Side Effects of Milk: दिवसाची सुरूवात दूध पिऊन करू नये...आयुर्वेदानुसार पाहा काय आहे कारण

Health Tips : लहानपणापासून प्रत्येकालाच दूधाचे सेवन करण्याची सवय असते. शिवाय दूध हे अतिशय पौष्टिक आणि आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. भारतीय आहारात तर दूध हा अविभाज्य घटक आहे. फक्त दूधच नाही तर दुधाचे असंख्य पदार्थ आपल्या ताटात असते. अनेकजण सकाळची सुरूवात दुधाच्या सेवनानेच करतात. मात्र सकाळी दुध पिणे योग्य आहे का, त्याचे काय परिणाम होतात याबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

Why drinking milk in morning is not good
सकाळी दुधाचे सेवन का करू नये 
थोडं पण कामाचं
  • दूध हे अतिशय पौष्टिक आणि आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
  • दिवसाची सुरुवात दुध पिऊन करावी का याबद्दल वेगवेगळी मते आहेत
  • रिकाम्या पोटी दूध प्यावं का आणि ते पिण्याची योग्य वेळ कोणती? याबद्दल आयुर्वेदात मार्गदर्शन केले आहे

Side Effects of Milk : नवी दिल्ली : दूध हा आपल्या दिनचर्येतील आणि आहारातील महत्त्वाचा घटक आहे. बाळ जन्माला आल्यापासून दूध पिण्याचा सिलसिला सुरू होतो. दूध (Milk) हे अतिशय पौष्टिक आणि आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. दूध हे बाळाला दिले जाणारे पहिले अन्न आहे आणि तेव्हापासून ते आहाराचा (Diet) अविभाज्य भाग बनत जाते. काही अपवादात्मक सोडता पौष्टिक गुणधर्मांसाठी दूध फायदेशीर मानले जाते. मात्र तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात दुध पिऊन करावी का (Drinking milk in morning) हा चर्चेचा विषय आहे. अनेकजण सकाळी सर्वात आधी दूधाचे सेवन करतात. यामुळे खूप ऊर्जा मिळते आणि ते आरोग्यसाठी (Health) लाभदायी असते असे मानले जाते. तुम्हा रिकाम्या पोटी दूध प्यावं का आणि ते पिण्याची योग्य वेळ कोणती? याबद्दल आयुर्वेदात (Ayurveda) मार्गदर्शन केलेले आहे. (Why as per Ayurveda you should not drink milk in the morning)

अधिक वाचा : Viral Video : मेट्रोतील मोबाईल चोर मुलगी

दिवस दुध सेवनाने सुरू करावा का?

बहुतेक लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात दुधाने करतात. लहानपणापासून ही सवय लागते आणि मग ते पुढे कायमचे सुरूच राहते. कारण शरीराला रोज सकाळी दूधाचे सेवन करण्याचे व्यसन लागते. दूध खूप पौष्टिक आणि अनेक गुणधर्मांनी युक्त असल्याने दूधामुळे शरीराला सकाळी पोषण मिळेल असे वाटू शकते मात्र बहुतेक तज्ञांचे त्यावर उलट मत आहे.

अधिक वाचा : जगातले एकमेक शंभर टक्के शाकाहारी शहर

आयुर्वेद काय म्हणते

तुमच्या दिवसाची सुरुवात एक ग्लास दूध आणि तृणधान्याने केल्याने हा खूप जड आहार होतो. आयुर्वेदानुसार, जर तुम्हाला तुमची सकाळ हलक्या गोष्टीच्या सेवनाने सुरू करावीशी वाटत असेल तर दुधाचे सेवन टाळा. रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने चांगल्यापेक्षा जास्त नुकसान होते. यामुळे शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढते आणि चांगल्या त्वचेसाठी ते फायदेशीर नसते.

आहार तज्ञांच्या मते, पचनसंस्थेवर ताण देणे किंवा जड आहार घेणे ही चांगली गोष्ट नाही. कारण जड जेवण पचवताना पचनसंस्थेवर खूप ताण येतो आणि पोटदुखी होते. रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने गॅस्ट्रिक समस्या, आम्लपित्त, फुगणे, पोटात पेटके आणि उलट्या होऊ शकतात.

अधिक वाचा : Video : PM मोदींनी लिव्हर फिरवताच चित्ता झाला स्वतंत्र, कुनो राष्ट्रीय उद्यानात फिरू लागला

दूध पिण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?

आयुर्वेदानुसार दूध पिण्याची उत्तम वेळ म्हणजे संध्याकाळ. कारण दूध पचायला खूप सोपे आहे आणि तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते. आपण विश्रांती घेत असताना हे आपल्या शरीराला पुनरुज्जीवित करण्यात देखील मदत करते. असे मानले जाते की सकाळी दूध प्यायल्याने जडपणा येऊ शकतो. तर संध्याकाळी दूधाचे सेवन केल्याने झोप चांगली येते आणि मज्जातंतूला आराम मिळण्यास मदत होते.

(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी