Winter Weight Loss Tips: वजन कमी करायचं असेल तर हिवाळ्यातील आहारात करा पाच बदल

Winter Weight Loss Tips:  वजन वाढीच्या समस्येने बहुतेक जण ग्रासलेले आहेत. वजन वाढू नये म्हणून अनेकजण काहींना काही प्रयत्न करत असतात. वजन कमी करायचे असेल तर आहाराकडे लक्ष देणं आवश्यक असते.

Winter Weight Loss Tips
हिवाळ्यातील आहारात पाच बदल केल्याने वजन कमी होण्यास होईल मदत  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • वजन कमी करण्यासाठी हिवाळ्यात आहाराचा उपयोग करावा.
  • हिवाळ्यामध्ये भाज्यांचे सूप प्यावे.
  • चहामध्ये आले टाकावे, वजन कमी करण्यासाठी आले खूप महत्त्वाचे असते.

Winter Weight Loss Tips:  नवी दिल्ली :  वजन वाढीच्या समस्येने बहुतेक जण ग्रासलेले आहेत. वजन वाढू नये म्हणून अनेकजण काहींना काही प्रयत्न करत असतात. वजन कमी करायचे असेल तर आहाराकडे लक्ष देणं आवश्यक असते. सध्या हिवाळा ऋतू चालू आहे. हिवाळ्यात सर्वांनाच तळलेलं किंवा भाजलेलं पदार्थ खायला सर्वात जास्त आवडतं. हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात लोक पाणीपुरी, समोसासारख्या अनेक पदार्थांचा आस्वाद घेतात.

मात्र, या पदार्थांमुळं तुमचं वजन वेगानं वाढू शकतं. तसेच या पदार्थांमुळे तुमच्या शरिरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. याशिवाय, अशा पदार्थांमुळे तुमची प्रतिकारशक्ती कमी होण्याची शक्यता असते. हिवाळ्यात तुमचं वजन नियंत्रणात किंवा कमी करण्यासाठी तुमच्या आहारात नेमकं कोणते 5 बदल करणे गरजेचं आहे? याची माहिती आपण या लेखात घेणार आहोत..

पहिला बदल- आहारात पौष्टीक पदार्थांचा समावेश करा-

हिवाळ्यात अन्न पचनक्रियेला वेळ लागतो. अशा परिस्थितीत, आपण फक्त निरोगी आणि पौष्टिक अन्नाचा अहारात समावेश केला पाहिजे. एखादी अॅक्टिव्हिटी केल्यानंतरच काहीतरी खावं. जर तुम्हाला तळलेले आणि भाजलेले काहीतरी खावेसे वाटत असेल तर, असे पदार्थ आठवड्यातून एकदाच खावे.

हिवाळ्यात भाज्यांचे सूप प्यावं-

हिवाळ्यात आहारात सूपचा समावेश करावा. सूपमध्ये अनेक भाज्या असतात. या भाज्यांचे पोषक तत्व शरीरात जातात. यामुळे तुमच्या वजनात घट झपाट्याने कमी होऊ शकते. सूप बनवताना जास्त मसाले घालू नका. सूपमध्ये चांगल्या प्रमाणात भाज्या घाला. ज्यामुळे तुम्हालाही पौष्टिक आहार मिळेल.

हिवाळ्यात अधिक पाणी प्यावे-

हिवाळ्यात खूप कमी प्रमाणात लहान लागते. मात्र, तरीही तुम्हाला अधिक पाणी पिण्याची आवश्यकता आहे. भरपूर पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. दरम्यान, वारंवार पाणी प्यायल्याने भूकही कमी लागते.

अँटिऑक्सिडेंट फळं खावीत-

हंगामी फळे खाऊनही वजनात घट करता येऊ शकते. हंगामी फळांमध्ये अनेक अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती चांगली बनते. तसेच विविध आजार आणि संसर्गापासून संरक्षण मिळते. महत्वाचे म्हणजे, नियमित फळे खाण्याची सवय तुम्हाला निरोगी जीवनशैलीकडे घेऊन जाईल. हिवाळ्यात व्हिटॅमिन सी असलेल्या फळांमध्ये पेरू, संत्री, अननस आणि सफरचंद भरपूर प्रमाणात खावे.

 चहामध्ये आल्याचा समावेश करावा-

चहामध्ये आल्याचा समावेश केल्याने वजन नियंत्रणात राहते. आलं शरिरासाठी आणि वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. तसेच कमी साखर असलेल्या चहा प्यावे. आल्यामुळे चहाची टेस्ट देखील वाढत असते.

(टीप- लेखात दिलेली माहिती फक्त सूचना म्हणून सांगण्यात आली. अशा प्रकारचा कोणताही उपचार, औषध किंवा आहार घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी