Summer Health Tips: या घरगुती उपायाने दूर करा उष्णतेने होणाऱ्या पूटकुळ्या, काही दिवसातच दिसून येईल परिणाम

यावेळी मार्च महिन्यापासूनच उष्णतेने आपले स्वरूप दाखवण्यास सुरुवात केली. मार्च महिन्यातच तापमान 35 ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते.  या कडक उन्हामुळे सर्वजण हैराण झाले आहेत. लोकांना सर्वात जास्त त्रास देणारी गोष्ट म्हणजे घामोळ्या(म्हणजेच उष्णतेच्या पूटकुळ्या) प्रत्येकामध्ये उष्णतेच्या पूटकुळ्या होण्याची समस्या ही सामान्य आहे.

Summer Health Tips
या घरगुती उपायाने दूर करा उष्णतेने होणाऱ्या पूटकुळ्या  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • कोरफड जेल देखील या घामोळ्यांसाठी सर्वात फायदेशीर आहे.
  • एलोवेरा जेलमध्ये अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल घटक असतात
  • मुलतानी माती आपल्या त्वचेसाठी जितकी फायदेशीर आहे तितकीच ती घामोळ्यांसाठीही उपयुक्त आहे.

Summer Tips fir skin:  मुंबई : यावेळी मार्च महिन्यापासूनच उष्णतेने आपले स्वरूप दाखवण्यास सुरुवात केली. मार्च महिन्यातच तापमान 35 ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते.  या कडक उन्हामुळे सर्वजण हैराण झाले आहेत. लोकांना सर्वात जास्त त्रास देणारी गोष्ट म्हणजे घामोळ्या(म्हणजेच उष्णतेच्या पूटकुळ्या) प्रत्येकामध्ये उष्णतेच्या पूटकुळ्या होण्याची समस्या ही सामान्य आहे. ज्यांची त्वचा जास्त संवेदनशील असते त्यांच्यामध्ये उष्माघाताची समस्या सर्वात जास्त आढळते.  

जरी ही समस्या गंभीर नसली तरीही त्यावर उपचार करणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात यावर लवकर उपचार न केल्यास खूप त्रास होतो. आग होणे आणि खाज सुटणे यामुळे व्यक्तींना खूप त्रास होत असतो.  या घामोळ्या पूटकुळ्यांपासून मुक्त होण्यासाठी येथे काही घरगुती उपाय आहेत, जे केल्यानं तुम्हाला खूप आराम मिळेल. 

काकडी

काकडी खाण्यासाठी जितकी उपयोगी आहे, तितकीच शरीराला लावल्यानंतरही ती उपयोगी पडत असते. या उन्हाळ्यातील उष्णतेमुळे होणारी खाज काकडी लावल्याने दूर होत असते. काकडी घामोळ्यांवर लावल्याबरोबर आपल्याला गार वाटत असते. इतकेच नाहीतर त्वचा देखील उजळते. काकडी लावल्याने उष्णता लगेच निघून जात असते.

मुलतानी माती

मुलतानी माती आपल्या त्वचेसाठी जितकी फायदेशीर आहे तितकीच ती घामोळ्यांसाठीही उपयुक्त आहे. मुलतानी माती लावण्यासाठी गुलाब पाण्यात मिसळा. नंतर ज्या ठिकाणी उष्णतेवर पुरळ असेल त्या ठिकाणी ठेवा. ते साधरण 20 मिनिटे पूटकुळ्यांवर सोडा. हे दररोज लावा जेव्हा फरक दिसून येईल तेव्हाच हा उपाय करणं सोडा.

कोरफड जेल

कोरफड जेल देखील या घामोळ्यांसाठी सर्वात फायदेशीर आहे. ते लावल्याने त्वचेला आराम मिळतो तसेच थंडावाही पोहोचतो. कोरपडीच्या पानातून जेल एका भांड्यात काढून घ्या. नंतर ते हलक्या हाताने मालीश करत जेल  पिंपल्सवर लावावे. 15 मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर पाण्याने स्वच्छ धुवा. एलोवेरा जेलमध्ये अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल घटक असतात, जे त्वचेवर पुरळ, घामोळ्या, खाज, जळजळ इत्यादी दूर करत असते.

(डिस्क्लेमर- प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिपा आणि सल्ले केवळ सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे सौंदर्य नित्यक्रम करण्यापूर्वी कृपया एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी