Weight loss: त्रिफळा खाल्ल्याने लवकर घटते पोटाची चरबी

तब्येत पाणी
Updated Jul 20, 2021 | 15:30 IST | टाइम्स नाऊ मराठी

जीवनशैलीतील बदलासोबतच आर्युर्वेदातील या उपायांचे नियमित पालन केल्याने पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. 

triphala
Weight loss: त्रिफळा खाल्ल्याने लवकर घटते पोटाची चरबी 

थोडं पण कामाचं

  • त्रिफळामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.
  • पोटाची चरबी कमी करण्यासाठी भाजलेल्या मेथीची पावडर सकाळी रिकाम्या पोटी पाण्यासोबत घ्यावी.
  • पोटाची चरबी कमी करणे काही सोपे नसते. मात्र योग्य डाएट आणि एक्सरसाईजने तुम्ही ही सोप्या पद्धतीने कमी करू शकता.

मुंबई: साधारणपणे अनेक लोकांसाठी वजन कमी करणे ही मोठी समस्या नाही तर पोटाच्या आजूबाजूला वाढलेले फॅट कमी करण्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागते. बेली फॅट वाढवण्यास जेनेटिक फॅक्टची मुख्य भूमिका असते. मात्र आयुर्वेदिक डॉक्टर श्याम व्हीएल यांच्यानुसार लाईफस्टाईलमध्ये काही बदल करून पोटाची चरबी कमी केली जाऊ शकते. 

पोटाची चरबी कमी करणे काही सोपे नसते. मात्र योग्य डाएट आणि एक्सरसाईजने तुम्ही ही सोप्या पद्धतीने कमी करू शकता. जाणून घ्या बेली फॅट कमी करण्यासाठी आयुर्वेदिक औषधांचा कसा वापर केला जाऊ शकतो. 

मेथीच्या पाण्याचे सेवन करा

पोटाची चरबी कमी करण्यासाठी भाजलेल्या मेथीची पावडर सकाळी रिकाम्या पोटी पाण्यासोबत घ्यावी. याशिवाय मेथी रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे पाणी प्या. यामुळे पोटाची चरबी कमी होईल. 

नीट चावून खा

जेव्हा तोंडातील लाळेमध्ये कार्बोहायड्रेट मिसळते तेव्हा पचन सुरू होते. यासाठी जेवण नीट चावून खावे. चावल्याने अन्नाचे नीट कण होतात आणि पचन चांगले होते. 

कोमट पाणी

जेव्हा तुम्हाला तहान लागेल तेव्हा कोमट पाणी प्या. कोमट पाण्यामुळे मेटाबॉलिज्म अॅक्टिव्ह होण्यास मदत होते. तसेच वजन कमी करण्यास मदत होते. यामुळे केवळ बॉडीच हायड्रेट होत नाही तर पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. 

त्रिफळाचे सेवन करा

त्रिफळामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.  तसेच पचनसंस्थाही सुधारते. पोटाची चरबी कमी करण्यासाठी त्रिफळा चूर्ण प्रभावी आहे. याचे नियमित सेवन केले गेले पाहिजे.गरम पाण्यात एक चमचा त्रिफळा चूर्ण मिसळून प्या. 

आले खा

सुक्या आल्यामध्ये थर्मोजेनिक एजंट असतो जे फॅट बर्न करण्यास मदत होते. पाण्यामध्ये सुक्या आल्याची पावडर उकळा आणि याचे सेवन करा. यामुळे मेटाबॉल्जिम वाढण्यास मदत होते. तसेच अतिरिक्त फॅट बर्न होते. 

हलके जेवण घ्या

लंचमध्ये नियमित कॅलरीजच्या ५० टक्के सेवन करा. कारण यामुळे पाचनशक्ती मजबूतहोते. डिनरमध्ये कमीत कमी कॅलरीज घ्या. संध्याकाळी सातच्या आधी रात्रीचे जेवण जेवा. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी