मुंबईः नवीन वर्षाच्या धमाकेदार स्वागतासाठी तुम्ही सज्ज आहात. उत्तम दिसण्यासाटी, उत्तम फोटो काढण्याठी तुम्ही चेहऱ्याची काळजी घेतच असाल. पण ते पुरेस नाही. या हंगामात संपूर्ण शरीराची त्वचाच खडबडीत आणि निर्जीव दिसते. तेव्हा त्वचेला निरोगी आणि ताजतवानं ठेवण्यासाठी मॉइश्चरायझरच्या सोबतीने तेलाची मालीश केली तर तुमचं सौंदर्य अनेक पटींनी खुलेल.
(Winter edition - how to take care of your skin in this season)
डर्मेटोलॉजिस्ट डॉ. निवेदिता म्हणतात की, "कोरड्या हिवाळ्यात कोणतेही मॉइश्चरायझिंग लोशन किंवा तेल न लावल्याने रक्तवाहिन्यांना झालेल्या नुकसानामुळे त्वचेतून रक्तस्त्राव होऊ शकतो. प्राचीन काळापासून त्वचेची काळजी घेण्यासाठी तेलांचा वापर केला जात आहे आणि ते केवळ मसाजसाठीच नव्हे तर मॉइश्चरायझिंग, त्वचा घट्ट करण्यासाठी आणि स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी देखील एक उत्तम पर्याय आहे.”
हिवाळ्यात त्वचा कोरडी पडल्यामुळे संपूर्ण शरीराला खाज सुटूते तर कधी त्वचा पांढरी फटक पडते. या सगळ्याचं कारण दडलंय ते शरीरातील moisture कमतरतेत. या डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी, हिवाळ्यात अंघोळ करण्यापूर्वी शरीरावर तेल लावणे खूप फायदेशीर ठरेल. याने कोरडेपणाची समस्या दूर होतेच, त्या सोबतच शरीर उबदार राहतं.
या हिवाळ्याच्या दिवसांत अंघोळकरण्याआधी किंवा नंतर तेलाने मालिश करावी. मोहरी, नारळ, अक्रोड किंवा ऑलिव्ह ऑइलच्या तेलाने मालीश केल्यास मॉइश्चरायझिंग होईलच आणि पुरळ येण्यासारख्या समस्या सुद्ध कुठल्या कुठे पळून जातील.
अधिक वाचा :मुकेश अंबानींची सून राधिका मर्चंट नेमकी आहे तरी कोण?
सर्दीत केसांना ज्याप्रकारे गरम तेलाने मसाज केला जातो, त्याचप्रकारे गरम तेलाने शरीराची मालिश करावी. याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारतं, स्नायूंना आराम मिळतो. इतकचं नाही तर अंगावर कुठेतरी सूज असल्यास ती ही दूर होते.
तेल लावल्याने स्किन डिटॉक्सीफाई करण्याच्या अनेक पद्धती प्रचलित आहेत. अभ्यंग म्हणून आयुर्वेदात सुद्धा एक प्रथा आहे, ज्यात मालिशसाठी गरम औषधी तेल वापरले जाते. या तेलाने मसाज केल्याने त्वचेतील घाण दूर होते.
समोर आलेल्या संशोधनानुसार, मसाज करताना शरीरातून ऑक्सीटोसिन नावाचा हार्मोन बाहेर पडतो. ज्यामुळे आपण आनंदी होऊन मानसिक तणाव कमी होतो. शरीराला विश्रांती मिळते.
अंघोळकरण्याआधी किंवा नंतर तेलाने शरीरावर तेल चोळल्याने शरीरातील स्नायूंना आराम मिळतो. ज्याचा स्वाभाविक परिणाम म्हणून थकवा दूर होतो, शरीराला आतूर ऊब मिळते.