जाणून घ्या कधीपर्यंत तयार होईल कोरोनावरील वॅक्सीन, काय म्हणाले WHOचे महासंचालक?

WHO about covid-19 vaccine: जगभरातील सर्व देश आपल्या इथली प्राथमिक आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी काम करत आहेत. कोरोनाच्या संकट काळात त्यावरील वॅक्सिन बाजारत येण्यास जाणून घ्या किती वेळ लागणार ते.

Covid-19 Vaccine update
जाणून घ्या कधीपर्यंत तयार होईल कोरोनावरील वॅक्सीन? 

थोडं पण कामाचं

  • जगाला १ वर्षात किंवा त्या आधी मिळणार कोरोनावरील वॅक्सिन
  • वॅक्सिन उपलब्ध करून ते वितरित करणं एक मोठं आव्हान
  • सध्या १०० हून अधिक कोविड-१९ वॅक्सिन कॅडिंडेट डेव्हलपमेंटच्या विविध चरणांमध्ये आहे.

ब्रसेल्स: जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक (WHO) म्हणाले की, संशोधकांच्या अंदाजानुसार जगाला एक वर्ष किंवा त्यापूर्वी कोविड-१९ (Covid-19) चं वॅक्सिन मिळू शकतं. वॅक्सिन (Vaccine) बनविण्यासाठी, त्याच्या निर्मितीसाठी आणि वितरणासाठी त्यांनी जगानं  पाठिंबा देण्याची गरज असल्याचं म्हटलंय.

युरोपियन संसदेच्या इन्व्हार्यनमेंट, पब्लिक हेल्थ आणि फूड सेफ्टीसोबतच मिटिंगमध्ये ट्रेडोस घेब्रेयसिस यांनी म्हटलं की, वॅक्सिन उपलब्ध होणं आणि ते सर्वांपर्यंत पोहोचवणं ते एक आव्हान असेल. यासाठी राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता असेल.

वर्तमानात १०० हून अधिक कोविड-१९ वॅक्सिन कँडिडेट डेव्हलपमेंटच्या विविध चरणांमध्ये आहे. त्यांनी सांगितलं, ‘महामारीनं जागतिक एकत्रपणाचं महत्त्व प्रकाशित केलंय. सोबतच आरोग्यासाठी सोयीसुविधांकडे एक खर्च म्हणून पाहिले जाऊ नये, तर गुंतवणूक म्हणून बघावं.’

डब्लूएचओचे महासंचालक पुढे म्हणाले की, जगातील सर्व देशांनी आपली प्राथमिक आरोग्य यंत्रणा आणि संकटाच्या परिस्थितीत आपली तयारी मजबूत करण्यासाठी काम करायला पाहिजे. त्यांनी जागतिक स्तरावर युरोपीय संघाच्या नेतृत्वाच्या गरजेवरही भर दिला आहे.

महासंचालकांनी ही बाब स्वीकार केलीय की, सर्वांनी चुका केल्या आहेत. त्यांनी सदस्यांना म्हटलं की, एक स्वतंत्र पॅनल डब्लूएचओद्वारे महामारीबाबत दिलेल्या प्रतिक्रायांचं मूल्यांकन करणार आहे, जेणेकरून चुकांमधून आपण काही शिकू शकू. हे पॅनल लवकरच आपलं काम सुरू करणार आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नायजेरिया विद्यापीठाच्या संशोधकांनी दावा केलाय की, त्यांनी कोविड-१९चं (Covid-19) वॅक्सिन तयार केलेलं आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार ओसूनमध्ये एडेलेक विद्यापीठामध्ये पत्रकार परिषद घेत मेडिकल व्हायरोलॉजी, इम्यूनोलॉजी अँड बायोइनफॉरमॅटिक्सचे संशोधक आणि रिसर्च टीमचे प्रमुख डॉ. ओलाडिपो कोलावोल यांनी सांगितलं की, हे वॅक्सिन आफ्रिकन लोकांसाठी आफ्रिकेतच विकसित केलं जात आहे. त्यांनी हे पण स्पष्ट केलं की, मार्केटमध्ये हे वॅक्सिन उपलब्ध होण्यासाठी अजून १८ महिन्यांचा काळ लागेल. कारण रुग्णांवर प्रयोग करण्यापूर्वी या वॅक्सिनचं अनेक स्तरावर ट्रायल केली जाणार आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप सुरूच

दरम्यान, राज्यात कोरोनाचा कहर काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. जुलै आणि ऑगस्टमध्ये या महामारीचा स्फोट होईल, अशी भीती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, लेप्टेस्पायरोसिस, स्वाईन फ्लू हे आजार वाढण्याचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे अशा रुग्णांची संख्या अधिक असते. तसंच आयसीएमआरनंही महाराष्ट्रात रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होईल असा धोक्याचा इशारा दिला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी