धरून कॉर्न फ्लॅक्स्, ओट्स यांसारखे सिरियल पदार्थ आता नाश्त्याला दिसू लागले आहेत. शिवाय, ऑफिसला जाणाऱ्या लोकांकडे नाश्ता बनवायला वेळ मिळत नसल्यामुळे ते रेडिमेड सिरियल नाश्ता घेणे पसंत करतात. हे लोकं पराठापेक्षा झटपट बनतील अशा सिरियल पदार्थांना अधिक प्राधान्य देतात. पण हे पदार्थ आरोग्यासाठी खरंच चांगले आहेत का? आज आपण याबद्दल जाणून घेऊयात.
कॅलरी नुसार गुणवत्ता
जर तुम्ही 100 ग्रॅमच्या पराठ्याला 5 ग्रॅम इतके तूप किवा तेल वापरत असाल किंवा 100 ग्रॅम ची चपाती 5 ग्रॅम लोणीबरोबर खालली तर जवळपास 200-250 इतकी कॅलरी तुम्हाला मिळते. पराठयाचा आकारमान आणि शिजवण्याच्या पद्धतीकडे देखील विशेष लक्ष द्यायला हवे. पराठा छोट्या डिश इतका असायला हवा. असा पराठा जर खालला तर त्याचे पौष्टिक मूल्य कॉर्न फ्लेक्स् हून अधिक होते आणि पोटसुद्धा बऱ्याच वेळ भरलेल राहतं.
हेच जर आपण अर्धा कप कॉर्न फ्लेक्स् घेतले तर ते 1 कप पराठयाइतका होईल. आणि ते खाऊन पोटसुद्धा भरत नाही. हे जर ओट्सबद्दल बोलायला गेलो तर केवळ 2 चमचे म्हणजेच पाऊन कप इतकेच होईल, आणि त्याने देखील पोट भरणार नाही. 100 ग्रॅम कॉर्न फ्लेक्स् जर दुधाबरोबर घेतले तर जवळपास 300 कॅलरीज होतात, जे एका पराठ्यापेक्षा खूप जास्त आहे. या सर्व पदार्थात नट्स आणि फुट्सचा देखील समावेश केला तर कॅलरी काऊंट आणखीन जास्त वाढेल. हेच जर एक पराठा चांगली भाजी टाकून बनवला तर तो खाण्यासाठी पौष्टिक आणि ताजा असेल.
पराठा बनवताना या गोष्टींची काळजी घ्या
पराठा कधीच रिफाइन ऑइलमध्ये बनवू नका, असे केल्याने तो आरोग्यासाठी चांगला राहणार नाही. रिफाईन तेल पोटाचे आरोग्य बिघडवते, आपल्या पंचणसंस्थेचे कार्य देखील मंदावते. म्हणून तूप भरपू प्रमाणात वापरलं तर चालतं असे नाही. चपाती कोरडी शेकून ती 5 ग्रॅम सफेद मलईसोबत खाऊ शकतात. पराठा बनवण्यासाठी 5 ग्रॅम इतके तूप पुरेसे आहे. त्याहून जास्त तुपाचा वापर करू नये. तूप असो वा मलई असो 5 ग्रॅम इतकेच फॅट योग्य आहे.
वेटलॉससाठी पराठा योग्य आहे कि कॉर्न फ्लेक्स्? दोघांच्या कॅलरीजची मोजणी कीती आहेत आणि दोघांमध्ये काय जास्त पौष्टिक आहे, याबद्दल जाणून घेऊयात.
पराठा घरी बनवण्यात येत असल्यामुळे तो फ्रेश आणि ताजा असतो. पराठा आपण वेगवेगळ्या पिठामध्ये बनवू शकतो. वेगवेगळ्या भाज्यांचा, कड धान्यांचा किंवा पनीर टाकून आपण अती पौष्टिक असा पराठा आपण बनवू शकतो.
पराठ्याच्या स्टफिंगसाठी शरीराला पौष्टिक असे पदार्थ निवडावे. बटाटा आरोग्यासाठी चांगला नसल्यामुळे, स्टफिंगसाठी बटाटा शक्यतो टाळावाच. तुम्ही त्याऐवजी डाळ, भाज्या किंवा पनीरचा वापर करू शकता. यामुळे तुम्हाला जीवनसत्वदेखील मुबलक प्रमाणात मिळेल.
नाचणी किंवा ज्वारीच्या पिठापासून बनवलेल्या पराठ्यामधून मोठ्या प्रमाणात फायबर मिळते. या पराठ्यांमुळे पोट देखील जास्त वेळ भरून राहते, ज्यामुळे लवकर भूक लागत नाही, लोणच्याबरोबर हा पराठा खाण्यास रुचकर लागतो.
कॉर्नफ्लेक्स् बद्दल किंवा इतर कोणत्याही सिरीयल पदार्थाबद्दल बोलायला गेलं तर पराठ्याच्या तुलनेमध्ये कमी पौष्टिक आहे. सर्वाधिक फायबर आणि अर्वाधिक प्रोटिन असे म्हणत त्यांना बाजारात उतरवले गेले आहे
अन्नधान्याच्या स्टार्चपासून हे पदार्थ प्रोसेस केले जातात, त्यामुळे कोणतेही प्रोसेस केलेले पदार्थ शरीरसाठी घातकच असतात.
जर गव्हाचे सिरीयल असेल तर ते गव्हापासूनच बनवले जाते, ज्याची 7 ते 15 महीने इतकी जुनी एकसपायरी झालेली असते. घरात एका दिवसाचा राहिलेला शिळा पराठा दुसऱ्या दिवशी आपण खात नाही. त्यामुळे तसे पाहायला गेले तरी कॉर्नफ्लेक्स् पराठ्याहून योग्य होत नाही.
कॉर्नफ्लेक्स्मध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात. ज्यात ग्लुकोजची पातळी वाढवण्याची क्षमता अधिक असते. याचे सेवन केल्याने खूप लवकर भूक लागते.
सिरियल पदार्थांची गुणवत्ता त्यात लोह कीती प्रमाणात आहे यावरून ठरवली जाते. जर तुम्ही दुधाबरोबर लोहयुक्त पदार्थाचे सेवन केले तर शरीर ते असेही घेणार नाही.
कॉर्नफ्लेक्स् साठवणूक केलेला पदार्थ असल्याकारणामुळे शरीराला काही प्रमाणात तो घातक ठरू शकतो.