Obesity : वर्क फ्रॉम होममुळे वजन वाढू लागलं, मग या सोप्या टिप्ससह मिळवा Flat Tummy

वर्क फ्रॉम होम करताना व्यक्तीने थोडा आळशी किंवा आराम करणारा होत असतो. यामुळे वजन वाढणं शक्य असतं. वजन वाढीच्या समस्येपासून वाचण्यासाठी व्यक्तीने जास्तीत जास्त पाणी पिणं आवश्यक आहे, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. बहुतेक आरोग्य तज्ञांचा असा विश्वास आहे की दिवसातून किमान 8 ग्लास पाणी प्यावे.

Then get Flat Tummy with these simple tips
या सोप्या टिप्ससह मिळवा Flat Tummy  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • घरून काम केल्याने लोकांच्या शारीरिक हालचाली कमी होतात.
  • सतत 8 ते 10 तास खुर्चीवर बसून काम करत असाल तर पोट (ढेरी) नक्कीच बाहेर येईल.
  • वजन वाढीच्या समस्येपासून वाचण्यासाठी व्यक्तीने जास्तीत जास्त पाणी पिणं आवश्यक आहे.

Obesity Due To Work From Home:  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला, तेव्हा भारतासह (India) जगातील बहुतेक भाग लॉकडाऊनमध्ये (Lockdown) होते, त्यानंतर संसर्ग (infection)वाढू नये म्हणून अनेक कॉर्पोरेट कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घरी काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण हळुहळू घरातून काम हा कल्चर  ्रेंडमध्ये आला आणि आजही तो चालू आहे. वर्क फ्रॉम होम (Work from home) हे आपल्याला फायद्याचे वाटते. या वर्क फ्रॉम होममध्ये ऑफिसला जाण्याचा खर्च वाचत असतो. परंतु खर्च वाचतो परंतु वजनवाढीच्या समस्या तरुणांमध्ये वाढू लागल्या आहेत. (Work from home started gaining weight, then get Flat Tummy with these simple tips)

अधिक वाचा  : मराठीतून होणार एमबीबीएस, बीडीएसचं शिक्षण

घरून काम केल्याने लोकांच्या शारीरिक हालचाली कमी होतात. त्यात जर पोटाची आणि कंबरेची चरबी वाढली की ती कमी होण्याचे नाव घेत नाही. मग वजन कमी कसं करावं याची चिंता सतावत असते. कोणी विविध प्रकारचे डाएट प्लान करत असतात. तर काहीजण जीमचा रस्ता पकडत असतात. अनेकजण वजन कमी करण्याचे वेगवेगळे मार्ग दाखवत असतात, अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला अशा काही ट्रिक्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्हाला तुमचे वजन कमी करता येईल.

काम करत असताना मध्ये-मध्ये पायी चला 

सतत 8 ते 10 तास खुर्चीवर बसून काम करत असाल तर पोट ((ढेरी) नक्कीच बाहेर येईल. जास्त वेळ एकाच स्थितीत बसल्याने चरबी वाढू लागते, त्यामुळे दर तासाला 5 मिनिटे ब्रेक घ्या आणि या दरम्यान चालत राहा, असे केल्याने वजन नियंत्रणात राहते.

अधिक वाचा  :सामान्यांपेक्षा ॲथलिट्सचा हार्ट रेट असतो कमी

पाणी प्या

वर्क फ्रॉम होम करताना व्यक्तीने थोडा आळशी किंवा आराम करणारा होत असतो. यामुळे वजन वाढणं शक्य असतं. वजन वाढीच्या समस्येपासून वाचण्यासाठी व्यक्तीने जास्तीत जास्त पाणी पिणं आवश्यक आहे, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. बहुतेक आरोग्य तज्ञांचा असा विश्वास आहे की दिवसातून किमान 8 ग्लास पाणी प्यावे. विशेषतः सकाळी कोमट पाणी प्या, पोट आणि कंबरेची चरबी कमी होण्यास मदत होईल.

फायबरयुक्त पदार्थ खा

जर तुमचं वजन वाढलं तर वजन कमी करण्याचं टेन्शन येत असतं. यामुळे आपल्या आहारात बदल करावा लगतो. आपल्या आहारात असलेल्या पदार्थांमध्ये फायबर जास्त असलेल्या पदार्थांचा समावेश करा. जास्त फायबर असल्याने बराच वेळ आपलं पोट भरल्यासारखं वाटेल.  यामुळे आपलं वजन हळूहळू कमी होण्यास मदत होईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी