Alia Bhatt Weight loss: सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हे खाते आलिया भट्ट, घटवले २० किलो वजन

तब्येत पाणी
Updated Jan 07, 2021 | 12:37 IST | टाइम्स नाऊ मराठी

Alia Bhatt Weight loss: आलिया भट्टप्रमाणे तुम्हालाही वजन घटवायचे असेल तसेच आलियासारखी बॉडी मिळवायची असेल तर जाणून घ्या या वेट लॉस टिप्स

alia bhatt
सकाळ ते संध्याकाळ हे खाते आलिया भट्ट,घटवले २० किलो वजन 

थोडं पण कामाचं

  • आलिया भट्टने स्टुडंट ऑफ दी ईयर या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते
  • सिनेमासाठी आलिया भट्टने ६ महिन्याक २० किलो वजन कमी केले होते
  • आलिया भट्टला अनेक कडक डाएट फॉलो करावे लागले होते

मुंबई: अनेक बॉलिवूड अभिनेत्री(bollywood actress) आपल्या फिट लाईफस्टाईलसाठी ओळखल्या जातात. सोशल मीडियावर सेलिब्रेटीजच्या ट्रान्सफॉर्मेशने फोटो पाहिल्यावर अनेकांना त्यापासून प्रेरणा मिळते. या फिट बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक म्हणजे आलिया भट्ट. या अभिनेत्रीने स्टुडंट ऑफ दी ईयर या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या सिनेमासाठी आलिया भट्टने निर्मिता करण जोहरच्या मदतीने ६ महिन्यात २० किलो वजन घटवले होते. तसेच आकर्षक फिगर बनवली होती. 

आपल्या वेट लॉस दरम्यान आलियाला कडक डाएट फॉलो करावे लागले होते. मात्र असे केल्याने तिला कोणताही फायदा झाला नव्हता. आलिया भट्टने सांगितले की एक वेळ अशी होती की त्यावेळी ती फक्त चिकन आणि भाज्याच खात होती. 

नाश्ता आहे गरजेचा 

आलिया भट्टने सांगितले की ती प्रसिद्ध आहारतज्ञ ऋजुता दिवेकरला भेटला होती. त्यानंतर तिने एकाच प्रकारचे डाएट घेणे बंद केले.तिचा डाएट प्लान सरळ आणि साधा आहे. आलिया भट्ट मानते की सकाळचा नाश्ता खूप गरजेचा आहे. यासाठी आलिया भट्ट नाश्त्यामध्ये अशा गोष्टी खाणे पसंत करते ज्यामुळे तिचे पोट भरलेले राहते आणि कॅलरीजही नियंत्रित राहतात. जर तीला भूक लागली तर ती शेंगदाणे अथवा मखाणे खाते. 

खाण्यामध्ये अँटी ऑक्सिडंट्स

आलिया भट्ट आपल्या खाण्यामध्ये अँटी ऑक्सिडंट्सनी भरपूर असलेले खाणे खाते. यात बेरीज आणि पपईचा समावेश होतो. ती आपल्या दिवसाची सुरूवात हर्बल चहा अथवा कॉफीने करते ज्यात साखर नसते. त्यानंतर पोहे अथवा एग सँडविच नाश्तामध्ये खाते. 

आलिया भट्टच्या डाएट प्लाननुसार ती थोड्या थोड्या वेळाने काही ना काही हेल्दी खात असते. ती दिवसांतून ६ ते ७ वेळा हेल्दी पदार्थ खाते. ती असं यासाठी करते कारण ती आपल्या शूटिंगमध्ये अथवा एखाद्या कामात व्यस्त झाली तर तिचे खाणे सुटायला नको. तसेच तिचे पोट भरलेले राहील. 

साधे जेवण घेते

आलिया भट्ट आपले रात्रीचे जेवण खूपच साधे घेते. ती रात्रीडाळभात अथवा दही भात खाते. हे खाणे वेट लॉससाठी मदत करतात. आलिया भट्ट वर्कआऊटनंतर असे ड्रिंक घेणे पसंत करते ज्यामुळे तिला पोषणतत्वे मिळतील. आलिया भट्ट पिलेट्स आणि कार्डिओ एक्सरसाईज करते. यासाठी तिला न्यूट्रिएंट्स आणि व्हिटामिन्सची गरज पडते. ही गरज पूर्ण करण्यासाठी ती लिंबू पाणी अथवा नारळपाण्याचे सेवन करते. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी