Tips to Stay Healthy in Summer उन्हाळ्यात पांढरा कांदा खाण्याचे फायदे

जाणून घेऊ उन्हाळ्यात पांढरा कांदा खाण्याचे फायदे.... White Onion Best Summer Food

White Onion Best Summer Food
उन्हाळ्यात पांढरा कांदा खाण्याचे फायदे 

थोडं पण कामाचं

  • उन्हाळ्यात पांढरा कांदा खाण्याचे फायदे
  • पांढरा कांदा आतड्याचे आरोग्य सुधारतो
  • पांढरा कांदा खाणाऱ्यांना रक्ताच्या गुठळ्या होण्याचा त्रास होत नाही

मुंबईः भारतीय आहारात कांदा हा पदार्थ मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. कांदा हे देशातील एक प्रमुख अन्न आहे. कांद्याच्या दरातील चढउतारांचा भारतीय राजकारणावर परिणाम होतो. देशातील अनेक भागांमध्ये वर्षभर गुलाबी कांदा सहज उपलब्ध असतो. पण पांढरा कांदा अर्थात व्हाईट ओनियन (White Onion) उन्हाळ्याच्या दिवसांमध्येच देशातील अनेक बाजारांमध्ये विक्रीसाठी येतो. पांढऱ्या कांद्याच्या माळा विक्रीसाठी उपलब्ध असतात. हा पांढरा कांदा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खाणे आरोग्यासाठी लाभाचे आहे. जाणून घेऊ उन्हाळ्यात पांढरा कांदा खाण्याचे फायदे.... White Onion Best Summer Food

  1. पांढरा कांदा प्रामुख्याने सॅलडमध्ये वापरतात. उकडलेल्या भाज्यांमध्येही पांढरा कांदा वापरतात. पांढऱ्या कांद्याच्या वापराचे इतिहासात इसवी सन पूर्व ५००० पासूनचे पुरावे उपलब्ध आहेत. सोळाव्या शतकात गरोदर राहू इच्छिणाऱ्या महिलांमध्ये पांढरा कांदा खाण्याचे प्रमाण जास्त होते. पांढरा कांदा रक्तातील साखरेच्या प्रमाणाचे संतुलन राखण्यासाठी मदत करतो.
  2. प्रीबायोटिक तसेच तंतुमय घटकांमुळे पांढरा कांदा आतड्याचे आरोग्य सुधारतो तसेच पचनाला मदत करतो. 
  3. नियमित पांढरा कांदा खाणाऱ्यांना रक्ताच्या गुठळ्या होण्याचा त्रास होत नाही आणि आधीपासून हा त्रास असल्यास तो लवकर बरा होतो. याच कारणामुळे हृदय विकाराच्या रुग्णांना तसेच रक्तदाबाचा त्रास असलेल्यांना पांढरा कांदा खाण्याचा सल्ला दिला जातो. 
  4. पांढऱ्या कांद्यात भरपूर अँटी अँक्सिडंट असतात. अॅसिडीटीचा त्रास पांढऱ्या कांद्याच्या सेवनाने कमी होतो. वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्याचे काम पांढरा कांदा करतो.
  5. नियमित पांढऱ्या कांद्याच्या सेवनाने अनिद्रेची समस्या दूर होण्यास मदत होते. 
  6. गॅसशी संबंधित त्रासाने त्रस्त असलेल्यांसाठी पांढरा कांदा जास्तीत जास्त चावून खाणे लाभाचे आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी