Bath in Winter | थंडीच्या दिवसात गरम पाण्याने आंघोळ केल्याने येतात 'या' अडचणी, पाहा कसे असावी पाणी

Bath in Winter | हिवाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात अनेक लोक गरम पाण्याने आंघोळ करणे पसंत करतात. मात्र काही लोक अद्यापदेखील हिवाळ्यातदेखील थंड पाण्याचाच वापर आंघोळीच्या वेळेला करतात. ऋतू बदलामुळे अनेकांना सर्दी, पडसे, स्नायू दुखणे आणि इतर त्रास सुरू होतात. यामागचे सर्वात मोठे कारण असते तुमचे आंघोळीचे पाणी . अनेकांना अद्याप नेमक्या कोणत्या प्रकारच्या पाण्याने आंघोळ करावी याची कल्पना नसते. कारण अनेकजण थंडी वाढल्यावर असा विचार करतात की जास्त गरम पाण

Bath in Winter
हिवाळ्यात आंघोळीचे पाणी कसे असावे  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • हिवाळ्यात अनेकजण गरम पाण्याने आंघोळ करतात
  • ऋतू बदलामुळे अनेकांना सर्दी, पडसे, स्नायू दुखणे आणि इतर त्रास सुरू होतात
  • आंघोळीला गरम पाण्याचा वापर केल्याने त्वचा कोरडी पडते

Bath in Winter | नवी दिल्ली : हिवाळ्याची (Winter season)सुरूवात झाली आहे. अशावेळी अनेकांनी आपल्या दिनचर्येबरोबरच आपल्या आंघोळीच्या (Bath)पाण्यातदेखील बदल केला आहे. हिवाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात अनेक लोक गरम पाण्याने आंघोळ (Bath in hot water) करणे पसंत करतात. मात्र काही लोक अद्यापदेखील हिवाळ्यातदेखील थंड पाण्याचाच (Bath in cold water) वापर आंघोळीच्या वेळेला करतात. ऋतू बदलामुळे अनेकांना सर्दी, पडसे, स्नायू दुखणे आणि इतर त्रास सुरू होतात. यामागचे सर्वात मोठे कारण असते तुमचे आंघोळीचे पाणी (Bath water). अनेकांना अद्याप नेमक्या कोणत्या प्रकारच्या पाण्याने आंघोळ करावी याची कल्पना नसते. कारण अनेकजण थंडी वाढल्यावर असा विचार करतात की जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्यांना आराम मिळेल. मात्र होते याच्या नेमके उलटे. उलट त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होते. हिवाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात आंघोळीशी निगडीत काही महत्त्वाची मुद्दे समजून घेऊया. (Which water to be used in winter season for bathing)

गरम पाण्याने आंघोळ केल्याने होणारे नुकसान-

गरम पाण्याने आंघोळ करणे आरामदायी वाटते. मात्र यामुळे आपल्या शरीराला मोठा अपाय होऊ शकतो. अनेकवेळा जास्त गरम पाणी असल्यामुळे त्वचेला अपाय होतो. याचबरोबर आंघोळीला गरम पाण्याचा वापर केल्याने त्वचा कोरडी पडते. गरम पाण्यामुळे शरीरात असणाऱ्या एपिडर्मिस केराटिन पेशींचे नुकसान होते. अनेकवेळा गरम पाण्याने आंघोळ केल्याने खाजेचा त्रासदेखील होऊ शकतो.

गरम पाण्याने रक्तदाबाचा त्रास-

जर तुम्हाला रक्तदाबाचा त्रास असेल तर थंड वातावरणातून बाहेरून येऊन एकदम गरम पाण्याने आंघोळ करता कामा नये. कारण तुम्ही थंड वातावरणात असता तेव्हा तुमचा रक्तदाब कमी होतो आणि अचानक शरीरावर गरम पाणी पडल्यामुळे तुमचा रक्तदाब वाढतो. अशावेळी ब्रेनस्ट्रोक आणि ह्रदयविकाराचा झटका येण्याची भीतीदेखील असते.

हिवाळ्यात करा कोमट पाण्याने आंघोळ-

हिवाळ्यात आंघोळ करताना नेहमी कोमट पाण्याने आंघोळ केली पाहिजे. यामुळे तुमच्या शरीरावर कोणताही विपरित परिणाम होत नाही. उलट कोमट पाण्यामुळे तुमच्या शरीराला फायदाच होतो. यामुळे तुमच्या स्नायूंना आराम मिळतो. शिवाय कोमट पाण्याने आंघोळ केल्याने पॅरासिम्पेथेटिक नर्व्हस सिस्टम सक्रिय होते. यामुळे नंतर आपल्याला आराम मिळतो. शिवाय कोमट पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेलादेखील नुकसान होत नाही.

हिवाळ्यात आजारी असल्यास अशी करा आंघोळ-

जर हिवाळ्यात तुम्ही आजारी पडलात तर अनेकजण आंघोळ करण्याचे टाळतात. मात्र जर आंघोळ करायचीच असेल तर कोमट किंवा थोड्या जास्त गरम पाण्याने आंघोळ करता येते. मात्र आंघोळ करताना हे ध्यानात घ्या की पाणी जास्त गरम असता कामा नये. लगेच आंघोळ आटोपून आपले शरीर कोरडे करून गरम कपडे घातले पाहिजेत. यामुळे शरीराला पुरेशी उब मिळते.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी