Covid impact on fitness: कोरोना संक्रमणामुळे कमी होते व्यायामाची क्षमता, अशी करा तयारी

गेल्या वर्षी कोरोना होऊन गेलेल्या अनेकांना आजही आपली शारीरिक क्षमता कमी झाल्याचं जाणवत आहे. शारीरिक कष्टाची कामे करताना किंवा व्यायाम करताना पूर्वीच्या तुलतेत आपली क्षमता कमी झाल्याचा अनुभव अनेकांना आजही येत आहे.

Covid impact on fitness
कोरोना संक्रमणामुळे कमी होते व्यायामाची क्षमता  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • कोरोनामुळे होते शारीरिक क्षमता कमी
  • व्यायाम करण्याच्या क्षमतेवरही होतो परिणाम
  • सातत्यपूर्ण व्यायामामुळे मिळवता येतो पूर्वीचा फिटनेस

Covid impact on fitness: कोरोना (Corona) होऊन गेल्यानंतर अनेकांना वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक समस्यांचा (Physical Problems) आणि संकटांचा सामना करावा लागत आहे. यामध्ये केस गळणं, अशक्तपणा जाणवणं, थकवा येणं, चिडचिड होणं आणि रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) कमी होणं अशी काही लक्षणं जाणवू लागतात. ही लक्षणं केवळ आजारापुरती मर्यादित राहत नसून त्यानंतर कित्येक महिने जाणवत असल्याचं दिसून आलं आहे. गेल्या वर्षी कोरोना होऊन गेलेल्या अनेकांना आजही आपली शारीरिक क्षमता कमी झाल्याचं जाणवत आहे. शारीरिक कष्टाची कामे करताना किंवा व्यायाम करताना पूर्वीच्या तुलतेत आपली क्षमता कमी झाल्याचा अनुभव अनेकांना आजही येत आहे. 

काय सांगतो रिसर्च?

अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात करण्यात आलेल्या संशोधनानुसार कोरोनामुळे बहुतांश रुग्णांच्या शारीरिक क्षमतेवर विपरित परिणाम झाल्याचं दिसून आलं आहे. चाळीशीतील व्यक्ती ही पन्नाशीत असल्याएवढी थकून जात असल्याचं या सर्वेक्षणात दिसून आलं आहे. अर्थात, प्रत्येक व्यक्तीवर कोरोनाचा एकसारखा परिणाम झालेला नाही. काहीजणांवर अधिक तर काहींवर त्याचा नाममात्र परिणाम झाल्याचं चित्र आहे. कुठल्याही व्यक्तीची रोगप्रतिकारक क्षमता आणि शारीरिक क्षमता या गोष्टींवर वेगवेगळा परिणाम झाल्याचं चित्र आहे. उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी व्यायाम करणं आवश्यक आहे. मात्र व्यायाम करण्याच्या प्रत्येकाच्या क्षमतेवर कोरोनाचा परिणाम झाला आहे. 

असे करा व्यायामाचे नियोजन

कोरोनानंतर कुठल्याही व्यक्तीची व्यायाम करण्याची क्षमता कमी होणं साहजिक आहे. त्यामुळे शरीराला वर्कआऊट करण्याअगोदर तयार करणं आवश्यक आहे. त्यानंतर हळूहळू शरीराची क्षमता वाढू शकते. 

अधिक वाचा - Weight Loss Tips : थंडीत वजन कमी करण्यासाठी वापरा मेथीचे दाणे, आठवड्याभरात पहा फरक

छोट्या पातळीपासून करा सुरुवात

आपल्या शरीराची व्यायामाची क्षमता वाढण्यासाठी छोट्या पातळीपासून सुरुवात करा. कोरोना होऊन गेल्यानंतर कुठलाही व्यायाम करताना सुरुवातीला थकवा जाणवणं साहजिक आहे. त्यामुळे व्यायामाची सुरुवात तुम्ही चालण्यापासून करू शकता. हळूहळू चालण्याचा वेग तुम्ही वाढवत न्या आणि शरीराच्या क्षमतेकडे लक्ष ठेवा. असं करत काही महिन्यांत तुम्ही तुमची क्षमता वाढवू शकाल. 

योग्य उपचार

शरीराची क्षमता वाढवण्यासाठी कोरोनानंतर योग्य उपचार घेण्याची गरज असते. उपचारादरम्यान योग्य प्रमाणात प्रोटिन, व्हिटॅमिन आणि इतर पोषक घटक शरीरात जातील, याची काळजी घेणं आवश्यक असतं. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने ट्रिटमेंट सुर करणे आवश्यक असून व्यायामाला सुरुवात करतानादेखील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ती केल्यास त्रास कमी होऊ शकतो. 

अधिक वाचा - Mouth Ulcer Remedies: पोटाच्या उष्णतेमुळे तोंडात फोड येतात का? उपायासाठी वाचा या 3 टिप्स, खर्च येईल फक्त 5 रुपये

नियमित व्यायामाचा सल्ला

कोरोनानंतर कमी झालेली शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी नियमित व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. व्यायामात खंड पडू न देता काही महिने सलग व्यायाम केल्यानंतर शारीरिक क्षमता पूर्ववत होण्यास मदत होत असल्याचं दिसून आलं आहे. 

डिस्क्लेमर - कोरोनानंतरची शारीरिक स्थिती आणि व्यायाम याबाबत सामान्यज्ञानाच्या आधारे देण्यात आलेल्या या काही टिप्स आहे. तुम्हाला याबाबत काही गंभीर समस्या असतील, तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार घेणे आवश्यक आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी