Include Iron in Pregnant woman's diet :गरोदरपणाची ही जाहिरात चर्चेत का आली? भारतीय महिलांनी जरूर पाहावी ही जाहिरात

तब्येत पाणी
Updated Jun 06, 2022 | 15:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

Include Iron in Pregnant woman's diet : महिलांच्या आरोग्याच्या समस्यांबाबत एक जाहिरात सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. व्हिडिओच्या बॅगराऊंडला वाजणारे गाणे महिलांना लोहाची कमतरता पूर्ण करण्याचे आवाहन करते. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात गर्भधारणा खूप महत्त्वाची भूमिका बजावते. या दरम्यान महिलांच्या शरीरात अनेक बदल दिसून येतात. गरोदरपणात महिलांना खबरदारी घेण्यास सांगितले जाते.

Include Iron in Pregnant woman's diet
गरोदरपणात महिलांना जास्त प्रमाणात लोहाची गरज भासते  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गरोदरपणात महिलांच्या शरीरात लोहाची कमतरता असते
  • ही आहेत महिलांच्या शरीरात लोहाच्या कमतरतेची लक्षणे
  • गरोदरपणाची ही जाहिरात आली चर्चेत

Include Iron in Pregnant woman's diet : गर्भधारणा ही अशी वेळ असते जेव्हा महिलांच्या शरीरात अनेक गोष्टी घडू लागतात, त्यापैकी एक म्हणजे लोहाची कमतरता. 
महिलांसाठी लोह खूप महत्वाचे आहे, परंतु गर्भधारणेदरम्यान महिलांना त्याची खूप गरज असते. भारतात अनेक महिलांना गरोदरपणात लोहाच्या कमतरतेचा सामना करावा लागतो. त्यामुळे महिला आणि तिच्या न जन्मलेल्या बाळाच्या शरीरावर याचा खूप वाईट परिणाम होतो. भारतीय महिलांमध्ये याबाबत जागरुकता आणण्यासाठी प्रोजेक्ट स्त्रीधनने नुकतीच एक जाहिरात केली आहे. यात डोहाळे जेवणाच्या वेळी महिलेला सोने, चांदी किंवा हिऱ्याचे दागिने देण्याऐवजी लोहाची कमतरता भरून काढण्यावर भर दिला जात आहे. 


या जाहिरातीच्या माध्यमातून गर्भवती महिलांच्या शरीरातील रक्ताची कमतरता हे अशक्तपणाचे मुख्य कारण असल्याचे सांगण्यात आले आहे. गर्भवती महिलेला अशक्तपणा असेल तर त्याचा वाईट परिणाम तिच्या मुलावरही होतो. या जाहिरातीमध्ये महिलांना डाळिंब, चेरी, कॉर्न आणि लाल बेरी यांसारख्या शरीरातील लोहाची कमतरता भरून काढणाऱ्या गोष्टी खाताना दाखवण्यात आले आहे. डोहाळे जेवणात समारंभात सोन्या-चांदीची गुंतवणूक करण्याऐवजी, या जाहिरातीद्वारे, गर्भवती महिलांच्या शरीरातील लोहाची कमतरता पूर्ण करण्यासाठी योग्य आहार आणि पूरक आहार देण्यावर भर देण्यात यावा असं सांगण्यात आलं आहे. 

अधिक वाचा : झोपताना या ५ गोष्टी कधीच डोक्याजवळ ठेवू नका, नाहीतर...

अलीकडच्या काळात, भारतातील अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लहान मुले आणि महिलांमध्ये अशक्तपणाची प्रकरणे लक्षणीय वाढली आहेत. 2019 मध्ये केलेल्या सर्वेक्षणात 68.4 टक्के मुले आणि 66.4 टक्के महिलांना अॅनिमियाचा त्रास होता. त्याच वेळी, 2016 मध्ये 35.7 टक्के मुले आणि 46.1 टक्के महिलांना अशक्तपणा होता. 

2016 च्या जागतिक पोषण सर्वेक्षणानुसार, महिलांमध्ये अशक्तपणाच्या बाबतीत भारत 180 देशांमध्ये 170 व्या क्रमांकावर आहे. 
 
WHO नुसार, 15 ते 49 वर्षे किंवा 12 ते 49 वर्षे महिलांच्या शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी 12 ग्रॅम प्रति डेसीलिटरपेक्षा कमी असणे  आणि 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये हिमोग्लोबिनची पातळी 11.0 ग्रॅम प्रति डेसीलिटरपेक्षा कमी असणे ही अशक्तपणाची स्थिती मानली जाते.

 

अधिक वाचा : या ३ राशींची मुले असतात चांगली मुले आणि जावई, जिंकतात


गर्भधारणेदरम्यान अँनिमियाची लक्षणे 

-थकवा
-डोकेदुखी
-त्वचा पिवळी पडणे
-श्वसनाचा त्रास
-एखाद्या गोष्टीची लालसा किंवा बर्फ खाण्याची इच्छा.
-निम्न रक्तदाब
-एकाग्रता निर्माण करण्यात अडचण

गरोदरपणात शरीरात लोहाच्या कमतरतेची कारणे 

आपले शरीर हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी लोह वापरते. हिमोग्लोबिन हा एक प्रकारचा प्रथिने आहे जो शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम करतो. गर्भधारणेदरम्यान, शरीरातील रक्ताचे प्रमाण लक्षणीय वाढते, ज्यामुळे शरीराला अधिक लोहाची आवश्यकता असते. गर्भवती महिलेच्या शरीराला अधिक रक्त तयार करण्यासाठी अधिक लोह आवश्यक आहे जेणेकरून गर्भाशयात वाढणाऱ्या बाळाला ऑक्सिजनचा पुरवठा करता येईल. अशा परिस्थितीत जर तुमच्या शरीरात पुरेसे लोह नसेल तर तुम्हाला अॅनिमियाची समस्या होऊ शकते. 

अधिक वाचा : जवान विपुल इंगवले यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उसळला जनसागर

गर्भधारणेदरम्यान अॅनिमियाची समस्या कशी दूर करावी? 

गरोदरपणात डॉक्टर महिलांना आयर्न सप्लिमेंट देतात जेणेकरून त्यांच्या शरीरातील लोहाची कमतरता पूर्ण करता येईल. गरोदरपणात महिलांना दिवसाला २७ मिलीग्राम लोहाची गरज असते. आहारात पोषक घटकांचा समावेश करून लोहाची कमतरता भरून काढता येते. शरीरात लोहाची कमतरता असल्यास गर्भवती महिलांनी हिरव्या भाज्या, बीन्स, मटार, टोमॅटो किंवा संत्र्याचा रस सेवन करावा. 

अशा जाहिराती याआधीही केल्या गेल्या आहेत 

याआधीही महिलांच्या आरोग्याच्या समस्यांवर प्रकाश टाकणाऱ्या अनेक प्रकारच्या जाहिराती करण्यात आल्या आहेत. 2019 मध्ये धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर महिलांच्या आरोग्याच्या समस्यांबाबत एक जाहिरात आली होती. यामध्ये महिलांना धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्यावर पैसे खर्च करण्याऐवजी लोखंडावर गुंतवणूक करण्याचा सल्ला देण्यात आला. यामध्ये सोन्याऐवजी लोखंड घेण्यावर भर देण्यात आला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी