Covaxin की Covishield, कोणत्या लसीमुळे तयार होत आहेत जास्त अँटीबॉडीज, काय सांगतो नवा रिसर्च

देशात कोरोनाच्या प्रसारावर नियंत्रण आणण्यासाठी कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक व्ही या लसींद्वारे लसीकरण सुरू आहे. यी लसींबद्दल लोकांच्या मनात अजूनही प्रश्न आहेत. लसींच्या परिणामांबद्दल लोक उत्सुक आहेत.

Corona vaccine
Covaxin की Covishield, कोणत्या लसीमुळे तयार होत आहेत जास्त प्रतिजैविके, काय सांगते नवे संशोधन 

थोडं पण कामाचं

  • COVATने 552 आरोग्य कर्मचाऱ्यांवर दोन्ही लसींबद्दल केले संशोधन
  • अभ्यासात सीरो पॉझिटिव्हिटी दर, प्रतिजैविकांवर केले लक्ष केंद्रित
  • अभ्यासातून समोर आला दोन्ही लसी प्रभावी असल्याचा निष्कर्ष

नवी दिल्ली: कोरोना विषाणूच्या (Corona virus) विरोधात कोणती लस (vaccine) सर्वात प्रभावी (effective) आहे? कोणती लस घेतल्याने कोरोनाचा धोका (risk) संपतो? कोणत्या लसीचे साईड इफेक्ट्स (side effects) सर्वात कमी आहेत? कोणती लस घेतल्याने शरीरात (body) वेगाने आणि अधिक प्रमाणात प्रतिजैविके (antibodies) तयार होतील? कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या (second wave) काळात हे सगळे प्रश्न (questions) लोकांच्या मनात आहेत. यावर नुकतेच एक संशोधन (study) समोर आले आहे ज्यात सांगण्यात आले आहे की ऑक्सफर्ड अॅस्टाझेनेकाची (Oxford-Astrazeneca) कोव्हिशील्ड (Covishield) ही लस स्वदेशी कोव्हॅक्सिनच्या (Covaxin) तुलनेत अधिक अँटीबॉडीज (more antibodies) तयार करते. (Which vaccine creates more antibodies, Covishield or Covaxin, read the latest study)

लसीची पहिली मात्रा घेतल्यानंतर केले संशोधन

कोरोनाव्हायरस व्हॅक्सिन इंड्यूस्ड अँटीबॉडी टायट्रेतर्फे करण्यात आलेल्या प्रारंभिक अभ्यासानुसार लसीची पहिली मात्रा घेतलेल्या लोकांमध्ये कोव्हॅक्सिनच्या तुलनेत कोव्हिशील्ड घेतलेल्यांच्या शरीरात जास्त अँटीबॉडी निर्माण झाल्या. या अभ्यासात 552 आरोग्य कर्मचाऱ्यांनी भाग घेतला होता. यात असा दावा करण्यात आला आहे की कोव्हिशील्ड लस घेणाऱ्या लोकांमध्ये सीरोपॉझिटिव्हिटीबाबत अँटीस्पाईक अँटीबॉडी कोव्हॅक्सिनची पहिली मात्रा घेतलेल्यांच्या तुलनेत बरीच जास्त होती.

दोन्ही लसी करत आहेत विषाणूविरोधात उत्तम काम

अभ्यासात असेही सांगण्यात आले आहे की कोरोनाप्रतिबंधक दोन्ही लसी, कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिन दोन्हींचे काम चांगले आहे. पण सीरोपॉझिटिव्हिटी रेट आणि अँटीस्पाईक अँटीबॉडी कोव्हिशील्डमध्ये सर्वाधिक आहेत. या सर्वेक्षणात सहभागी असलेल्या 456 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोव्हिशील्ड आणि 96 कर्मचाऱ्यांना कोव्हॅक्सिनची पहिली मात्रा दिली गेली होती. यांचा एकंदर सीरोपॉझिटिव्हिटी रेट 79.3% होता.

दुसऱ्या डोसनंतर रोगप्रतिकारशक्तीबद्दल अधिक माहिती मिळणार

मात्र या संशोधनाच्या निष्कर्षात सांगण्यात आले आहे की दोन्ही लसी घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये इम्यून रिस्पॉन्स चांगला होता. COVATच्या या संशोधनात दोन्ही लसींचा दुसरा डोस घेतल्यानंतर इम्यून रिस्पॉन्सबद्दल अधिक चांगला प्रकाश पडेल. या संशोधनात अशा आरोग्य कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेण्यात आले होते ज्यांनी कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिनपैकी एक लस घेतली होती. यापैकी काही असेही होते ज्यांना सार्स-सीओव्ही-2चा संसर्ग झाला होता. तर काही असे होते जे याआधी विषाणूच्या संपर्कात आले नव्हते. (Which vaccine creates more antibodies, Covishield or Covaxin, read the latest study)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी