Woman who was blind for 15 years regains sight after discovering misdiagnosis : 15 वर्षांपासून अंध असलेल्या महिलेला चुकीच्या उपचारानंतर मिळाली दृष्टी

तब्येत पाणी
Updated Jan 13, 2022 | 20:11 IST | टाइम्स नाऊ मराठी

Woman regains sight after discovering misdiagnosis : कोनी पार्के यांना काचबिंदूचे चुकीचे निदान झाले आणि त्यानंतर त्यांची हळूहळू दृष्टी गेली. पण, अलीकडेच त्यांना काचबिंदू नसून मोतीबिंदू असल्याचं समजलं, आणि 15 वर्षे अंध राहिल्यानंतर पुन्हा दृष्टी मिळवण्यासाठी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

Woman regains sight after discovering misdiagnosis
अंध असलेल्या महिलेला चुकीच्या उपचारानंतर मिळाली दृष्टी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 2003 मध्ये एका डॉक्टरांनी कॉनीला सांगितले की तिला रेटिनास किंवा काचबिंदूचा त्रास आहे.
  • कॉनीला सांगण्यात आले की तिची दृष्टी कमी झाली आहे आणि ती अखेरीस अंध होईल.
  • 2018 मध्ये तिला मोतीबिंदू झाल्याचे आढळून आले.

Woman regains sight after discovering misdiagnosis : एका महिलेला तिच्या दृष्टीदोषावर काहीच उपचार करता येणार नाही असं सांगण्यात आल्यानंतर, आता तिच्या दृष्टीदोषाबाबत चुकीचं निदान केल्याचं धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानंतर त्या महिलेवर एक छोटी शस्त्रक्रिया पार पडली. आणि तब्बल 15 वर्षं अंधारात घालवलेल्या तिच्या डोळ्यांनी प्रकाश पाहिला. जवळपास दीड दशकांनंतर ती तिच्या मुलांना पाहू शकली. 


अमेरिकेतील कोलोरॅडो राज्यातील ऑरोरा येथील कॉनी पार्के यांना 2003 मध्ये गाडी चालवताना कारच्या दिव्यांवर हॅलोस आणि प्रिझम दिसू लागले. एका डॉक्टरने तिला सांगितले की तिला रेटिना किंवा काचबिंदूचा त्रास आहे.

"तीन आठवड्यांनंतर, माझी दृष्टी आणखी कमी झाली होती" कॉनीने अधिक माहिती दिली.


तिला असं सांगण्यात आलं की तिच्या कमी होणाऱ्या दृष्टीवर कोणताही उपचार शक्य नसून, ती हळूहळू स्वत:ची संपूर्ण दृष्टी गमावेल. "जोपर्यंत मला दुखापत होत नव्हती, 
तोपर्यंत माझा या सर्व गोष्टींवर विश्वास बसत नव्हता. मी हरू लागले होते. पायऱ्यांवरून चढता उतरताना एखसारखी पडू लागले. मी तर स्वत:सह घराला देखील आग लावली होती. पहिल्या पाच साडे पाच महिन्यातच माझी जवळपास 85 टक्के दृष्टी मी गमावली होती." ती म्हणाली.

कॉनीने अंध शाळेत जाण्यासाठी आणि स्वतंत्र राहण्यासाठी 2004 मध्ये मोंटानाहून डेन्व्हर येथे स्थलांतर केले. मात्र तीने आईस स्केटिंग, कयाकिंग, कॅम्पिंग आणि स्पोर्टिंग इव्हेंट्स, कॉन्सर्टमध्ये उपस्थित राहणे यासारख्या ऍक्टिव्हिटी सुरूच ठेवल्या.

ती म्हणाली, "मी माझी दृष्टी गमावण्यापूर्वी शक्य तितके जीवन जगले. "

पण अशा काही गोष्टी होत्या ज्यांच्याशी जुळवून घेणं तिला कठीण जात होतं. 


मात्र, तिच्या दृष्टीबाबतचं निदान चुकीचे होते. 2018 मध्ये, कॉनीला UC Health Sue Anschutz-Rodgers Eye Center येथे पाठवण्यात आले. जेथे नेत्ररोगतज्ज्ञांनी तिला सांगितले की तिला काचबिंदूचा त्रास नाही. तिला खरोखर मोतीबिंदू होता, जो शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकला जाऊ शकतो ज्यामुळे तिची दृष्टी पुन्हा मिळू शकते.

नेत्रतज्ज्ञांनी तिला किती टक्के दृष्टी परत मिळेल हे सांगितलं नव्हतं. परंतु ऑपरेशननंतर जेव्हा तिच्या डोळ्यावरच्या पट्ट्या काढल्या गेल्या तेव्हा ती सर्वकाही पाहू शकत होती.

"लोकांनी वारंवार तपासणी करणे आवश्यक आहे, मी विनाकारण 15 वर्षे अंध होते." कॉनी म्हणाले.


ती पुढे म्हणाली, "ज्या दिवशी डोळयातील रेटिना तज्ज्ञाने मला सांगितले की त्याला एकाही डोळयात रेटिना दिसला नाही, तेव्हा मी आणि माझा पती अस्वस्थ झालो होतो. मला डॉक्टरांबद्दल थोडासा रागही आला. परंतु मी देवाची आभारी आहे. ज्या दिवशी त्यांनी माझ्या डोळ्यातून पॅच काढला आणि मी सगळं काही पाहू शकले, तेव्हा माझा डॉक्टरांवरील सर्व राग दूर झाला."


यशस्वी उपचारांनंतर कोनीने पहिल्यांदाच तिच्या सर्व आठ नातवंडांना पाहिलं. तसंच ती अंध असताना तिचा मार्गदर्शक असणारा कुत्रा तालुलाह माईला रिटायर करत, 
त्याचा आता इतर कुत्र्यांप्रमाणे ती सांभाळ करत आहे.

बहुतेक लोक ज्या गोष्टी गृहीत धरतात त्या पाहण्यात तिला आनंद होतो. पण सर्वात कठीण गोष्ट म्हणजे स्वत:ला म्हातारं होताना पाहणे  "कारण मी एवढी म्हातारी असेन असा कधी विचारच केला नव्हता."


ती म्हणाली, "माझ्याकडे कोणी पाहतं आहे की नाही याचीदेखील मला कल्पना नव्हती."

मात्र, पती रॉबर्टला पुन्हा पाहून तिचा आनंद द्विगुणित झाला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी