Sitting on the Floor while Eating | जमिनीवर बैठक मारून जेवल्याचे ५ जबरदस्त फायदे, पाहा काय आहे योग्य पद्धत

Health Tips | जमिनीवर बैठक मारून जेवण्याचे (Sitting on the Floor while Eating) मोठे फायदे असतात. पारंपारिक पद्धतीने आपल्याकडे जेवणासाठी जमिनीवर बैठक मारून बसण्याचीच पद्धत आहे. शतकानुशतके भारतात (Traditional Indian eating style) याच पद्धतीने जेवण करण्याची पद्धत आहे. या पद्धतीने जेवणाचे आपल्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतात. याचे असंख्य फायदे आहेत, रक्ताभिसरण चांगले होते शिवाय हे ह्रदयाच्या आरोग्यासाठीदेखील उपयुक्त आहे.

Sitting on the Floor while Eating
जमिनीवर बैठक मारून जेवण्याचे फायदे 
थोडं पण कामाचं
  • जमिनीवर बसून जेवल्याने फायदे
  • रक्ताभिसरणापासून पाचनक्रियेपर्यत असंख्य लाभ
  • प्राचीन भारतीय जेवणाची पद्धत

Health Tips | नवी दिल्ली : अलीकडच्या काळात जेवणासाठी डायनिंग टेबलचा (Dining Table) वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र जमिनीवर बैठक मारून जेवण्याचे (Sitting on the Floor while Eating) मोठे फायदे असतात. पारंपारिक पद्धतीने आपल्याकडे जेवणासाठी जमिनीवर बैठक मारून बसण्याचीच पद्धत आहे. शतकानुशतके भारतात (Traditional Indian eating style) याच पद्धतीने जेवण करण्याची पद्धत आहे. या पद्धतीने जेवणाचे आपल्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतात. याचे असंख्य फायदे आहेत, रक्ताभिसरण चांगले होते शिवाय हे ह्रदयाच्या (Beneficial to Health)आरोग्यासाठीदेखील उपयुक्त आहे. (While eating sitting on floor gives many benefits to health, see the details)

१. तणाव दूर होईल

जमिनीवर बैठक मारून जेवताना आपण एका पायाला दुसऱ्या पायावर ठेवून बसतो. ही एक प्रकारची आसनमुद्राच आहे. ही सुखासन किंवा पद्मासनाची मुद्रा आहे. या दोन्ही आसनांमुळे एकाग्रता वाढते आणि मानसिक तणाव दूर होतो. त्यामुळे याच पद्धतीने जर जमिनीवर बैठक मारून भोजन केले तर त्याचा खूप मोठा फायदा मिळतो आणि पचनाची क्रिया उत्तम होते. टेबल-खुर्चीवर म्हणजेच डायनिंग टेबलवर बसून जेवल्याने हा फायदा किंवा लाभ मिळत नाही.

२. पचनाची क्रिया उत्तम होते

जमिनीवर बसून जेवताना आपण ताटाकडे वाकून जेवतो. ही एक नैसर्गिक पोज आहे. घास घेण्यासाठी पुढे वाकणे आणि मग परत मागे होणे या पद्धतीने आपण जेवण करतो. असे केल्याने पोटाच्या स्नायूंना सतत कार्यरत ठेवले जाते. यामुळे पचनाची क्रिया उत्तम पार पडते आणि अन्नग्रहण केल्याचा पूर्ण फायदा मिळतो.

३. शरीराची रचना चांगली राहते

जमिनीवर बसून जेवल्याने बॉडी-पॉश्चर म्हणजे शरीराची रचना व्यवस्थित राहते. यामुळे स्नायूंना बळकटी मिळते. त्याचबरोबर जमिनीवर बसून जेवल्याने शरीरातील रक्ताभिसरणदेखील उत्तम राहते. यामुळे ह्रदयावर कमी ताण येतो आणि ह्रदयाला कमी मेहनत करावी लागते.

४. सांधेदुखीपासून आराम

जमिनीवर बैठक मारून जेवल्यामुळे आपल्याला गुडखे मोडून बसावे लागते. यामुळे गुडघ्यांनादेखील व्यायाम होतो. या पद्धतीने बसल्याने सांध्यांमधील लवचिकता, वंगण चांगले राहते. यामुळे जमिनीवर बसून जेवल्याने सांध्यांच्या दुखण्यापासून दूर राहता येते.

५. रक्ताभिसरण चांगले होते

जमिनीवर बसून जेवल्याने रक्ताभिसरणदेखील उत्तम राहते आणि नसांमधील ताण कमी होतो. ह्रदय रोगाच्या रुग्णांसाठी या पद्धतीने जेवणे उपयुक्त ठरते.

याशिवाय जमिनीवर बैठक मारल्याने ते एकप्रकारचे पद्मासन किंवा सुखासनच होते. त्यामुळे आपण त्यावेळेस एका नैसर्गिक स्थितीमध्येच बसलेले असतो. याचा फायदा पाचन क्रिया सुधारण्यावर होतो. शिवाय अतिरिक्त भोजन करणे आपोआप ठाळले जाते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

शिवाय हे एक प्रकारचे आसन असल्यामुळे शरीराला एक प्रकारचा व्यायामदेखील होतो. त्यामुळे शरीराची लवचिकतादेखील वाढते. जमिनीवर बसताना, बैठक मारताना आणि पुढे उभे राहताना अनेक स्नायूंना व्यायाम होतो, त्यांची कार्यक्षमता वाढते.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी