Heart rate of athlete: सामान्यांपेक्षा ॲथलिट्सचा हार्ट रेट असतो कमी, जाणून घ्या कारण

सामान्य माणसाचा हार्ट रेट हा दर मिनिटाला 60 ते 80 च्या दरम्यान असतो. मात्र काही ॲथलिट्सचा हार्ट रेट मात्र अगदी 30 ते 40 एवढा कमी असतो. ॲथलिट्सचा हार्टरेट कमी असणं हे त्यांच्या फिटनेसचं रहस्य मानलं जातं.

Heart rate of athlete
सामान्यांपेक्षा ॲथलिट्सचा हार्ट रेट असतो कमी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • ॲथलिट्सचा हार्ट रेट असतो इतरांपेक्षा कमी
  • सर्वसामान्यांच्या तुलनेत असतं हृदय मजबूत
  • औषधांचाही होतो हृदयावर परिणाम

Heart rate of athlete: सामान्य नागरिकांच्या (Common man) तुलनेत खेळाडूंचा (Players) आणि ॲथलिट्सचा (Athletes) हार्ट रेट (Heart rate) कमी असतो, हे आपण अनेकदा ऐकलं असेल. सामान्य माणसाचा हार्ट रेट हा दर मिनिटाला 60 ते 80 च्या दरम्यान असतो. मात्र काही ॲथलिट्सचा हार्ट रेट मात्र अगदी 30 ते 40 एवढा कमी असतो. ॲथलिट्सचा हार्टरेट कमी असणं हे त्यांच्या फिटनेसचं रहस्य मानलं जातं. जेव्हापर्यंत एखाद्या खेळाडूला थकवा आल्याचं किंवा चक्कर आल्याचं दिसत नाही, तोपर्यंत त्यांची तब्येत उत्तम असल्याचं मानलं जातं. मात्र इतर सर्वसामान्यांच्या तुलनेत ॲथलिट्सचं हृदय कमी वेगाने का धडकतं, असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. त्यामागे अनेक कारणं असतात आणि त्यांच्या शारीरिक क्षमतेच्या दृष्टीने साहजिक असतात. जाणून घेऊया, यामागची काही महत्त्वाची कारणं.

हृदयाची क्षमता

सामान्य माणसाच्या तुलनेत ॲथलिट्सचा हार्टरेट कमी असणं, हे नॉर्मल मानलं जातं. एका हेल्दी यंग ॲथलिटचा हार्ट रेट हा साधारण 30 ते 40 बीपीएम एवढा असतो. हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार, व्यायाम केल्यामुळे खेळाडूंच्या हृदयाचे स्नायू मजबूत होतात. त्यामुळे त्यांचं हृदय जास्त क्षमतेनं रक्त पंप करू शकतं. हार्ट मजबूत असल्यामुळे हृदय अधिक क्षमतेनं ऑक्सिजनचं वहन करू शकतं. अर्थात, व्यायाम करताना किंवा खेळ खेळत असताना त्यांचा हार्टरेट 180 ते 200 बीपीएमपर्यंत पोहोचू शकतो. 

फिटनेस लेव्हल

सामान्य लोकांच्या तुलनेत ॲथलिट्स जास्त व्यायाम करत असतो. व्यायामामुळे त्यांचं हृदय हेल्दी आणि फिट असतं. त्यामुळे आवश्यक तेवढं रक्त पंप करण्यासाठी ॲथलिट्सच्या हृदयाला सामान्य माणसाच्या तुलनेत कमी कष्ट पडतात. 

अधिक वाचा - Haldi Water For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी प्या हळदीचे पाणी, आठवड्याभरात पहा फरक

औषधांचा परिणाम

अनेक ॲथलिट्स आपल्या शरीराला फिट ठेवण्यासाठी आपली क्षमता वाढवण्यासाठी औषधांची मदत घेत असतात. त्याचा परिणामही त्यांच्या हृदयावर होत असतो. औषधांमुळे हार्ट रेट कमी होण्याची किंवा वाढण्याचीही शक्यता असते. विशेषतः बीटा ब्लॉकर्स औषधं हृदयाची गती कमी करण्यास कारणीभूत ठरतात. 

वयाचा परिणाम

तरुण वयात ॲथलिट प्रचंड मेहनत आणि व्यायाम करत असतात. त्यामुळे त्यांची ऊर्जा आणि स्टॅमिना इतरांपेक्षा जास्त असतो. सामान्य माणसं व्यायामाच्या अभावामुळे कमी वयातच विक होऊ शकतात. त्यामुळे त्यांचं हृदय कमकुवत होऊ शकतं. 

अधिक वाचा - Vegetable Juice: हिवाळ्यात प्या या भाज्यांचा ज्यूस आणि बॉडी करा Detox, जाणून घ्या सोपी रेसिपी

आदर्श हार्टरेट किती?

प्रत्येकाचा हार्ट रेट वेगवेगळा असतो. 90 ते 126 बीपीएम हा हार्ट रेट सामान्य मानला जातो. तर एखाद्या ॲथलिटचा हार्ट रेट हा 30 ते 40 बीपीएम असू शकतो. व्यायामादरम्यान ॲथलिट्सचा हार्टरेट 180 ते 200 बीपीएमपर्यंत जात असतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी