महिलेला वाटले की मूतखडा लघवीवाटे पडतोय, प्रत्यक्षात टॉयलेटमध्ये दिला बाळाला जन्म

तब्येत पाणी
Updated Apr 07, 2021 | 13:16 IST | टाइम्स नाऊ मराठी

मेलिसाला मोठा धक्काच बसला कारण ती गर्भवती असल्याची तिला कोणतीही कल्पना नव्हती. कदाचित मूतखडा लघवीवाटे बाहेर पडत असावा त्यामुळेच ह्या प्रंचड कळा येत असल्याचा समज.

Lady thought it was kidney stone, gave birth to baby
मूतखडा समजून महिलेने दिला टॉयलटमध्येच बाळाला जन्म 

थोडं पण कामाचं

  • अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स राज्यातील मेलिसा सर्जकॉफ या महिलेचा धक्कादायक अनुभव
  • तिला आपण गर्भवती असल्याची कोणतीही नव्हती जाणीव
  • काळजी घेतलेली नसतानासुद्धा जन्माला आलेल्या बाळाचे आरोग्य उत्तम

वॉशिंग्टन: अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स राज्यातील मेलिसा सर्जकॉफ या महिलेसाठी ८ मार्च हा एक रोजच्यासारखाच दिवस होता. मात्र अचानक मेलिसाला पोटात प्रंचड कळा येण्यास सुरूवात झाली, तिला असह्य कळा येऊ लागल्या. तिचा पती, डॉनी कॅम्पबेलला सुरूवातीला असे वाटले की मेलिसाला कदाचित मूतखड्याचा त्रास होत असावा. कदाचित मूतखडा लघवीवाटे बाहेर पडत असावा त्यामुळेच ह्या प्रंचड कळा येत आहेत. डॉनीने लगेच ९११ या नंबरवर मदतीसाठी फोन केला.

टॉयलेटमध्ये बाळाचा जन्म


मात्र ह्या कळा म्हणजे मूतखड्यामुळे होणारा त्रास नव्हता किंवा नेहमीचा पोटदुखीहाही त्रास नव्हता.  आपण टॉयलेट सीटवर बसल्यानंतरच आपल्याला थोडासा आराम मिळाला असे मेलिसाचे म्हणणे आहे. थोड्या वेळानंतर मेलिसाला टॉयलट सीटवर बसणेही अशक्य झाले आणि प्रचंड वेदनेपोटी ती जोरजोरात ओरडायला लागली. त्याचवेळेस तिला जाणवले की तिच्या शरीरातून काहीतरी बाहेर पडले आहे. 
'मी टॉयलटकडे पाहिले, तरीही माझ्या लक्षात येईना की हे नेहमे काय आहे. मला वाटले की माझ्या शरीराचाच एखादा अवयव बाहेर पडला आहे,' अशा शब्दात मेलिसाने आपल्या भावना व्यक्त केल्या.

गर्भवती असण्याबाबत अनभिज्ञ


एनबीसी बॉस्टनला दिलेल्या मुलाखतीत या दांपत्याने आपल्या अनुभवाचे कथन केले आहे. अचानक बाळाला जन्म दिल्याची कथा त्यांनी या मुलाखतीत सांगितली. 'आम्ही प्रचंड मानसिक धक्क्यात होतो. असे काही होईल असे आम्हाला कधीही वाटले नव्हते. अचानकपणे टॉयलटमध्ये एक बाळ होते', असे कॅम्पबेल यांनी सांगितले. मेलिसाला ती गर्भवती असल्याची कोणतीही कल्पना नव्हती, त्यामुळे तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. तिचा नऊ महिन्यांचा गर्भवती काळसुद्धा सहज निघून गेला होता. या कालावधीत तिला आपण गर्भवती असल्याची कोणतीही जाणीव झाली नव्हती. तिच्या पोटाचा आकारसुद्धा गर्भधारणेनंतर वाढला नव्हता. त्यामुळे तिने अर्थातच गर्भवती असण्याची कोणतीही काळजी घेतली नव्हती. 

नऊ महिने गर्भवतीची कोणतीही काळजी घेतलेली नसतानासुद्धा जन्माला आलेल्या बाळाचे आरोग्य उत्तम होते. बाळाला आणि मेलिसाला फक्त एकच रात्र इस्पितळात राहावे लागले. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.

असे अनुभवणारी मेलिसा एकटीच नव्हे


एनबीसी बॉस्टनला दिलेल्या मुलाखतीत मेलिसाने हा अंगावर शहारे आणणारा अनुभव सांगितला आहे. मात्र आपल्या गर्भारपणाची कल्पना नसलेली मेलिसा ही काही एकमेव महिला नाही. मागील वर्षी ब्राझिलमधील एका २० वर्षीय महिलेनेदेखील आपल्या बाथरुममध्ये एकट्यानेच एका बाळाला जन्म दिला होता. अल्मिडा असे या महिलेचे नाव आहे. अल्मिडा गर्भवती असल्याची तिला किंवा इतर कोणलाही कल्पना नव्हती. त्यामुळे तिच्या मदतीसाठी कोणताही नव्हते. 

आणखी एका केसमध्ये वेस्ट ससेक्समधील एका ३२ वर्षीय महिलेला ती गर्भवती असल्याची कल्पना नव्हती. गर्भारपणाचे ३७ आठवडे उलटून गेल्यानंतरही तिला आपल्या गर्भवती असण्याची कोणतीही जाणीव झाली नव्हती. कारण गर्भारपणात वाढतो त्याप्रमाणेच तिच्या पोटाचा आकार वाढलेला नव्हता. ती महिला आपल्या गर्भनिरोधक गोळ्याही घेत होती आणि तिला मासिक पाळीदेखील येत होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी