Heart Attack and Fitness: फिट असूनही सेलेब्रिटींना का येतो हार्ट अटॅक? कारण ऐकून बसेल धक्का

एवढे फिट असूनही सेलेब्रिटींना हार्ट अटॅक का येतो, असा प्रश्न अनेकदा पडतो. यामागे लाईफस्टाईल, ताणतणाव आणि व्यसने यासारखी अनेक कारणं असल्याचं सांगितलं जातं.

Heart Attack and Fitness
फिट असूनही सेलेब्रिटींना का येतो हार्ट अटॅक?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • फिट सेलेब्रिटींनाही का येतो हार्ट अटॅक?
  • चुकीच्या लाईफस्टाईलचा असतो परिणाम
  • केमिकलयुक्त औषधांमुळेही हृदयावर परिणाम

Heart Attack and Fitness: प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव ( यांचा कार्डिएक अरेस्टमुळे मृत्यू झाल्यामुळं देशभर हळहळ व्यक्त होत आहे. त्यापूर्वीही अनेक सेलेब्रिटींचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला आहे. फिट दिसणारे, धडधाकट वाटणारे, रोजच्या रोज व्यायाम करणारे हे सेलेब्रिटीही हार्ट अटॅकचे शिकार ठरल्यामुळे सामान्यांना आश्चर्य वाटत आहे. गेल्या काही दिवसांत हार्ट अटॅकमुळे अनेक सेलेब्रिटींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामध्ये बॉलिवूडे प्रसिद्ध गायक केके, टीव्ही अभिनेता दीपेश भान, कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार, अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांच्यासह इतरही अनेक नावांचा समावेश आहे. हार्ट अटॅक, कार्डिएक अरेस्ट किंवा स्ट्रोक यासारख्या कारणांनी या सेलेब्रिटींनी आपला प्राण गमावला. 

फिटनेस आयकॉन आणि हार्ट अटॅक

हार्ट अटॅक किंवा हृदयरोगाशी संबंधित कारणांनी जीव गमावलेल्यांपैकी अनेक सेलेब्रिटी हे फिटनेस आयकॉन म्हणून ओळखले जात होते. त्यांची शरीरयष्टी, त्यांनी मोठ्या मेहनतीने कमावलेले बायसेप्स, ट्रायसेप्स हे लोकांच्या चर्चेचा विषय असायचे. हे सेलेब्रिटी स्वतःला फिट ठेवण्यासाठी कसा तासन्‌तास व्यायाम करतात, याच्यादेखील अनेक बातम्या वाचायला लोकांना आवडायचं. हे सेलेब्रिटी म्हणजे फिटनेसच्या बाबतीतले एक प्रकारे आयडॉलच होते. इतक्या फिट असणाऱ्या सेलेब्रिटींनाच हार्ट अटॅकने गाठल्यामुळे सामान्यांना एक प्रकारे भितीही वाटायला लागली आहे. एवढा फिटनेस असूनही हार्ट अटॅक येत असेल, तर सामान्यांना तो कधीही गाठू शकतो, अशीही चर्चा सामान्यांमध्ये सुरू झाली. मात्र या सेलेब्रिटींना हार्ट अटॅक येण्यामागे इतरही अनेक कारणं असल्याचं समोर आलं आहे. जाणून घेऊया, त्यातील काही महत्त्वाची कारणं

अधिक वाचा - Stress Relief: तणाव मेंदूसाठी प्रचंड धोकादायक, रिलॅक्स होण्यसाठी 'या' टिप्स करा फॉलो

ताणतणाव

शरीर निरोगी राहण्यासाठी शारीरिक फिटनेस जितका महत्त्वाचा असतो, तितकाच मानसिक फिटनेसही आवश्यक असतो. काही सेलेब्रिटींना मानसिक शांतता मिळवता येत नाही. सतत वाढती स्पर्धा, परफॉर्मन्सचे टेन्शन, या क्षेत्रातील अनिश्चितता, सतत तरुण दिसण्याची गरज यासारख्या कारणांचा त्यांच्यावर तणाव असतो. त्यातून आरोग्याला हानीकारक असणारे अनेक प्रयोग ते करतात आणि स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करतात. हा ताण असह्य झाल्यामुळे अनेकांना हार्ट अटॅक येत असल्याचं या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. 

चुकीची लाईफस्टाईल

वाढती स्पर्धा आणि ताणतणाव यामुळे अनेक सेलेब्रिटींची लाईफस्टाईल चुकीची सुरू असते. वाढत्या ताणतणावामुळे त्यांना अनेक व्यसनं जडतात. धुम्रपान, मद्यपान, चरस, गांजा, ड्रग्ज यांच्या आहारी गेल्यामुळे सेलेब्रिटींच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असतो. याशिवाय कामाच्या अनैसर्गिक वेळा, रात्रीच्या पार्ट्या यामुळे शरीराचे चक्र बिघडून त्यांना हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढत असल्याचं सांगितलं जातं. 

अधिक वाचा - Raju Shrivastav Death: कार्डिएक अरेस्टने घेतला राजू श्रीवास्तव यांचा बळी, ही लक्षणं दिसली तर वेळीच व्हा सावधान!

इतरही अनेक कारणं

काही सेलेब्रिटी आपलं वजन कमी करण्यासाठी अघोरी प्रकार करत असतात. काही केमिकलयुक्त औषधांचा वापर करून वजन अचानक कमी केलं जातं. याचा ताण शरीरावर येत असतो. त्याचप्रमाणे स्नायू वाढवण्यासाठीदेखील काही रासायनिक औषधं घेतली जातात. याचाही दुष्परिणाम होऊन हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी