How mosquitoes bite: अनेकांची तक्रार असते की, त्यांनाच डास अधिक चावतात. तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांनाही अशी समस्या भेडसावत असेल की, इतरांच्या तुलनेत त्यांना डास अधिक चावतात. तर त्यांच्या आसपास असलेल्या व्यक्तींना डास कमी चावतात. पण खरंच असं होतं का? काही ठराविक व्यक्तींनाच डास अधिक चावतात की हा त्यांचा भ्रम आहे?
हे पण वाचा : तुमच्या राशीसाठी शुभ रंग कोणता? वाचा
वैज्ञानिकांनी याच्या संदर्भात एक अभ्यास केला होता, ज्यानुसार असे दिसून आले की काही व्यक्तींच्या बाबतीत असे होते. ते एखाद्या चुंबकाप्रमाणे असतात आणि डास त्यांच्याकडे वेगाने आकर्षित होतात. या अभ्यासात जुन्या समजुती खोडून काढल्या आहेत. ज्यामध्ये लोकांच्या रक्ताचा प्रकार, रक्तातील साखरेचे प्रमाण, लसूण किंवा केळी किंवा स्त्री असणे ही कारणे मानली जात होते. या संदर्भातील रिपोर्ट सेल जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.
हे पण वाचा : या सवयी बनवतात नपुंसक, तुम्हाला तर नाहीये ना?
अभ्यासानुसार, डास अशा व्यक्तींकडे जास्त आकर्षित होतात किंवा जवळ जातात ज्यांच्या त्वचेत कार्बोक्सिल अॅसिडचे प्रमाण अधिक असते. संशोधकांच्या मते, मनुष्याच्या त्वचेच फॅडी अॅसिड असते आणि डासांना ते आपल्याकडे आकर्षित करण्याचं काम करतं.
हे पण वाचा : ब्रेकअप झाल्यावर मुली करतात हे काम
तीन वर्षे अभ्यास केल्यावर संशोधकांमध्ये सहभागी झालेल्यांना अनेक दिवसांपर्यंत सहा वेळा त्यांच्या हातावर नायलॉन स्टॉकिंग्ज घातले. या नायलॉनसह चाचणी घेण्यात आली असता संशोधकांना असे दिसून आले की, सहभागी झालेल्या व्यक्तींमध्ये कार्बोक्झिलिक अॅसिडचे प्रमाण अधिक होते आणि ते डासांना अधिक आकर्षित करते. यावरुन असे दिसते की, ज्या व्यक्तींमध्ये फॅटी अॅसिडचे प्रमाण अधिक असते त्यांच्याकडे डास अधिक आकर्षित होतात.